शिक्षण विभागाच्या विरोधात आंदोलन
शिक्षण विभागाच्या विरोधात आंदोलन
मुंबई / रमेश औताडे
गेल्या दोन वर्षा पासून शिक्षण उपसंचालकाकडे विद्यालयातील मनमानी कारभाराबाबत वारंवार तक्रारी करून ही कुठल्याही प्रकारची कारवाई होत
नसल्याने ९ आक्टोबर पासून आझाद मैदानात आंदोलन करण्याचा इशारा गणेश गुंडेट्टी व श्रीहरी गुंडेट्टी यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिला आहे.
ज्या व्यक्तीने देशासाठी स्वतःचे बलिदान दिले, अंदमानच्या कारागृहात नरक याताना भोगल्या, ज्यांनी देशाच्या हजारो पिढ्यांसमोर आदर्श घालून दिला असे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावे असलेल्या स्वातंत्र्यवीर वीर सावरकर हिंदू एज्युकेशन ट्रस्ट आणि स्वा. वीर सावरकर हिंदू विद्यालयात सुरू असलेला मनमानी कारभार शिक्षण विभागाला लेखी देऊनही कारवाई होण्यास विलंब का लागत आहे ? असा सवाल गणेश गुंडेट्टी व श्रीहरी गुंडेट्टी यांनी यावेळी केला.
रामराव विठ्ठलराव पतसंस्थेकडून विद्यालयाच्या बाहेरील लोकांना विद्यालयीन कर्मचारी आहेत असे दाखवून बोगस कर्ज घेतले. त्या कर्जाची परतफेड न केल्याने पतसंस्थेने सहाय्यक निबंधकाकडे वसुली तक्रार केली. निबंधकानी संस्थेचे बँक खाते गोठविले. त्यामुळे शिक्षेकत्तर कर्मचारी ३ महिने पगारापासून वंचीत राहिले त्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली.
याबाबत शिक्षक निरीक्षक कार्यालयाकडे लेखी तक्रार केली परंतु तक्रारीची दखल घेतली नाही. अखेर न्याय मिळत नसल्याने आम्ही सनदशीर मार्गाने लढा देण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार ९ आक्टोबर पासून आझाद मैदानात आंदोलन करणार आहोत, असे गणेश गुंडेट्टी व श्रीहरी गुंडेट्टी यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.
Comments
Post a Comment