मेघमल्हार चषकावर " रायझिंग स्टार " ने नाव कोरले
मेघमल्हार चषकावर रायझिंग स्टार ने नाव कोरले
मुंबई / रमेश औताडे
क्रिकेटची पंढरी म्हणून उदयास येत असलेल्या नवी मुंबईतील घणसोली मध्ये " मेघमल्हार गृहसंकुल " आयोजित " मेघमल्हार प्रिमियर लीग " च्या अंतिम सामन्यात " मेघमल्हार चषकावर" " रायझिंग स्टार " ने नाव कोरत एका थरारक सामन्याचा अनुभव प्रेक्षकांना दिला.
कर्णधार दादाभाऊ भांगे व जयेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या ईमारत क्रमांक E 05 च्या RISING STARS संघाने ईमारत क्रमांक L 06 संघाचा पराभव करत 5 धावांनी सामना जिंकला.
शेवटच्या चेंडुपर्यंत चुरशीच्या सामन्यात प्रेक्षकांच्या नजरा खिळवुन ठेवत E 05 संघाने मेघमल्हार चषकावर आपले नाव कोरण्यात यश मिळवले.
मालिकावीर आर्मी मॅन सागर , उत्कृष्ट फलंदाज सन्नी, सामनावीर गणेश आणि धावता झेल घेऊन सामना जिंकून देणारा सागर यांना उत्कृष्ट क्षेत्ररक्षक म्हणुन बक्षिसे देण्यात आले.
मेघमल्हार प्रिमियर लीग आयोजित करण्यासाठी मेघमल्हार संकुलाचे अध्यक्ष अंकुश नाईक, संग्राम पाटील, अरुण धुमाळ, संतोष गोळे, जयेश शिंदे, प्रफुल्ल दुरतकर यांनी मेहनत घेतली.
दिलीप पाटील, तुषार नाईक, अनिल गावडे, अरूण निकम, अक्षय कदम, संदेश घाडगे, रोहन गावंड, अरूण धुमाळ, मयुर राणे, पियुष यादव, नितिन दौंड यांनी प्रोत्साहन पर बक्षिसे देऊन या लीगमध्ये उत्साह भरला.
अशाप्रकारे खेळीमेळीच्या वातावरणात हा चषक जिंकल्यावर उभय संघाने मेघमल्हार संकुलाचे कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर शिरसाट ( माऊली ) च्या विनंती नुसार मिरवणुक काढत आनंद साजरा केला.
Comments
Post a Comment