Posts

Showing posts from October, 2024

" एक सत्य " कविता विद्यापीठात अभ्यासली जावी

Image
" एक सत्य " कविता विद्यापीठात अभ्यासली जावी  मुंबई / रमेश औताडे  साहित्याच्या प्रस्थापित भिंतीवर बसून साहित्याचे मोजमाप करणाऱ्या व्यवस्थेला कवी अनंत धनसरे यांच्या " एक सत्य " या दीर्घ कविता विद्यापीठात अभ्यासली जावी अशी आहे. ही कविता वरवरचं बोलत नाही. तर जमिनीखालचा तळ ढवळून अनुभवातून उभी रहाते. आणि म्हणूनच ही कविता विद्यापीठात बसून अभ्यासली जावी इतकी महत्त्वाची आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. शामल गरुड यांनी केले.  घाटकोपर येथे माता रमाबाई आंबेडकर नगर येथील शहीद स्मारक सभागृहात कवी अनंत धनसरे यांच्या "एक सत्य" दीर्घ कवितेच्या प्रकाशन सोहळ्यात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.  यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवा इंगोले, प्रमुख वक्ते डॉ. सुनील पवार रविकिरण पराडकर आदी मान्यवर उपस्थित होते. त्यापुढे म्हणाल्या की, अनंत ची कविता ही समस्त आंबेडकरी स्त्रियांसाठी खूप बंधूभावाची आणि वेदनेची कविता आहे. या कवितेवर महत्त्वाची चर्चा होणे गरजेचे आहे.  समकालीन, राजकीय, सामाजिक सगळ्या जगण्यावर अनंत बोलत असताना अनंत एका महत्त्वाच्या टप्प्यावर ये...

राष्ट्रीय मराठा पार्टी उमेदवार

Image
राष्ट्रीय मराठा पार्टी उमेदवार  मुंबई / रमेश औताडे  २३९ औसा विधान सभा मतदारसंघ निवडणूक निर्णय अधिकारी अविनाश  कोरडे यांच्याकडे निवडणूक अर्ज सादर करताना राष्ट्रीय मराठा पार्टीचे अधिकृत उमेदवार अँड. उद्धव विनायक क्षेत्रफळे  सोबत राष्ट्रीय मराठा पार्टी राष्ट्रीय  अध्यक्ष अंकुशराव शिवाजीराव पाटील होनाळीकर.

प्रामाणिक कार्यकर्त्यावर अन्याय का

Image
प्रामाणिक कार्यकर्त्यावर अन्याय का  मुंबई / रमेश औताडे  आपल्या आयुष्याची हयात पक्षासाठी समर्पित करणारे सच्चे निष्ठावंत कार्यकर्ते तिकिटापासून वंचित राहू लागले तर त्यांना पक्ष सोडण्याशिवय पर्याय नसतो.असे मत ऍड रवी प्रकाश जाधव यांनी काँग्रेस पक्ष सोडून वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केल्यानंतर मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले. काँग्रेस पक्षात असताना  कुलाबा मतदार संघात सर्वसामान्य जनतेची कामे केली.रात्र दिवस पहिला नाही. मात्र जे खोक्याची भाषा करतात त्यांनीच खोके घेऊन मला तिकीट दिले नाही.असा आरोप जाधव यांनी यावेळी केला.  कुलाबा मतदार संघात उमेदवार देताना आता जे काही काँग्रेसने केले ते योग्य नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी पक्षातून मी उभा राहिलो आहे असे जाधव यांनी सांगितले. पेशाने वकील असल्याने मतदार संघात मी जे काही काम केले व करणार होतो त्याचा फायदा काँग्रेसला झाला असता मात्र आता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी या भागाचा विकास करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.

" घर घर संविधान " अभियान जनजागृती

Image
 " घर घर संविधान " अभियान जनजागृती मुंबई / रमेश औताडे  भारतीय संविधानाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त  संविधान जागर समिती महाराष्ट्रच्या वतीने राज्यभरात " घर घर संविधान " हे अभियान राबाविण्यात येणार असल्याची माहिती मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली.  यावेळी नितीनभाऊ मोरे, योजनाताई ठोकळे, ॲड. संदिप जाधव, स्नेहाताई भालेराव,जयवंत तांबे आदी समन्वयक उपस्थित होते. हे अभियान २६ ऑक्टोबर ते २६ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत राबवण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून स्वातंत्र्य, समता, न्याय व बंधुता या संविधानिक मुल्यांचा जागर करण्यात येणार आहे. अभियानाच्या अंतर्गत राज्यभर विविध कार्यक्रम, उपक्रम, स्पर्धा आयोजित करणार आहोत. तसेच  घरोघरी संविधान सरनामा तसेच पुस्तिका वितरित करून संविधानिक मूल्यांचा प्रसार केला जाणार आहे. संविधानाच्या ब‌द्दल काही लोक हेतुपुरस्सर खोटी माहिती व नॅरेटीव्ह पसरवत आहेत. नागरिकांमधील गैरसमज दूर करून योग्य व वास्तव माहितीचे जागरण या अभियानाच्या ‌द्वारे होईल. संविधान जागर समितीत  राज्यातील अनेक संस्था सं...

आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतून मनोहर रायबागेच बाजी मारणार

Image
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतून मनोहर रायबागेच बाजी मारणार मुंबई / रमेश औताडे  महाराष्ट्र विधानसभेचे निवडणूक जाहीर झाली आणि उमेदवार मिळवण्यासाठी प्रत्येकाची तारांबळ उडाली. मात्र आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीतून कार्यसम्राट समाजसेवक बसपाचे उमेदवार मनोहर रायबागेच बाजी मारणार. धारावीतील कार्यसम्राट समाजसेवक,बसपाचे उमेदवार मनोहर रायबागे यांनी देखील आपला उमेदवारी अर्ज भरला रायबागे यांना शिंदे गटातून उमेदवारी देण्यात येणार होती. मात्र त्यांनी ते नाकारली आणि धारावीतील त्यांच्या समर्थकाबरोबर चर्चा केल्यानंतर त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरण्याची तयारी दर्शवली.याच वेळेला त्यांना बहुजन समाज पक्षाने आपली उमेदवारी बहाल केली.  महाराष्ट्रातून बसपाचा पहिला आमदार धारावीतून निवडला जाणार याची खात्री असल्यामुळे रायबागे यांना उमेदवारी देण्यात आली.  रायबागे यांनी धारावीमध्ये अनेकांना रोजगार उपलब्ध करून दिले, आर्थिक मदत केली, अनेकांच्या अडचणी सोडवल्या आहेत. त्यामुळे त्यांची जनमानसात एक चांगली प्रतिमा असल्यामुळे धारावी मध्ये अठरापगड जातीचे...

मेघनाताईंचा विजय नक्की - अशोकराव टाव्हरे

Image
मेघनाताईंचा विजय नक्की - अशोकराव टाव्हरे मुंबई / रमेश औताडे आमदार मेघनाताई साकोरे बोर्डीकर या प्रचंड मतने जिंतुर परभणी विभागातून  निवडून येतील असा विश्वास भाजप नेते अशोकराव टाव्हरे यांनी व्यक्त केला. महायुतीच्या उमेदवार म्हणून मेघनाताई यांनी तहसील कार्यालय अर्ज भरला. मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.  मेघनाताई यांचे वडील ज्येष्ठ नेते रामप्रसाद बोर्डीकर हे आहेत. ते चार वेळा विधानसभा आमदार होते, काही काळ मंत्री होते. एपीएमसी मार्केट ,नवी मुंबईचे सभापतीपदही त्यांनी भुषविले आहे. यांचे पती दिपक साकोरे नवी मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त आहेत. मागील पाच वर्षात आमदार मेघनाताईनी झंझावती कार्य केले असून विकासाची मोठी कामे मतदारसंघात केल्याने जनतेचा मोठा पाठींबा मिळत असून त्या निश्चितच प्रचंड बहुमतांनी निवडून येथील असे टाव्हरे यांनी  सांगितले.

हि कसली लोकशाही - कवी लेखक अशोक टाव्हरे यांचा सवाल

Image
हि कसली लोकशाही  -  कवी लेखक अशोक टाव्हरे यांचा सवाल मुंबई / रमेश औताडे  आदिवासी समाजातील सरपंच असलेल्या महिलेला जाहीर कार्यक्रमात स्टेजवर संधी दिली नाही. मात्र मारहाण आणि विनयभंग असे गुन्हे दाखल असलेल्या व्यक्तीला खुलेआम व्यासपीठावर प्रवेश देण्यात येतो. कसली ही लोकशाही ? असा सवाल समाजसेवक कवी लेखक अशोक टाव्हरे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. सरन्यायाधीश डॉ. धनंजय चंद्रचूड यांनी गेल्या आठवड्यात कनेरसर गावी भेट दिली होती. यावेळी झालेल्या कार्यक्रमात मारहाण आणि विनयभंग असे गुन्हे दाखल असलेल्या जवाहर विठ्ठल दौंडकर खुलेआम व्यासपीठावर कसे काय फिरत होते ? असा सवाल अशोक टाव्हरे यांनी पत्रकार परिषदेत केला आहे. ज्याच्या नावावर खटले दाखल आहेत, त्यांना वगळून इतरांना कार्यक्रमाचे पास देण्याची मागणी ग्रामस्थांनी केली होती. परंतु, गुन्हे दाखल असलेल्या दौंडकर यांना प्रशासनाकडून पास देण्यात आले. सरन्यायाधीश डॉ. चंद्रचूड यांनी कनेरसर येथे येण्याअगोदर न्यायदेवतेची पट्टी काढून हातात संविधान ठेवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु त्यांच्याच कार्यक्रमात गुन्हेगार खुलेआम फिरत होते....

तरीही दिव्यांग खेळाडू क्रिकेट खेळतात

Image
तरीही दिव्यांग खेळाडू क्रिकेट खेळतात मुंबई / रमेश औताडे  मुंबई व्हीलचेअर क्रिकेट संघाला कोणत्याही सरकारी संस्थेचा तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशन एमसीए चाही  पाठिंबा मिळत नाही ही मोठी शोकांतिका आहे. स्वयंसेवी संस्था व देणगीदारांकडून मिळालेल्या निधीवर आम्ही दिव्यांग खेळाडू क्रिकेट खेळतो. दिव्यांग खेळाडू बाबत सरकारला ही लाजिरवाणी बाब आहे. अशी खंत व्हीलचेअर मुंबई क्रिकेट टीम चे कर्णधार राहुल रामूगडे यांनी व्यक्त केली. व्हीलचेअर क्रिकेट इंडिया आणि डिफरंटली एबल्ड क्रिकेट कौन्सिल ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब ऑफ मुंबई मलबार हिल यांच्या सहकार्याने घाटकोपर मध्ये २६ ऑक्टोबर रोजी टी १० व्हीलचेअर क्रिकेट मॅच चे आयोजन करण्यात आले. यात हिंदुस्तान कोलास प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने खेळाडूंना नवीन व्हीलचेअर भेट दिली. मुंबई विरुद्ध महाराष्ट्र असा हा सामना होता. या  सामन्यात मुंबईच्या टीम ने उत्कृष्ट खेळ खेळत बाजी मारली. क्रिकेट हा खेळ जगभरात प्रसिद्ध असून व्हील चेअर क्रिकेट टीम ला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. आमच्या मुंबई संघातील काही खेळाडू भारतीय व्हीलचेअर क्रिकेट संघाक...

मेडिकल दुकान मालकाची १.२७ कोटीची फसवणूक

Image
मेडिकल दुकान मालकाची १.२७ कोटीची फसवणूक मुंबई / रमेश औताडे  एका डॉक्टर दाम्पत्याने मेडिकल दुकान मालकाची १.२७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून नवी मुंबईच्या एन आर आय पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता ४०६, ४२०, ३४ प्रमाणे  गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रारदार कल्पेश व्यास यांचे मालाड मध्ये  वडीलोपार्जित मेडिकल स्टोअर्स आहे. 2013 मध्ये व्यास यांच्या बिल्डिंग मध्ये राहणारे कन्हैयालाल देराश्री यांनी त्यांचा मुलगा डॉ. धवल  देराश्री आणि त्यांची पत्नी डॉ. लता देराश्री वडील कन्हयालाल देराश्री यांचे नवी मुंबई सीवडुस येथे स्वतः मालकीचे मोठे सुयश हॉस्पीटल असल्याचे सांगितले. या हॉस्पीटलच्या जागेमध्ये एक मेडीकल आस्थापणा आहे. ते मेडिकल आस्थापणा चालवण्याचा परवाना घेतल्यास तुम्हाला आम्ही ते भाड्याने देऊ.  त्यामधुन तुम्हाला व्यवसाय चालु करता येईल असे त्यांनी सांगितले. देराश्री कुटुंबावर विश्वास ठेवून तक्रारदारांनी त्या आस्थपणासाठी ४९ लाख रुपये बँक व्यवहाराने दिले. मेडिकल स्टोअर्स सुरू झाल्यावर या जोडप्याने ४८ लाख रुपयांची औषधे देखील खरेदी...

नाहीतर आम्हाला 'नोटा' चा पर्याय उपलब्ध

Image
नाहीतर आम्हाला 'नोटा' चा पर्याय उपलब्ध मुंबई / रमेश औताडे  वीरशैव लिंगायत समाजाच्या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत विश्वासात न घेता उमेदवारी न मिळाल्यास वीरशैव लिंगायत बहूल मतदार संघात आम्हाला 'नोटा' चा पर्याय उपलब्ध असेल. असा इशारा वीरशैव लिंगायत समाजाचे नेते डॉ. विजय जंगम (स्वामी) यांनी सर्वच राजकीय पक्षांना शनिवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित जाहीर पत्रकार परिषदेत दिला. यावेळी वीरशैव लिंगायत समाजाचे पदाधिकारी रोहिणी जंगम, श्रवण जंगम,सदाशिव बैचे, मिलन जंगम, वैजनाथ स्वामी, श्यामाकांत लिंगायत, दुष्यंत गुरव तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. वीरशैव लिंगायत समाजाचे प्रतिनिधी म्हणून देशाचे उपराष्ट्रपती, केंद्रीय मंत्री, लोकसभा व राज्यसभा खासदार तसेच महाराष्ट्रात मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, विधानसभा आमदार व विधानपरिषद आमदार होऊन गेले आहेत. त्यामुळे या समाजाची ताकद किती आहे हे सर्वांना माहीत आहे. राज्यातील वीरशैव लिंगायत बहुल एकूण ३६ ते ४० मतदारसंघापैकी विविध राजकीय पक्षांनी दिलेली उमेदवारी जागा वगळता इतर मतदार संघात अखिल वीरशैव लिंगायत महासंघ म...

अग्निशमन यंत्रणेनेबाबत अजूनही अनेक शाळा महाविद्यालयात मनमानी कारभार

Image
अग्निशमन यंत्रणेनेबाबत अजूनही अनेक शाळा महाविद्यालयात मनमानी कारभार  मुंबई / रमेश औताडे  शाळा महाविद्यालय मधील अग्निशमन यंत्रणा सुस्थितीत नसल्याने तामिळनाडू येथे ९४ विद्यार्थी मृत्युमुखी पडले होते. त्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने आग प्रतिबंध कायदा कठोर केला होता. प्रत्येक राज्याने त्याची अंमलबजावणी सुरू करा असे आदेश दिले होते. मात्र अजूनही अनेक शाळा महाविद्यालये मनमानी करत कायदा पाळत नाहीत. त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी भीम आर्मी चे महाराष्ट्र प्रमुख अशोक कांबळे यांनी सरकारकडे केली आहे. मुंबईतील वाळकेश्वर येथील गोपी बिर्ला मेमोरियल शाळेमध्ये अग्नी सुरक्षा यंत्राची अद्ययावत स्थिती नसल्याने मोठा वाद झाला होता. अग्निशामक विभागातील काही अधिकारी व शाळा मधील काही अधिकारी मनमानी कारभार करत मुलांच्या जीवाशी खेळत आहेत असा आरोप अशोक कांबळे यांनी केला आहे. ही शाळा यश बिर्ला समूहाद्वारे चालवली जाते. शाळा मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी वर्षा बंगला मलबार हिल येथे आहे. विद्यार्थ्यांचे जीव धोक्यात घालुन अग्नी सुरक्षा नियमाचे उल्लंघन करून मनमानी करण्याचा यांना अधिकार कोणी...

सर्वसामान्य जनतेसाठी "आरक्षणवादी आघाडी "

Image
सर्वसामान्य जनतेसाठी "आरक्षणवादी आघाडी " मुंबई / रमेश औताडे  विधानसभा निवडणूकीत महायुती व महाविकास आघाडीतर्फे दिशाहीन, घराणेशाहीचे, सग्यासोयऱ्यांच्या हिताचे सत्ताकारण केले जात असल्याने मतदारांनी यांना पराभूत करावे व "आरक्षणवादी आघाडी " ला राज्यात सत्ता द्यावी असे आवाहन मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत शुक्रवारी आरक्षणवादी आघाडीची मोट बांधलेल्या नेत्यांनी केले. रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर,  ओबीसी बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश शेंडगे तसेच बीआरएसपी चे  अध्यक्ष ॲड डॉ सुरेश माने आदी पदाधिकारी उपस्थित होते. आमच्याकडे पैसा नाही पण व्होट बँक आहे. या व्होट बँकेच्या माध्यमातून आम्ही आहोत. आत्तापर्यंत एकत्र आलो नव्हतो म्हणून तुमचे फावले होते. मात्र आता तुमचे काही खरे नाही असा इशारा प्रकाश शेंडगे यांनी दिला. मराठा विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध आदीवासी, अनुसूचित जाती-जमातीचे उपवर्गीकरण, आदीवासींचे डि लिस्टींग (आदीबासींना गैरआदीवासी ठरविणे), एकसंघ ओबीसींच्या आरक्षण नावाखाली तुकडे करणे, मुस्लीमांचे ५ टक्के शैक्षणिक आरक्षण नाकारने, या सरकार...

आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा ची पहिली यादी जाहीर

Image
आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा ची पहिली यादी जाहीर मुंबई / रमेश औताडे  तळागाळातील सामान्य माणसाला न्याय देण्यासाठी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चा ने मोठ्या प्रमाणत आंदोलने केली. मोर्चे काढले. उपोषणाच्या माध्यमातून समाजाला न्याय दिला. आता तळागाळातील समाजाला न्याय देण्यासाठी सत्तेत गेले पाहिजे. यासाठी विधानसभेची पहिली यादी जाहीर केली. दुसरी यादी लवकरच प्रसिद्ध होईल. अशी माहिती पत्रकार परिषदेत शाम भाई बागुल यांनी दिली. मुंबई / उपनगर ०१)  चेतन निगम, शिवडी ०२) आर्यन जाधव, वरळी ०३) दिपेश वाघ, भायखळा ०४) श्याम भाई बागुल, कुर्ला (राखीव) ०५)  लक्ष्मण जाधव, घाटकोपर (पू) ०६)  प्रकाश दुपारगुडे, घाटकोपर (प) ०७)  विकास काटे. विक्रोळी ०८)  गौतम म्हस्के, भांडूप ०९)  दिनाबेन वाघेला, मुलुंड १०) सनी वाघेला, दिघा ऐरोली ११)  प्रितम कांबळे, अणुशक्ती नगर १२) ज्योती व्हटकर, सायन कोळीवाडा १३) मा. अनिल सौदा, कालीना १४) मा. नयना राजगोर, अंधेरी पूर्व १५) मा. गिता पाखरे, धारावी (राखीव) महाराष्ट्र प्रदेश साठी  १६) उध्दव तायडे, भुसावळ (राखीव) १७) सय्यद सलीम बापु, माजलगाव...

जागा वाटप निषेधार्थ आठवले गटाचा एल्गार

Image
जागा वाटप निषेधार्थ आठवले गटाचा एल्गार  मुंबई / रमेश औताडे  रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाची भाजपा सोबत विधानसभा निवडणूकीत युती असूनही उमेदवारी वाटप संदर्भात सन्मानपूर्वक वाटाघाटी पूर्ण न झाल्याने गुरुवारी मुंबईत पक्षाच्या कार्यालयासमोर पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून निषेध एल्गार व्यक्त करण्यात आला. भारतीय जनता पक्षाने शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट) यांच्याशी तिकीट वाटपाच्या सन्मानपूर्वक वाटाघाटी केल्या. परंतु रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांना विश्वासात घेतले नाही. रिपाई पक्षाला सन्मानपूर्वक जागा मुंबई व महाराष्ट्रात सोडलेल्या नाहीत. त्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे. मुंबई प्रदेश कार्यकारणीतील व सर्व जिल्हाध्यक्ष तालुकाध्यक्ष, वार्ड अध्यक्ष, युवक आधाडी, महिला आघाडी व विविध आघाडी यांनी संघर्ष नायक राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. रामदास आठवले यांचे आदेश आल्याशिवाय महायुतीची सन्मानजनक जागा वाटपाची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर व मुंबई प्रदेशचा आदेश आपणांस पारीत झाल्यानंतरच आपण आपल्या मतदार सघात निवडणूकीच्य...

महामुंबई उमेदवार अहवाल लवकरच देणार - युवराज सूर्यवंशी

Image
महामुंबई उमेदवार अहवाल लवकरच देणार - युवराज सूर्यवंशी  मुंबई / रमेश औताडे  सध्याचे राजकीय वातावरण पाहता कोण कुठल्या पक्षाचा उमेदवार आहे हे मतदारांना कळेना झाले आहे. संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी या विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात जाहीर घोषणा करून मतदारांना आवाहन केले आहे. मनोज दादा जरांगे पाटील या निवडणुकीत निर्णायक भूमिका घेणार असल्यामुळे महा मुंबईतील संभाव्य उमेदवारांचा अहवाल लवकरच देणार असल्याची माहिती सकल मराठा समाज दक्षिण मध्य मुंबईचे अध्यक्ष व मराठा क्रांती मोर्चा समन्वयक युवराज सूर्यवंशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे. सकल मराठा समाज मुंबई व मराठा क्रांती मोर्चा मुंबई यांच्या वतीने मुंबई विभागातील मुंबई उपनगर, मुंबई शहर ठाणे, रायगड, पालघर , या जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रामध्ये मराठा उमेदवार देण्याची  घोषणा मराठा क्रांती मोर्चा महामुंबईच्या वतीने देण्यात आली आहे . लवकरच जागोजागी विभागवार आढावा बैठक घेऊन  बैठकीचा अहवाल तयार करून संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्याकडे तो सादर करणार आहे. अशी माहिती सकल मराठा समाज दक्षिण मध्...

प्रा. हेमंत सामंत यांचे करिअर मार्गदर्शन

Image
                                                    प्रा .हेमंत सुधाकर सामंत  मुंबई / रमेश औताडे  नवीन शैक्षणिक धोरणानुसार डी. जी. रुपारेल महाविद्यालय, माटुंगा येथे राज्यशास्त्र विभागात विद्यार्थ्यांसाठी तीस तासांचा दोन क्रेडिट पॉईंट मिळतील असा अभ्यासक्रम आयोजित केला होता. त्याच्या समारोपासाठी आणि विद्यार्थ्यांना कोणत्या संधी उपलब्ध होतील यासाठी प्रा. हेमंत सुधाकर सामंत यांचे मार्गदर्शन सत्र ठेवण्यात आले होते आणि अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्रही त्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.  यात त्यांनी उल्लेखलेली क्षेत्रे : मुत्सद्दी (परदेशी सेवा अधिकारी), धोरण विश्लेषक (सरकारी एजन्सी), आंतरराष्ट्रीय मदत कर्मचारी (USAID, UN एजन्सी), गुप्तचर विश्लेषक (CIA, NSA), कार्यक्रम व्यवस्थापक (मानवी हक्क, पर्यावरण संस्था), वकिली विशेषज्ञ (लॉबिंग, सार्वजनिक धोरण), विकास विशेषज्ञ (आंतरराष्ट्रीय विकास संस्था), मानवतावादी कार्यकर्ता (आपत्ती निवारण, निर्वासित समर...

भारतीय राजकीय काँग्रेस पक्ष स्वबळावर लढणार

Image
मुंबई / रमेश औताडे  राज्यातील दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक, बेरोजगार, नोकरीतील आरक्षण आदी महत्वाचे प्रश्न घेऊन भारतीय राजकीय काँग्रेस पक्ष आगामी विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरला असून १६ उमेदवारांची पहिली यादी बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत जाहीर केली. स्वबळावर निवडणूक लढविणार असून उर्वरीत ठिकाणी समविचारी पक्षांच्या उमेदवारांना पाठींबा देण्यात येणार आहे. असे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजेश सोनवणे यांनी सांगितले. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष ई. आनंद यांनी पक्षाचे अधिकृत उमेदवार जाहीर केले. (१) मालाड पश्चिम- जोसेफ चेट्टी (२) माहिम जॉन अल्बर्ट नोरोना, (३) जळगांव ग्रामीण चैतन्यनन्नवरे, (४) जळगांव शहर - अशोक डोंगरे, (५) भुसावळ (अ.जा. राखीव बापु सोनवणे (६) जोगेश्वरी (पूर्व) - शकील अहमद शेख, (७) भांडूप (पूर्व) कारके मैग्लो (८) मुंब्रा- फराहन आझमी, (९) नागपूर - शेख फरास, (१०) मालाड (पूर्व) सिनसेन नाडार (११) कल्याण (पूर्व)- अनंत भिमराव कर्पे, (१२) अनुशक्ती नगर सुरेश मोरे (१३) शिवाजीनगर प्रमोद निकम, (१४) भांडूप (प.) परशुराम माने, (१५) घाटकोपर (पूर्व) अ...

मराठा क्रांती मोर्चाचे आबा पाटील राष्ट्रीय मराठा पार्टीत

Image
मुंबई / रमेश औताडे मराठा आरक्षण या प्रश्नावर आझाद मैदान दणाणून सोडणारे मराठा क्रांती ठोक मोर्चाचे नेते आबा पाटील यांनी बुधवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित जाहीर पत्रकार परिषदेत राष्ट्रीय मराठा पार्टीत प्रवेश केला. महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या हक्काच्या लढ्यातील महत्वाचा टप्पा गाठत, मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या नेत्यांनी व आबा पाटील यांनी केलेला हा महत्वाचा मानला जात असल्याचे पार्टीचे अध्यक्ष अंकुशराव पाटील यांनी यावेळी सांगितले. या निर्णयानंतर मराठा समाजाच्या असंतोषाला एक नवीन दिशा मिळाली आहे. मराठा समाजातील विविध संघटना,  मराठा क्रांती ठोक मोर्चा व इतर संघटनांनी आरक्षणाची ही चळवळ लाखो कार्यकर्त्यांना घेऊन रस्त्यावर लढली. मात्र आरक्षण प्रश्न म्हणावा तसा नाही. म्हणून आता समाजाचे प्रश्न विधानसभेत मांडण्यासाठी पाटील यांच्या प्रवेशाने एक नवी दिशा मिळणार आहे. पार्टी राज्यभारत शंभर ते सव्वाशे उमेदवार उभे करणार आहे.  शेतकरी , शिक्षणात समान संधी, बेरोजगारी आणि सामाजिक न्याय हे  जाहीरनाम्याचे प्रमुख मुद्दे असतील. मराठा समाजाच्या विकासासाठी आणि त्यांच्या हक्का...

अनाथ विधवा गरजू महिलांसाठी तत्पर - सुनीता तूपसौंदर्य

Image
मुंबई / रमेश औताडे दुष्काळी भागात महिलांना चार पाच किलोमीटर वरून पिण्याचे पाणी आणावे लागत होते. त्या माण खटाव लातूर आदी भागात बोअरवेल ची सोय करून त्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. अनाथ विधवा गरजू महिलांना पेन्शन सुरू करत त्यांच्या आरोग्याचा प्रश्न त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी लागणारी तरतूद करण्यासाठी ऑल इंडिया महिला महिला इम्पॉरमेंट पार्टीने केली आहे. अशी माहिती पार्टीच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुनीता तूपसौंदर्य यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, सध्याचे तोडफोडीचे राजकारण पाहता मतदार गोंधळून गेला आहे. मतदारांनी सावध भूमिका घेत जे उमेदवार जनतेच्या मूलभूत प्रश्नावर काम करत आहेत त्यांनाच मतदान करावे. ज्या भागात आमच्या पार्टीने गोरगरीब जनतेची सेवा केली आहे त्याच भागात आम्ही तळागाळातील उमेदवार उभे करणार आहे. महाराष्ट्र मधून आगामी विधान सभेसाठी खटाव ,लातूर,अंधेरी,विक्रोळी,घाटकोपर, मीरारोड, या भागात कोअर कमिटी निर्णय अंती उमेदवार उभे करणार आहे. जे समाजकार्य करत आहेत त्यांनी ९९३०२६२७७७ या क्रमांकावर संपर्क साधला तर त्यांचे कार्य पाहून त्यांना ...

महाराष्ट्राचा इतिहास एका निर्णायक वळणावर

Image
मुंबई / रमेश औताडे  महाराष्ट्राचा राजकीय इतिहास एका निर्णायक वळणावर उभा आहे आणि अशा वेळी जनवादी पक्षाने २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत ९१ जागा लढवण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.  ४१ उमेदवारीची पहिली यादी जाहीर केली आहे. राज्यातील राजकीय, सामाजिक आणि प्रादेशिक परिस्थितीचा बारकाईने अभ्यास करून धोरणात्मकरीत्या ९१ जागा निवडल्या आहेत. अशी माहिती जनवादी पार्टी चे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. संजय सिंह चौहान प्रेस क्लब येथे दिली. यावेळी प्रदेशाध्यक्ष महाराष्ट्र, अर्जुन कुमार राठोड , तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. चौहान यावेळी म्हणाले, जनवादी पार्टीने २०२४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी ऐतिहासिक प्रचार सुरू केला आहे. देशात ५ लाख पार्टीचे सभासद आहेत. ही केवळ निवडणूक विजयाची रणनीती नाही, तर पारंपारिक सत्ता रचनेमुळे लांबून गेलेल्या लाखो उपेक्षित समुदायांसाठी एक निश्चित क्षण आहे असे डॉ. संजय सिंह चौहान यांनी सांगितले. जनवादी पार्टी महाराष्ट्रातील आदिवासी आणि बंजारा समाजाला न्याय, समानता आणि विकास मिळवून देण्याच्या मिशनवर आहे. ऐतिहासिकदृष्ट्या दुर्लक्षित अस...

केंद्रिय सचिवपदी श्रीकांत नायक यांची निवड

Image
मुंबई / रमेश औताडे  राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या केंद्रिय सचिवपदी श्रीकांत नायक यांची निवड केल्याची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे मंगळवारी केली. श्रीकांत नायक यांचा संपर्क महाराष्ट्रात तर आहेच परंतू महाराष्ट्राबाहेर देखील असल्याने पक्ष बांधणी साठी ते उपयोगीच पडणार असल्याची खात्री पक्षाला असल्यानेच त्यांच्यावर केंद्रीय सचिव पदाची जबाबदारी सोपवली आहे. असेही अण्णासाहेब कटारे यांनी सांगितले. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची ताकद दिवसेंदिवस महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील झपाट्याने वाढत आहे. सर्वच समाजघटक राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षा मध्ये दाखल होत आहे. "We Are Republican "आम्ही रिपब्लिकन" हे अभियान संपूर्ण देशात पक्षाचे वतीने प्रभावीपणे सुरू आहे. या अभियानास सर्वच स्तरातून उत्स्फूर्त पाठिंबा व समर्थन मिळत आहे. समाजातील जेष्ठ प्रतिष्ठीत व्यक्ती वकील, इंजिनियर, प्राध्यापक, डॉक्टर, साहित्यिक , शाहीर, कवी, गायक, उद्योजक, व्यापारी, कलाकार देखील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात सामील होऊन समाजाला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न करी...

महापालिकेच्या सेवानिवृत्तांचा सांस्कृतिक सोहोळा

Image
मुंबई / रमेश औताडे  बृहन्मुंबई महानगरपालिका पेन्शनर्स असोसिएशनच्या गोरेगाव विभागातर्फे नुकतेच प्रबोधन क्रीडा भवनातील सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले हाेते. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री सुभाष देसाई आणि बृहन्मुंबई महानगरपालिका पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकर क्षीरसागर उपस्थित होते.  जुनी पेन्शन आणि नवीन पेन्शनमधील फरक समजावून सांगून महापालिका कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजनेसाठी प्रयत्नशील असल्याचे देसाई यांनी सभासदांना सांगितले. या वेळी संघटनेच्या नीता मांजरेकर, राजश्री श्रोत्रिय, ललिता भट, संजय भातखंडे, गौरी वंदना, राजन नाईक, अजित कदम यांनी सुमधुर गाणी म्हणत श्रोत्यांचे मनोरंजन केले. आनंद पुरंदरे यांनी कवितांचे वाचन करीत सर्वांना आनंद दिला. या कार्यक्रमासाठी संजय मोरे, बळीराम कदम, ज्ञानदेव कदम, आनंद पुरंदरे, भुवड , बंगेरा, जगदाळे, सुनील माने, पडवळ, स्वरदा दाते,  निलिमा जवंजाळ, प्रबोधन क्रीडा भवनाचे प्रमुख कार्यवाह गोविंद उर्फ विजू गावडे यांचे सहकार्य लाभले.

अग्रवाल परिषदेची " कोजागिरी " गरबा दांडिया

Image
अग्रवाल परिषदेची " कोजागिरी "  गरबा दांडिया मुंबई / रमेश औताडे  अखिल भारतीय अग्रवाल परिषद (ठाणे) संस्थेतर्फे कोजागिरी शरद पौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर शनिवारी १९ ऑक्टोबरला सायंकाळी ७ वाजल्यापासून जलसा गार्डन, घोडबंदर रोड, ठाणे येथे रास गरबा रात्रीचे आयोजन करण्यात आले होते.  भरपूर गर्दी, रंगीबेरंगी वेशभूषा, दमदार संगीत, गायिका दिव्या जोशी गणात्रा यांनी विविध दांडिया नृत्य सादर केले. कार्यक्रमाचे समन्वयक नितीन बाजारी यांनी भविष्यातही असे दांडियाचे कार्यक्रम आयोजित करण्यात येतील असे सांगितले. संस्थेचे अध्यक्ष शसुभाष अग्रवाल, उपाध्यक्ष सुरेश पहाडीया आणि अशोक जैन यांनी उपस्थितांचे आभार मानले. संदीप गर्ग,  राजेश गुप्ता, संजीव अग्रवाल, सुदेश अग्रवाल, कृष्णा मित्तल, अशोक अग्रवाल,  नवीन अग्रवाल, व्यंकटेश अग्रवाल, नितेश बन्सल,  संजय मित्तल, देवेंद्र गुप्ता,  चतुर्भुज अग्रवाल, वीरेंद्र रुंगटा, घनश्याम अग्रवाल,  तरुण गुप्ता,राकेश गोयल, राजीव अग्रवाल, मनीष बिरोलिया, राजंत अग्रवाल, नरेंद्र अग्रवाल, राजेश अग्रवाल, दिनेश गोयल आणि  खेमचंद मित्तल, स...

या " जन्मावर " या " मरणावर " शतदा प्रेम करावे

Image
या " जन्मावर "  या  " मरणावर " शतदा प्रेम करावे मुंबई / रमेश औताडे  सर्वांना परिचित असलेले गाणे  " या जन्मावर ...या जगण्यावर ... शतदा प्रेम करावे " संपूर्ण जीवनाचे सार सांगून जाते हे गाणे. मात्र अवयव दान केले तर " या " मरणावर "  शतदा प्रेम करावे असे आपल्या मृत्युनंतर जग बोलू लागेल. त्यासाठी अवयव दान चळवळ व्यापक करत " अवयवदान सैनिकांचे "  जाळे निर्माण करण्याची गरज आहे.  मुंबई मराठी पत्रकार संघ " द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी डोनेशन " या अवयव दान संस्थेला सर्वतोपरी सहकार्य करेल असे मुंबई  पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी सांगितले. मुंबई मराठी पत्रकार संघ आणि फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड डोनेशन मुंबई यांच्या वतीने अवयवदान आणि नेत्रदानाबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. १४० कोटीच्या देशात मागील वर्षी फक्त १०२० जणांनी केले अवयव दान केले. खेदाची बाब जरी असली तरी अजूनही कोट्यवधी जनतेला अवयव दान म्हणजे काय हेच माहिती नाही. यासाठी जनजागृती करण्याची गरज आहे असे " द फेडरेशन ऑफ ऑर्गन अँड बॉडी ड...

महाराष्ट्रात बसपचा पहिला आमदार धारावीत

Image
शिवसेना शिंदे गटाचे मनोहर रायबागे बसापत मुंबई / रमेश औताडे  महाराष्ट्रात सध्या जे राजकारण सुरू आहे ते पाहता बहुजन समाज पार्टीत विविध पक्षातील नेते प्रवेश करत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे विभाग संघटक मनोहर रायबागे यांनी हजारो समर्थकसह बसपात जाहीर प्रवेश केला. या भागातील बेरजेचे राजकारण पाहता व रायबागे यांची या भागात असणारी जनसेवा पाहता महाराष्ट्रात बसपचा पहिला आमदार धारावितून होणार असे बसपाचे राज्य प्रभारी एन.पी.अहिगार यांनी सांगितले. मुंबईत बी.एस. पी.भवन, चेंबूर येथे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी एन.पी.अहिगार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील डोंगरे, मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रा.प्रवीण धोत्रे,  मुंबई प्रभारी रामसुमेर जैसवार, श्यामलाल जैसवार, अनिल भंडारे , रामब्रिज जैसवार, सुनील शिंदे उपस्थित होते.  आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीचा पुनर्विकास झाला नाही. येथे अनेक वर्ष काँग्रेसच्या आमदारांनी फक्त स्वतःच्या विकासावर लक्ष दिले. धारावीला वेठीस धरून स्वतःची ताकद वाढवली.त्यामुळे मतदार  गायकवाड परिवाराला त्यांची जागा दाखवणार असे एन.पी.अहिगार म्हणाले. पार्टीची उम...

देशाचा विकास काँग्रेसने जगाला दाखवला आहे

Image
देशाचा विकास काँग्रेसने जगाला दाखवला आहे मुंबई / रमेश औताडे  विकास म्हणजे काय असतो हे काँग्रेस ने पहिल्यापासून जगाला दाखवले आहे. विकासाची बीजे काँग्रेसने पेरली होती. त्याचा आता वटवृक्ष झाला आहे. आता हवसे नवसे गवसे सांगत आहेत की आम्हीच विकास केला. पण सत्य समोर आले आहे. त्यामुळे विकासाबरोबरच  रोजगार व स्वयंरोजगार काय असतो हे सुध्दा काँग्रेसनेच दाखवले आहे व आजही दाखवत आहे.असे मत काँग्रेस प्रवक्ते व स्लम सेल विभाग मुंबई अध्यक्ष सुरेशचंद्र राजहंस यांनी व्यक्त केले. मुंबई काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या वतीने नवनियुक्त पदाधिकारी यांना राजीव गांधी भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी रोजगार व स्वयंरोजगार विभाग मुंबई अध्यक्ष जयवंतराव लोखंडे, काँग्रेस प्रवक्ते आणि स्लम सेल विभाग मुंबई अध्यक्ष सुरेशचंद्र राजहंस, प्रा. उज्ज्वला जाधव आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.

अखेर नितीनला आपण श्वास देऊ शकलो नाही

Image
अखेर नितीनला आपण श्वास देऊ शकलो नाही मुंबई / रमेश औताडे  कमी वयात निधन झालेल्या पत्रकार नितीन चव्हाण यांच्या उपचारासाठी आपण कुठेतरी कमी पडलो.अखेर नितीनला आपण श्वास देऊ शकलो नाही अशी खंत मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी पत्रकार भवनात शुक्रवारी आयोजित शोकसभेच्या वेळी व्यक्त केली.  मुंबई मराठी पत्रकार संघाचे दिवंगत सदस्य ज्येष्ठ पत्रकार विजय वैद्य, नितीन चव्हाण व रघुनाथ घानकुटकर यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी शुक्रवार १८ ऑक्टोबर रोजी सायंकाळी पत्रकार भवनात शोकसभा आयोजित करण्यात आली होती. पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, विश्वस्त देवदास मटाले, विश्वस्त राही भिडे, संयुक्त कार्यवाह सुरेश वडवलकर, माजी अध्यक्ष प्रसाद मोकाशी,ज्येष्ठ पत्रकार योगेश त्रिवेदी, दूरदर्शनचे जयू भटकर, विलास मुकादम, सदानंद खोपकर आदी पत्रकार उपस्थित होते.  यावेळी संदीप चव्हाण म्हणाले, विजय वैद्य यांचे ग्रंथ प्रेम मोठे होते. पुस्तक त्यांचा प्राण होता. योगेश त्रिवेदी यांच्या वडिलांची इच्छा होती की त्यांच्या चितेवर त्यांच्या आहुती वृत्तपत्राचा अंक ठेवावा. तर विजय वैद्य म्ह...

भाषण करताना कोणताही धर्म दुखावला जाऊ नये

Image
भाषण करताना कोणताही धर्म दुखावला जाऊ नये मुंबई / रमेश औताडे  राज्यातील मुस्लिम समाजाला टार्गेट करत आमदार नितेश राणे जी वक्तव्य करत आहेत ती गंभीर आहेत. श्री रामगिरी महाराज आणि श्री सरस्वती महाराज यांनी प्रत्युत्तर देताना राग आणि निषेध व्यक्त करून मुस्लिम समाजातील महान व्यक्ती बद्दल वाईट बोलून त्यांचा अपमान केला आहे. या विधानांमुळे केवळ मुस्लिम समाजच नाही तर जगभरातील लोक दुखावले गेले आहेत. या पार्श्वभुमीवर आमदार नितेश राणे यांच्या विरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखल करणार असा इशारा  मो. रेहान आय मेमन यांनी मुंबई प्रेस क्लब येथे दिला. भाजप सत्तेत आल्यापासून धार्मिक अल्पसंख्यांक मध्ये भेदभाव केला जात आहे. त्यामुळे  नितेश राणे यांनी तात्काळ माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षण केले पाहिजे तसेच त्यांना आदराने वागवले पाहिजे. नितीश राणेंच्या वक्तव्यामुळे मुस्लिम अल्पसंख्याक दु:खी झाले आहेत. आमदार नितेश राणे हे महाराष्ट्र राज्यातील मुस्लिम समाजाला जेव्हा जेव्हा टार्गेट करणार तेव्हा तेव्हा त्यांना आम्ही विरोध करणार तसेच आंदोलन देखी...

ज्येष्ठांच्या आनंदासाठी " सकारात्मक विचार " हेच औषध

Image
ज्येष्ठांच्या आनंदासाठी " सकारात्मक विचार " हेच औषध  मुंबई / रमेश औताडे  ज्येष्ठ नागरिकांनी सतत सकारात्मक विचार करून आनंदी राहावं व बदलत्या काळात स्वतः बदल करून घ्यावा. ज्येष्ठांच्या आनंदासाठी  " सकारात्मक विचार " हेच औषध आहे. जर काही समस्या असतील तर " मातापिता आणि ज्येष्ठ नागरिक कायदा " याचा आधार घेऊन आमची मदत तुमच्या सोबत २४ तास उपलब्ध आहे. असा विश्वास आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ नागरिक समस्या  अभ्यासक प्रकाश नारायण बोरगांवकर ज्येष्ठांना दिला. आंतरराष्ट्रीय ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त बोरगावकर बोलत होते. ज्येष्ठांच्या संपत्तीचे आणि जिविताचे रक्षण करण्यासाठी हा कायदा प्रभावी असल्याचे त्यांनी सांगितले. ज्येष्ठांना तीर्थयात्रा योजना आणि वयोश्री योजने बरोबर अनेक योजना आहेत. त्यांचे आरोग्य व घरातील वारस हक्क वाद सोडविण्यासाठी आमची संस्था सदैव सहकार्य करत आहे. प्रत्येक ज्येष्ठ नागरिक संघाने समुपदेशक कक्ष सुरू करून ज्येष्ठांच्या समस्या सोडवल्यास ज्येष्ठ नागरिक न्यायाधिकरणातील  खटले कमी होऊन त्यांचा ताण कमी होईल असे  कायदे विषयक सल्लागार ॲड प्रमोद ...

गोकुळधाम सोसायटीची नवरात्रीत अंधारातच आरती

Image
 गोकुळधाम सोसायटीची नवरात्रीत अंधारातच आरती मुंबई / रमेश औताडे  गोकुळधाम सोसायटी नवरात्रोत्सव साजरा करण्यासाठी सज्ज होत सोसायटी सजवण्याचे काम हाती घेते. उत्साही पारंपारिक पोशाख परिधान केलेले  रहिवासी दुर्गादेवीच्या आरती आणि गरब्यासाठी जमतात, परंतु उत्सव सुरू होताच,  वीज कापली आणि सोसायटी रहिवाशी अंधारातच न थांबता आरती करतात. गोकुळधाम या उपद्रवावर मात करेल का ? यासाठी पाहत रहा तारक मेहता का उल्टा चष्माचा पुढचा भाग. सोनी सब टीव्हीवर रात्री 8:30 ते 9:00 या वेळेत पहा. https://youtu.be/3dNmwNHv7M4 मागील भागाचा सारांश यापूर्वी, मंडपाची सजावट थांबवण्याची धमकी दिली होती, परंतु बापूजींनी पुढाकार घेत सर्वांना पुढे जाण्यास प्रेरित केले. एपिसोड असेल चुकला? ते येथे पहा  https://youtu.be/RojBbNhZ-4c

उंदीर मारण्याच्या चिकटपट्टी बाबत गैसमज

Image
मुंबई / रमेश औताडे  उंदीर मारण्यासाठी जी चिकटपट्टी वापरली जाते त्या पट्टी बाबत अनेक गैरसमज पसरवले जात असून सत्य बाहेर आले पाहिजे. यासाठी चिकटपट्टी उत्पादन असोसिएशन ने मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोपांचे खंडन केले असून ही चिकटपट्टी वापरू शकता असे आवाहन यावेळी केले. जीबीएमए  ग्लू बोर्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, ग्लू बोर्ड उत्पादक आणि पुरवठादार यांच्या वतीने उंदीर नियंत्रणासाठी जी चिकटपट्टी वापरली जाते त्याने उंदराला त्रास होतो असा आरोप प्राणी संघटनेने केला होता. मात्र याला कोणताही शास्त्रीय आधार नाही असे असोसिएशनचे सचिव मुकेश पटेल यांनी सांगितले. यावेळी प्रवीण पाटील, फैयाज कालोलवाला, गुरुराज अग्निहोत्री हे पदाधिकारी उपस्थित होते. लेप्टोस्पायरोसिस आणि प्लेग यांसारख्या  रोगांचा प्रसार नियंत्रित करून सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी उंदीर मारण्यासाठी या चिकटपट्टी जगभर वापरल्या जातात. प्राणी प्रेमी याबाबत उपाय देत नाहीत मात्र विरोध करतात हे योग्य नाही. रेल्वेच्या बोगीत ए सी मध्ये उंदीर मेला तर त्याचा वास प्रवासी सहन करू शकत नाहीत याबाबत...

माजी विद्यार्थ्यांकडून शाळेस संगणक भेट

Image
माजी विद्यार्थ्यांकडून शाळेस संगणक भेट मुंबई / रमेश औताडे  शाळेतील जुन्या मित्रांना भेटणे व आपल्या शिक्षकांच्या व शाळेच्या जुन्या आठवणींना उजाळा देणे म्हणजे एक मोठा आनंदाचा क्षण असतो. २२ वर्षांनी श्री निनाई देवी विद्यालय तुळसण च्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा नुकताच संपन्न झाला. माजी विद्यार्थ्यांनी शाळेला संगणक घेण्यासाठी आर्थिक मदत केल्याचे निनाईदेवी विद्यालयाचे मुख्याध्यापक पाटील सर यांनी सांगितले. या आनंदाच्या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर कल्याण कुलकर्णी, हणमंत शेवाळे, रघुनाथ पाटील, संभाजी खोचरे,  सदानंद शेवाळे, रमेश वीर काका,  हणमंत चव्हाण भाऊ उपस्थित होते. स्नेहमेळावा नियोजन वैशाली माने, वंदना पाटील, सिमा पोळ, उज्वला मोळावडे, स्वाती गुरव, स्वाती मोरे, बाबासो खोत, अमोल मोरे, अभिषेक वीर, हिम्मत वीर, भगवान वीर यांनी नियोजन केले तर विजय मोहिते यांनी सूत्रसंचालन व सीमा पोळ यांनी आभार मानले.

एसटी चालक वाहकांना आता थंडगार विश्रांती कक्ष

Image
एसटी चालक वाहकांना आता थंडगार विश्रांती कक्ष मुंबई / रमेश औताडे  एसटी बस चालक वाहकांना विश्रांती करण्यासाठी आता थंडगार वातानुकूलीत विश्रामकक्ष उपलब्ध होणार आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मुंबई सेंट्रल येथील राज्यातील पहिल्या वातानुकुलीत चालक- वाहक विश्रांती कक्षाचे उद्घाटन झाले. यावेळी मुंबईचे पालकमंत्री तथा शिक्षणमंत्री  दीपक केसरकर व एसटीचे अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा नियोजन समितीच्या निधी द्वारे राज्यातील वेगवेगळ्या आगारातून बसेस घेऊन येणाऱ्या सुमारे ३०० चालक- वाहकांसाठी तसेच मुंबई आगारातील १०० चालक - वाहकांच्यासाठी सुमारे ९० लाख रुपये खर्चून वातानुकुलीत  ३ अत्याधुनिक विश्रांती कक्ष बांधण्यात आले आहेत. या विश्रांती कक्षांमध्ये टू टिअर बॅक बेड सह, करमणूक कक्ष, जेवणासाठी स्वतंत्र हॉल , स्वच्छ व टापटीप अशी प्रसाधनगृहे निर्माण करण्यात आली आहेत. अशाच प्रकारचे वातानुकूलित विश्रांती कक्ष परळ, कुर्ला नेहरूनगर ,बोरवली नॅन्सी कॉलनी येथील आगारात तयार करण्यात येणार असून ठाण्यातील खोपट बस स्थानका वर दुसरे वातानुकूलित कक्ष बांधून तयार झाले आहे....

जिथे नाही सन्मान तिथे करणार नाही मतदान

Image
जिथे नाही सन्मान तिथे  करणार नाही मतदान मुंबई / रमेश औताडे  लोकशाहीच्या मूल्यांचे रक्षण करण्यासाठी मतदानाचे परिवर्तन होणे महत्त्वाचे आहे. मात्र जिथे मतदारांचा सन्मान होत नाही तिथे आम्ही मतदानच करणार नाही असा इशारा आंबेडकर रिपब्लिकन मोर्चा चे  राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बागडे यांनी दिला.   नागपूर येथे धम्म चक्र परिवर्तन दिनानिमित्त आयोजित मतदार परिवर्तन मेळाव्यात ते बोलत होते. मतदारांनी आपल्या मतांचा अधिकार जर, जात, धर्म, परंपरागत  पक्ष,घराणेशाही यात अडकवून ठेवला तर लोकशाहीला ते घातक ठरते असे बागडे यांनी सांगितले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शालिक बांगर, प्रमुख पाहुणे रेखा राणगावकर होत्या. देवेंद्र बागडे, उद्धव तायडे, पौर्णिमा पाईकराव, डॉ सुधा जनबंधू, विकास काटे, नामदेवराव निकोसे, न्यायाधीश सुरेश घाटे, उत्कर्षा थुल, सुनिता गायकवाड,  दिलिप कदम, इतर पदाधिकारी उपस्थित होते. पुरातत्व अधिक्षक नामदेवराव निकोसे यांनी नागपूर जिल्ह्याच्या वतीने संघर्ष निधी म्हणून पांच लाख एकावन्न हजार रुपये देण्याची घोषणा केली. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संघट...

न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचा विद्यापीठाला विसर

Image
न्यायालयाच्या मार्गदर्शक तत्वांचा विद्यापीठाला विसर  मुंबई / रमेश औताडे  सर्वोच्च न्यायालयाने अंध विद्यार्थ्यांच्या शाळा महाविद्यालय किंवा विद्यापीठ या ठिकाणी त्यांना उपयुक्त असणाऱ्या सोयी सुविधा मिळण्यासाठी एक मार्गदर्शक तत्त्व  पॉलिसी केली आहे. मात्र त्याचा विसर शाळा महाविद्यालय व विद्यापीठाला पडला असल्याने अंध विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.  सरकारने या प्रकरणी गांभीर्याने दखल घेत राज्यातील सर्व शाळा महाविद्यालय व संबंधित शिक्षण यंत्रणा विद्यापीठ या ठिकाणी अंध विद्यार्थ्यांच्या सोयी सुविधा साठी संबंधित आस्थापना व प्रशासनाला आदेश द्यावेत अशी मागणी अंध विद्यार्थ्यांनी केली आहे. रेल्वे बस विमानतळ आदी ठिकाणी अंध व्यक्तींसाठी ब्रेल लिपीत मार्गदर्शक सूचना व मार्गिका यंत्रणा बसवल्या असतात. मात्र अनेक ठिकाणी आर्थिक कारणामुळे त्याचा  अभाव दिसून येतो. त्यामुळे अंध व्यक्तींना त्यांच्या दैनंदिन कामांमध्ये अडथळे निर्माण होतात व अपघात होण्याची शक्यता अधिक असते अनेक ठिकाणी अपघातही झालेलेआहेत.  आर्थिक कारण देत अंध व्यक्तींच्या सोयीसुविधा कडे दुर्लक्ष करणारे ...

सरकारी कारभाराविरोधात शेतकऱ्यांचे अन्नत्याग

Image
मुंबई / रमेश औताडे  सरकारी अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभारामुळे खरिब व रब्बी हंगामात नोंदीचा गोंधळ झाल्याने धान पिकाचे शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे न मिळाल्याने शेतकरी नेते लोकमित्र रमेश यशवंत हिंदुराव यांनी अन्नत्याग उपोषणाचा इशारा दिला आहे. भात धान सन २०२० व २०२१ मधील शेतकऱ्यांचा राहीलेला बोनस मिळावा म्हणून शेतकरी नेते रमेश हिंदुराव हे ४ ऑक्टोबर पासून उपोषणास आझाद मैदानात बसले आहेत. ७ दिवस होऊनही मंत्री छगन भुजबळ यांनी शेतकऱ्याची भेट न घेतल्याने शेतकऱ्यामध्ये सरकार बदल तिव्र नाराजी दिसून येत आहे. याबाब आम्ही शेतकरी १८ मे २०२२ पासून पत्रव्यहवार करीत आसून उपमुख्य मंत्री अजित पवार , मंत्री छगन भुजबळ , मंत्री  रविंद्र चव्हाण यांनी आश्वासन देऊनही शब्द पुर्ण न केल्याने सोमवार १४ ऑक्टोबर  पासून मुरबाड तहसील कार्यालय येथे शेतकरी अन्नत्याग उपोषणाला बसणार आहेत. भात धान या बाबतचा अहवाल मंत्रालयात सादर झाला असून त्यावर सरकारने कार्यवाही करावी व लाडक्या बहिणी प्रमाणे वंचीत लाडक्या भावांना मदत करावी असे शेतकरी बांधव बोलत  आहेत.

आता मंत्रालयात उड्या मारल्या आहेत , आता अंत पाहू नका

Image
 मुंबई / रमेश औताडे  केंद्र सरकारने धनगर समाजाची १९५६ साली जात निहाय यादी काढली होती. त्यानंतर धनगर ऐवजी धनगड हा स्पेलिंग चा घोळ झाला आणि धनगर समाजाचे पिढी उध्वस्त झाली. त्याची शिक्षा हा समाज आजही भोगत आहे. धनगर समाजाने शेकडो आंदोलने केली. काही लोकांनी मंत्रालयामधून उड्या टाकल्या. तरीही सरकार गंभीर नाही. त्यामुळे आता जर सरकारने  धनगर समाजाचा विचार केला नाही तर आगामी निवडणुकीत सरकारला महागात पडेल. असा इशारा धनगर समाजाचे नेते प्रकाश आण्णा शेंडगे यांनी शुक्रवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. १६ सप्टेंबर २०२४ रोजी चंद्रकांत दादा पाटील यांच्या सोबत एक बैठक झाली. सरकारने लेखी आदेश देखील आम्हाला दिले. खिलारे समाजाला धनगर म्हणून ६ दाखले दिले होते मात्र ते रद्द केल्यामुळे धनगर समाज आंदोलन करायला लागले.  आता  राज्य सरकार जी आर काढेल किंवा नाही याची आम्हाला शंका आहे. त्यामुळे सरकारने या समाजाचा अंत पाहू नये.  १४ ऑक्टोबर २०२४ रोजी सरकार सोमवारी शेवटची कॅबिनेट घेण्याची शक्यता आहे. आम्ही सरकारला इशारा देत आहेत सरकारने लेखी आदेश अहव...

आचारसंहिते पूर्वीची " उमेद"

Image
मुंबई / रमेश औताडे  निवडणुका आल्या की मतांच्या जोग्व्यासाठी सरकार विविध कल्याणकारी योजनांचा पाऊस पाडत असते. मात्र या योजना पूर्ण होण्यासाठी जे कागदी घोडे नाचवावे लागतात त्या काळात आचारसंहिता येते व पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी अवस्था जनतेची होत असते. असाच प्रकार " महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान " उमेद चा झाला आहे. उमेद च्या स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत २८०४ कंत्राटी अधिकारी, कर्मचारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेणे. या व इतर मागण्या घेऊन आझाद मैदानात राज्यभरातील उमेद च्या आंदोलनकर्त्यानी सरकारला जागे करण्यासाठी उपोषणाचे अस्त्र बाहेर काढले आहे. मिलिंद बाचल, प्रभाकर गावडे, स्वप्नील शिर्के, रुपाली नाकडे, प्रभाकर गावडे,निर्मला शेलार,अलंकार बनसोडे, बाबासाहेब सरोदे आदी पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. उमेद संघटनेच्या वतीने ७ ऑक्टोबर २०२४ पासून आझाद मैदान येथे प्रभाकर गावडे संघटनेचे मार्गदर्शक तथा कृती समिती सदस्य प्रेरिका आमरण उपोषणाला बसले आहेत. सर्व महिला व कर्मचारी आंदोलनात...

आचारसंहिते पूर्वीची " उमेद"

Image
मुंबई / रमेश औताडे  निवडणुका आल्या की मतांच्या जोग्व्यासाठी सरकार विविध कल्याणकारी योजनांचा पाऊस पाडत असते. मात्र या योजना पूर्ण होण्यासाठी जे कागदी घोडे नाचवावे लागतात त्या काळात आचारसंहिता येते व पुन्हा ये रे माझ्या मागल्या अशी अवस्था जनतेची होत असते. असाच प्रकार " महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान " उमेद चा झाला आहे. उमेद च्या स्वतंत्र कायमस्वरूपी विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता देऊन सर्व कार्यरत २८०४ कंत्राटी अधिकारी, कर्मचारी यांना शासनाच्या समकक्ष पदावर कायमस्वरूपी सेवेत समाविष्ट करून घेणे. या व इतर मागण्या घेऊन आझाद मैदानात राज्यभरातील उमेद च्या आंदोलनकर्त्यानी सरकारला जागे करण्यासाठी उपोषणाचे अस्त्र बाहेर काढले आहे. प्रभाकर गावडे, स्वप्नील शिर्के, रुपाली नाकडे, प्रभाकर गावडे,निर्मला शेलार,अलंकार बनसोडे, बाबासाहेब सरोदे आदी पदाधिकारी आंदोलनात सहभागी झाले आहेत. उमेद संघटनेच्या वतीने ७ ऑक्टोबर २०२४ पासून आझाद मैदान येथे प्रभाकर गावडे संघटनेचे मार्गदर्शक तथा कृती समिती सदस्य प्रेरिका आमरण उपोषणाला बसले आहेत. सर्व महिला व कर्मचारी आंदोलनात सहभागी झाले ...

अन्याया विरोधात आदिवासींचे जारण तारण कारण मंत्र आंदोलन

Image
मुंबई / रमेश औताडे आदिवासी जमातिचा जल जंगल जमीन चा परंपरागत अधिकारांचा प्रश्न सुटलेला नाही. रोजगाराचा अभाव असल्याने स्थलांतर पाचवीलाच पुजलेले आहे. सरकारी योजना, सवलती, राखीव जागा, शिक्षण यांची अंमलबजावणी धिम्या गतीने चालू आहे. त्यातच शिंदे फडणवीस अजितदादा सरकारने आदिवासी जमाती  धनगर जातीची घुसखोरी करण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यामुळे १० ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून जारण तारण कारण पूजा विधी महाराष्ट्रातील आदिवासी बहुल भागामध्ये सुरू करण्यात येईल असा इशारा मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत आदिवासी नेते करणसिंग कोकणी, रंजीत गावित, विक्रा गावित यांनी दिला. घटस्थापना हा आदीमातेचा उत्सव आहे. सर्व भगत पुजारी उपाशीपोटी पूजा विधीला बसलेले आहेत. आणि याच पूजा विधीच्या शेवटी ते या घट उठवण्याच्या दिवशी  आवाहन करणार आहेत. आप, वायू, तेज, इत्यादी पंचमहाभूतांना आदिवासी हितासाठी जागवून त्यांना आवाहन करण्यात येणार आहे. दसऱ्यापासून गावोगाव पूजा विधी मंत्राच्या जागरातूनही शिंदे फडणवीस पवार सरकारची दुर्बुद्धी दूर झाली नाही तर मंत्राचा दुसरा टप्पा वापरावा लागेल असा इशार...

१०५८ उमेदवारांना एसटीच्या सेवेत सामावून घेणार

Image
मुंबई  / रमेश औताडे सरळ सेवा भरती सन २०१९ अंतर्गत अतिरिक्त यादीवरील एकूण १०५८ उमेदवारांना एसटीच्या सेवेमध्ये चालक तथा वाहक या पदावर सामावून घेतले जाणार आहे. अशी माहिती एसटी महामंडळाचे अध्यक्ष भरत गोगावले यांनी दिली. सन २०१९ च्या भरतीमध्ये निवड झाल्यापैकी गैरहजर अथवा अपात्र ठरलेल्या उमेदवारांच्या ऐवजी त्याच भरती मधील प्रतीक्षा यादीवरील सुमारे ३३७ उमेदवारांना नेमणूक देण्याची प्रक्रिया महामंडळात सुरू करण्यात येत आहे. तसेच, प्रतीक्षा यादीवरील उर्वरित सर्व ७२१ उमेदवारांना आवश्यकते प्रमाणे व रिक्त जागेनुसार रा.प.सेवेत सामावून घेण्याची कार्यवाही करणेबाबत निर्णय घेण्यात आला आहे.असे गोगावले यांनी सांगितले. या संदर्भात संबंधित उमेदवार, लोकप्रतिनिधी यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अध्यक्ष .भरत गोगावले यांना भेटून निवेदन सादर केले होते. त्यांच्या निवेदनाचा सहानुभूतीपूर्वक विचार करून त्यांना तातडीने नेमणुका देण्याच्या सूचना अध्यक्ष भरत गोगावले यांनी दि. ०१.१०.२०२४ रोजीच्या रा.प.महामंडळाच्या संचालक मंडळाच्या बैठकीत दिल्या होत्या. त्यानुसार संबंधितांना नेमणुका देण्या...

आचारसंहितेचा फटका बसण्याअगोदर राज्यातील सर्वच अन्यायग्रस्त एकाच छताखाली

Image
मुंबई / रमेश औताडे  राज्यातील सर्वच अन्यायग्रस्त घटकाला आचारसंहितेचा फटका बसू नये व त्यांच्या प्रलंबित मागण्या पूर्ण होऊन त्यांना न्याय मिळावा यासाठी आम आदमी पार्टीचे राज्य उपाध्यक्ष धनंजय शिंदे यांनी सर्व घटकाला एकच छताखाली आणून त्यांना न्याय देण्यासाठी बुधवारी ९  ऑक्टोबर रोजी आझाद मैदानात आंदोलनाची हाक दिली आहे. राज्यातील सर्वच दमघटकांच्या विविध मागण्यांसाठी राज्य शासनाशी गेल्या अनेक महिन्यांपासून आम्ही पाठपुरावा करत आहे.तरीही त्यांचे प्रश्न सुटलेले नाहीत. पुढील काही दिवसांत आचार संहिता लागल्यास नवीन सरकार बनेपर्यंत हे प्रश्न आधांतरीत राहतील म्हणून या राज्यातील अन्यायग्रस्त घटकामध्ये प्रचंड अस्वस्थता आहे त्यामुळे हे आंदोलन होत आहे. कोविड च्या काळात जनतेसाठी लढलेले कोविड योद्धे या आंदोलनात असतील, तसेच आरोग्यसेवक परीक्षा मेरिट मध्ये उत्तीर्ण होऊनही अपात्र ठरलेल्या महिला व पुरुष परिचारिका, एम पी एस सी मार्फत आगामी राज्यसेवा आणि कम्बाईन गट "ब" व "क" परीक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, बी एम सी च्या आगामी भरतीमध्ये स्थान मिळावे म्हणून न्याय मागणारे प्रकल्पग...

देशातील ३२ राज्यातून " स्वच्छतादूत " म्हणून धारावीतील महिलेची निवड

Image
 देशातील ३२ राज्यातून " स्वच्छतादूत " म्हणून धारावीतील महिलेची निवड मुंबई / रमेश औताडे  सातारा जिल्ह्यातील दुष्काळी माण तालुक्यातील एक महिला आशिया खंडात परिचित असलेल्या धारावी सारख्या ठिकाणी येऊन महिलांना एकत्र करत स्वच्छ्ता अभियान व महिला बचत गटाचे काम करत करते. त्या महिलेची देशभरातील ३२ राज्यांतून स्वच्छतादूत म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत निवड होते. हे आमचे भाग्यच आहे. यापेक्षा आम्हाला अजून काय पाहिजे. असे सांगत धारावी व माण तालुक्यातील जनतेने निवड झालेल्या स्वच्छतादूत रेणुका सोनवणे यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.  ‘स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान’ अंतर्गत घरोघरी जाऊन कचरा गोळा करणे व वस्ती स्वच्छ्तेची कामे रेणुका सोनवणे यांनी महिला बचत गटाच्या माध्यमातून केली व करत आहेत.  सातारा जिल्ह्यातील म्हसवड, तालुका माण येथील शंकूतला आण्णा खाडे (पुजारी) यांच्या त्या कन्या आहेत. १९९७ साली लग्नानंतर त्या धारावीतील पारशी चाळ येथे वास्तव्यास आल्या. त्यानंतर पती सुरेश सोनवणे यांचा चामड्यापासून पासून पाकीट बनवणे हा व्यवसाय व यांच्यासोबत आपल्या कुटूंबा...

काळाची गरज असणारा व पत्रकारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा ड्रोन व्यवसाय

Image
काळाची गरज असणारा व पत्रकारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा ड्रोन व्यवसाय मुंबई / रमेश औताडे  पत्रकारांसाठी विविध कल्याणकारी योजना राबविणाऱ्या मुंबई मराठी पत्रकार संघाने पत्रकारांना व्यवसायाची संधी उपलब्ध करून दिली आहे. आगामी काळाची गरज असणारा व पत्रकारांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देणारा ड्रोन व्यवसाय संदर्भात मार्गदर्शन कार्यशाळा पत्रकार संघात शनिवारी आयोजित केली होती. मुंबई मराठी पत्रकार संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी पत्रकारांना नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करून त्यांना नोकरी सोबत व्यवसाय कसा करता येईल यासाठी या कार्यशाळेचे आयोजन केले होते. यावेळी पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी बॉम्बे न्यूज फोटोग्राफर असोशियशन, टीव्हीजेए,मुंबई प्रेस क्लब, मुंबई मराठी पत्रकार संघ यांच्या वतीने संयोजक व मुंबई मराठी पत्रकार संघाचे सदस्य राजेश खाडे, शैलेंद्र शिर्के, अंशुमन पोहरेकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.ड्रोन वल्ड कंपनीचे अध्यक्ष विनोद पाटील,दर्शन शहा,राहुल अंबेगावकर,निलोफर लाखनी यांनी या कार्यशाळेत ड्रोन व्यवसाय संदर्भात माहिती दिली.

धनगर आरक्षणासाठी शेळ्या मेंढ्या घेऊन मुंबई ठप्प करणार - बबनराव मदने

Image
धनगर आरक्षणासाठी शेळ्या मेंढ्या घेऊन मुंबई ठप्प करणार - बबनराव मदने मुंबई / रमेश औताडे  धनगर व धनगड या शब्दातील " ड " या अक्षरामुळे गेल्या ६८ वर्षापासून धनगर समाज आज आरक्षणापासून वंचित राहिला आहे. सरकारने जर आता या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले तर राज्यभरातील शेळ्या मेंढ्या घेऊन मुंबई ठप्प करणार असा इशारा मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे  मुंबई अध्यक्ष बबनराव मदने यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिला. धनगर एस टीआरक्षण अंमलबजावणी, आणि राज्यपाल नियुक्त विधान परिषदेत आमदार म्हणून धनगर समाजातील प्रतिनिधीनां संधी मिळावी. १९५६ च्या एस टी यादीत महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या यादीत अनुक्रमे ३६ वर धनगर अशी नोंद आहे. मात्र देवनागरी लिपीत इंग्रजीमधून धनगरचे स्पेलिंग धनगर   याऐवजी धनगड असे लिहिले आहे. या शब्दाचा शब्दशः अर्थ घेवून गेल्या ६८ वर्षांपासून धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या एस टी आरक्षणापासून वंचित ठेवले आहे.  धनगर समाज कोणाच्या ताटातले आरक्षण मागत नाही जे घटनेत आरक्षण दिले आहे त्याची अंमलबजावणी केली पाहिजे असे बबनराव ...

शिक्षण विभागाच्या विरोधात आंदोलन

Image
शिक्षण विभागाच्या विरोधात आंदोलन  मुंबई / रमेश औताडे  गेल्या दोन वर्षा पासून शिक्षण उपसंचालकाकडे विद्यालयातील मनमानी कारभाराबाबत वारंवार तक्रारी करून ही कुठल्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने ९ आक्टोबर पासून आझाद मैदानात आंदोलन करण्याचा इशारा गणेश गुंडेट्टी व श्रीहरी गुंडेट्टी यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे. ज्या व्यक्तीने देशासाठी स्वतःचे बलिदान दिले, अंदमानच्या कारागृहात नरक याताना भोगल्या, ज्यांनी देशाच्या हजारो पिढ्यांसमोर आदर्श घालून दिला असे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावे असलेल्या स्वातंत्र्यवीर वीर सावरकर हिंदू एज्युकेशन ट्रस्ट आणि स्वा. वीर सावरकर हिंदू विद्यालयात सुरू असलेला मनमानी कारभार शिक्षण विभागाला लेखी देऊनही कारवाई होण्यास विलंब का लागत आहे ? असा सवाल गणेश गुंडेट्टी व श्रीहरी  गुंडेट्टी यांनी यावेळी केला. रामराव विठ्ठलराव पतसंस्थेकडून विद्यालयाच्या बाहेरील लोकांना विद्यालयीन कर्मचारी आहेत असे दाखवून बोगस कर्ज घेतले. त्या कर्जाची परतफेड न केल्याने पतसंस्थेने सहाय्यक निबंधकाकडे वसुली तक्रार केली...

आणखी किती दिवस आंदोलनच करायचे आझाद मैदानातून सर्व अन्यायग्रस्तांचा सवाल

Image
मुंबई / रमेश औताडे  गल्ली पासून दिल्ली पर्यंत, ग्रामसेवकापासून पंतप्रधान यांच्यापर्यंत निवेदन देणे, निवेदनाचे स्मरणपत्र देणे, स्मरणपत्र दिले आहे हे सांगण्यासाठी पुन्हा निवेदन देणे.   तरीही न्याय मिळत नाही म्हणून आंदोलन इशारा देणे. सरकारच्या आश्वासनानंतर आंदोलन थांबवायचे व पुन्हा पुढील अधिवेशनात आंदोलन करायचे. असे आणखी किती दिवस आंदोलन करायचे ? असा सवाल आझाद मैदानात आपल्या मागण्या घेऊन आलेले आंदोलनकर्ते सरकारला विचारात आहेत. शिक्षक, विद्यार्थी, शाळा संस्थाचालक, एम पी एस सी विद्यार्थी, डॉक्टर, वकील, कोतवाल, पोलिस पाटील, अंगणवाडी, ग्रामरोजगार सेवक, शेत जमीन बांध सरला म्हणून खून प्रकरणी न्याय मागणारे शेतकरी, सफाई कंत्राटी कामगार, पेन्शन धारक, कमी अवधीत पैसे डबल करणाऱ्या बोगस संस्था कंपनी विरोधातील गुंतवणूकदार, विधवा, अंध अपंग, पत्रकार संघटना, बिल्डर ने फसवणूक केलेले घर ग्राहक, आदिवासी, पारधी, गोंधळी, मातंग असे मागास समाज, ब्राम्हण समाज, राज्य परिवहन चालक वाहक, मंत्रालय कर्मचारी संघटना, ओला उबेर विरोधात रिक्षा टॅक्सी चालक मालक, असे अनेक आंदोलनकर्ते पावसाळा उन्हाळा ...