केंद्रिय सचिवपदी श्रीकांत नायक यांची निवड
मुंबई / रमेश औताडे
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या केंद्रिय सचिवपदी श्रीकांत नायक यांची निवड केल्याची घोषणा पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे मंगळवारी केली. श्रीकांत नायक यांचा संपर्क महाराष्ट्रात तर आहेच परंतू महाराष्ट्राबाहेर देखील असल्याने पक्ष बांधणी साठी ते उपयोगीच पडणार असल्याची खात्री पक्षाला असल्यानेच त्यांच्यावर केंद्रीय सचिव पदाची जबाबदारी सोपवली आहे. असेही अण्णासाहेब कटारे यांनी सांगितले.
राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाची ताकद दिवसेंदिवस महाराष्ट्रासह इतर राज्यात देखील झपाट्याने वाढत आहे. सर्वच समाजघटक राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षा मध्ये दाखल होत आहे. "We Are Republican "आम्ही रिपब्लिकन" हे अभियान संपूर्ण देशात पक्षाचे वतीने प्रभावीपणे सुरू आहे. या अभियानास सर्वच स्तरातून उत्स्फूर्त पाठिंबा व समर्थन मिळत आहे. समाजातील जेष्ठ प्रतिष्ठीत व्यक्ती वकील, इंजिनियर, प्राध्यापक, डॉक्टर, साहित्यिक , शाहीर, कवी, गायक, उद्योजक, व्यापारी, कलाकार देखील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षात सामील होऊन समाजाला एक नवी दिशा देण्याचा प्रयत्न करीत आहेत.
विदर्भ, औरंगाबाद, उत्तर नागपूर पश्चिम महाराष्ट्र, फलटण ,मोहोळ ,मराठवाडा ,नाशिक देवळाली ,कुर्ला, घाटकोपर तसेच इतर ठिकाणी तसेच जेथे यश मिळणार तिथे उमेदवारी उभे करणार आहे असे त्यांनी सांगितले.
Comments
Post a Comment