मेघनाताईंचा विजय नक्की - अशोकराव टाव्हरे
मेघनाताईंचा विजय नक्की - अशोकराव टाव्हरे
मुंबई / रमेश औताडे
आमदार मेघनाताई साकोरे बोर्डीकर या प्रचंड मतने जिंतुर परभणी विभागातून निवडून येतील असा विश्वास भाजप नेते अशोकराव टाव्हरे यांनी व्यक्त केला.
महायुतीच्या उमेदवार म्हणून मेघनाताई यांनी तहसील कार्यालय अर्ज भरला. मोठ्या संख्येने महायुतीचे कार्यकर्ते, नागरिक उपस्थित होते.
मेघनाताई यांचे वडील ज्येष्ठ नेते रामप्रसाद बोर्डीकर हे आहेत. ते चार वेळा विधानसभा आमदार होते, काही काळ मंत्री होते. एपीएमसी मार्केट ,नवी मुंबईचे सभापतीपदही त्यांनी भुषविले आहे. यांचे पती दिपक साकोरे नवी मुंबईचे अतिरिक्त पोलीस आयुक्त आहेत. मागील पाच वर्षात आमदार मेघनाताईनी झंझावती कार्य केले असून विकासाची मोठी कामे मतदारसंघात केल्याने जनतेचा मोठा पाठींबा मिळत असून त्या निश्चितच प्रचंड बहुमतांनी निवडून येथील असे टाव्हरे यांनी सांगितले.
Comments
Post a Comment