दुर्गंधीयुक्त साफसफाई करणाऱ्या कामगारांना न्याय
दुर्गंधीयुक्त साफसफाई करणाऱ्या कामगारांना न्याय
मुंबई / रमेश औताडे
दुर्गंधीयुक्त घाणीचे साम्राज्य असणाऱ्या ठिकाणी सफाईचे काम करणाऱ्या कामगारांना उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठाच्या निर्णयामुळे आता लाड - पागे समिती वारसाहक्काच्या शिफारशी लागू झाल्याने सर्व जातीच्या सर्व ठिकाणी कार्यरत असणाऱ्या कामगारांना न्याय मिळाला आहे. अशी माहिती मुन्सिपल मजदुर युनियन मुंबई चे अध्यक्ष अशोक जाधव यांनी दिली.
त्यानिमित्त शुक्रवार १७ जानेवारी २०२५ दुपारी २.०० वाजता राष्ट्रीय मिल मजदुर संघ, जी. डी. आंबेकर रोड, भोईवाडा, परेल, मुंबई ४०००१२ येथे " भव्य विजयी मेळावा " आयोजित केला आहे. या भव्य मेळाव्या प्रसंगी संपूर्ण महाराष्ट्रातील कामगारांना वारसा हक्काचा लाभ मिळवून देण्यासाठी सातत्याने संघर्ष करणारे व लढा देणाऱ्या महाराष्ट्र राज्य महानगर पालिका नगरपालिका नगरपरिषद कामगार व कर्मचारी फेडरेशनचे कामगार नेते व जेष्ठ विधितज्ञ वकिल यांचा सन्मान व सत्कार करण्यात येणार आहे.
मुंबई महानगरपालिकेतील घ.क. व्य., मेन्शुअर, ड्रेनेज, पंपिंग, मार्केट, देवनार कत्तलखाना, सर्व रुग्णालये येथे घाणीशी संबंधित सफाईचे काम करीत आहेत त्या सर्व कामगारांना या निर्णयामुळे लाड-पागे समितीच्या शिफारशी लागू होऊन नोकरी मिळणार असल्याचा निर्णयामुळे कर्मचाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे असे मुन्सिपल मजदुर युनियन मुंबई चे अध्यक्ष अशोक जाधव यांनी सांगितले.
Comments
Post a Comment