प्रामाणिक कार्यकर्त्यावर अन्याय का
प्रामाणिक कार्यकर्त्यावर अन्याय का
मुंबई / रमेश औताडे
आपल्या आयुष्याची हयात पक्षासाठी समर्पित करणारे सच्चे निष्ठावंत कार्यकर्ते तिकिटापासून वंचित राहू लागले तर त्यांना पक्ष सोडण्याशिवय पर्याय नसतो.असे मत ऍड रवी प्रकाश जाधव यांनी काँग्रेस पक्ष सोडून वंचित बहुजन आघाडी मध्ये जाहीर प्रवेश केल्यानंतर मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
काँग्रेस पक्षात असताना कुलाबा मतदार संघात सर्वसामान्य जनतेची कामे केली.रात्र दिवस पहिला नाही. मात्र जे खोक्याची भाषा करतात त्यांनीच खोके घेऊन मला तिकीट दिले नाही.असा आरोप जाधव यांनी यावेळी केला.
कुलाबा मतदार संघात उमेदवार देताना आता जे काही काँग्रेसने केले ते योग्य नाही. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी पक्षातून मी उभा राहिलो आहे असे जाधव यांनी सांगितले.
पेशाने वकील असल्याने मतदार संघात मी जे काही काम केले व करणार होतो त्याचा फायदा काँग्रेसला झाला असता मात्र आता वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून मी या भागाचा विकास करणार असल्याचे जाधव यांनी सांगितले.
Comments
Post a Comment