मेडिकल दुकान मालकाची १.२७ कोटीची फसवणूक
मेडिकल दुकान मालकाची १.२७ कोटीची फसवणूक
मुंबई / रमेश औताडे
एका डॉक्टर दाम्पत्याने मेडिकल दुकान मालकाची १.२७ कोटी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी फिर्यादीने दिलेल्या तक्रारीवरून नवी मुंबईच्या एन आर आय पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता ४०६, ४२०, ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला.
तक्रारदार कल्पेश व्यास यांचे मालाड मध्ये
वडीलोपार्जित मेडिकल स्टोअर्स आहे. 2013 मध्ये व्यास यांच्या बिल्डिंग मध्ये राहणारे कन्हैयालाल देराश्री यांनी त्यांचा मुलगा डॉ. धवल देराश्री आणि त्यांची पत्नी डॉ. लता देराश्री वडील कन्हयालाल देराश्री यांचे नवी मुंबई सीवडुस येथे स्वतः मालकीचे मोठे सुयश हॉस्पीटल असल्याचे सांगितले.
या हॉस्पीटलच्या जागेमध्ये एक मेडीकल आस्थापणा आहे. ते मेडिकल आस्थापणा चालवण्याचा परवाना घेतल्यास तुम्हाला आम्ही ते भाड्याने देऊ. त्यामधुन तुम्हाला व्यवसाय चालु करता येईल असे त्यांनी सांगितले. देराश्री कुटुंबावर विश्वास ठेवून तक्रारदारांनी त्या आस्थपणासाठी ४९ लाख रुपये बँक व्यवहाराने दिले.
मेडिकल स्टोअर्स सुरू झाल्यावर या जोडप्याने ४८ लाख रुपयांची औषधे देखील खरेदी केली. तसेच ३० लाख रुपये उसने घेतले. या संपूर्ण व्यवहारात देराश्री कुटूंबियांनी आमची फसवणूक केल्याचा आरोप व्यास यांनी केला आहे. तक्रारदाराला डॉक्टरांनी सेटलमेंटमध्ये दिलेला फ्लॅट सिटी बँकेकडे गहाण ठेवला होता. आजपर्यंत आरोपीने तक्रारदाराला कोणतीही रक्कम दिलेली नाही असे ॲड मित अशोक राजपोपट यांनी सांगितले. या प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून तपास सुरू आहे.
Comments
Post a Comment