उंदीर मारण्याच्या चिकटपट्टी बाबत गैसमज
मुंबई / रमेश औताडे
उंदीर मारण्यासाठी जी चिकटपट्टी वापरली जाते त्या पट्टी बाबत अनेक गैरसमज पसरवले जात असून सत्य बाहेर आले पाहिजे. यासाठी चिकटपट्टी उत्पादन असोसिएशन ने मुंबई मराठी पत्रकार संघ येथे पत्रकार परिषद घेऊन सर्व आरोपांचे खंडन केले असून ही चिकटपट्टी वापरू शकता असे आवाहन यावेळी केले.
जीबीएमए ग्लू बोर्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन, ग्लू बोर्ड उत्पादक आणि पुरवठादार यांच्या वतीने उंदीर नियंत्रणासाठी जी चिकटपट्टी वापरली जाते त्याने उंदराला त्रास होतो असा आरोप प्राणी संघटनेने केला होता. मात्र याला कोणताही शास्त्रीय आधार नाही असे असोसिएशनचे सचिव मुकेश पटेल यांनी सांगितले. यावेळी प्रवीण पाटील, फैयाज कालोलवाला, गुरुराज अग्निहोत्री हे पदाधिकारी उपस्थित होते.
लेप्टोस्पायरोसिस आणि प्लेग यांसारख्या रोगांचा प्रसार नियंत्रित करून सार्वजनिक आरोग्याचे रक्षण करण्यासाठी उंदीर मारण्यासाठी या चिकटपट्टी जगभर वापरल्या जातात. प्राणी प्रेमी याबाबत उपाय देत नाहीत मात्र विरोध करतात हे योग्य नाही. रेल्वेच्या बोगीत ए सी मध्ये उंदीर मेला तर त्याचा वास प्रवासी सहन करू शकत नाहीत याबाबत प्राणी प्रेमी उत्तर देत नाहीत. असा सवाल असोसिएशनने केला आहे.
Comments
Post a Comment