महाराष्ट्रात बसपचा पहिला आमदार धारावीत
शिवसेना शिंदे गटाचे मनोहर रायबागे बसापत
मुंबई / रमेश औताडे
महाराष्ट्रात सध्या जे राजकारण सुरू आहे ते पाहता बहुजन समाज पार्टीत विविध पक्षातील नेते प्रवेश करत आहेत. शिवसेना शिंदे गटाचे विभाग संघटक मनोहर रायबागे यांनी हजारो समर्थकसह बसपात जाहीर प्रवेश केला. या भागातील बेरजेचे राजकारण पाहता व रायबागे यांची या भागात असणारी जनसेवा पाहता महाराष्ट्रात बसपचा पहिला आमदार धारावितून होणार असे बसपाचे राज्य प्रभारी एन.पी.अहिगार यांनी सांगितले.
मुंबईत बी.एस. पी.भवन, चेंबूर येथे महाराष्ट्र राज्याचे प्रभारी एन.पी.अहिगार, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष सुनील डोंगरे, मुंबई प्रदेशाध्यक्ष प्रा.प्रवीण धोत्रे, मुंबई प्रभारी रामसुमेर जैसवार, श्यामलाल जैसवार, अनिल भंडारे , रामब्रिज जैसवार, सुनील शिंदे उपस्थित होते.
आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी धारावीचा पुनर्विकास झाला नाही. येथे अनेक वर्ष काँग्रेसच्या आमदारांनी फक्त स्वतःच्या विकासावर लक्ष दिले. धारावीला वेठीस धरून स्वतःची ताकद वाढवली.त्यामुळे मतदार गायकवाड परिवाराला त्यांची जागा दाखवणार असे एन.पी.अहिगार म्हणाले. पार्टीची उमेदवारांची यादी शनिवारी जाहीर केली जाईल. यामध्ये पहिले उमेदवार रायबागे असतील.असे प्रदेशाध्यक्ष सुनील डोंगरे यांनी सांगितले.
धारावीत मी अनेक वर्षे काम करत असल्यामुळे मला धारावीतील जनतेला काय हवं याची कल्पना आहे. जनतेला विकासाची गरज आहे. विकासाच्या नावाने राजकारण सुरु आहे. धारावीचा पुनर्विकास होणे अत्यंत गरजेचे आहे. त्यामुळे मला मोठा पक्ष उमेदवारी देत असतानाही मी बहुजन समाज पार्टीमध्ये प्रवेश करत आहे. यामागे खूप वेगळी कारणे आहेत. असे मनोहर रायबागे म्हणाले.
Comments
Post a Comment