प्रा. हेमंत सामंत यांचे करिअर मार्गदर्शन
मुंबई / रमेश औताडे
नवीन शैक्षणिक धोरणानुसार डी. जी. रुपारेल महाविद्यालय, माटुंगा येथे राज्यशास्त्र विभागात विद्यार्थ्यांसाठी तीस तासांचा दोन क्रेडिट पॉईंट मिळतील असा अभ्यासक्रम आयोजित केला होता. त्याच्या समारोपासाठी आणि विद्यार्थ्यांना कोणत्या संधी उपलब्ध होतील यासाठी प्रा. हेमंत सुधाकर सामंत यांचे मार्गदर्शन सत्र ठेवण्यात आले होते आणि अभ्यासक्रमाचे प्रमाणपत्रही त्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.
यात त्यांनी उल्लेखलेली क्षेत्रे : मुत्सद्दी (परदेशी सेवा अधिकारी), धोरण विश्लेषक (सरकारी एजन्सी), आंतरराष्ट्रीय मदत कर्मचारी (USAID, UN एजन्सी), गुप्तचर विश्लेषक (CIA, NSA), कार्यक्रम व्यवस्थापक (मानवी हक्क, पर्यावरण संस्था), वकिली विशेषज्ञ (लॉबिंग, सार्वजनिक धोरण), विकास विशेषज्ञ (आंतरराष्ट्रीय विकास संस्था), मानवतावादी कार्यकर्ता (आपत्ती निवारण, निर्वासित समर्थन, आंतरराष्ट्रीय व्यवसाय सल्लागार, ग्लोबल मार्केटिंग मॅनेजर, व्यापार विशेषज्ञ (आयात/निर्यात), जोखीम व्यवस्थापन विशेषज्ञ, प्राध्यापक/संशोधक (आंतरराष्ट्रीय संबंध, जागतिक अभ्यास), थिंक टँक विश्लेषक (परराष्ट्र धोरण, जागतिक समस्या), धोरण संशोधक (विद्यापीठे, संशोधन संस्था), पत्रकार/संपादक (आंतरराष्ट्रीय घडामोडी प्रकाशन), संयुक्त राष्ट्र कर्मचारी, जागतिक बँक/IMF व्यावसायिक, आंतरराष्ट्रीय न्यायालयाचे वकील, इतर करिअर: संघर्ष निराकरण विशेशज्ञ, आंतरराष्ट्रीय कायदा विशेषज्ञ, पर्यावरण धोरण विश्लेषक, जागतिक आरोग्य विशेषज्ञ यानंतर त्यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक कौशल्ये कोणती लागतील याचे मार्गदर्शन केले.
यात : भाषा प्रवीणता (एकाधिक भाषा), सांस्कृतिक क्षमता, विश्लेषणात्मक आणि समस्या सोडवण्याची कौशल्ये, संप्रेषण आणि वाटाघाटी कौशल्ये, जागतिक समस्या आणि राजकारणाचे ज्ञान, अनुकूलता आणि लवचिकता याचा समावेश आहे. कार्यक्रम समन्वयक प्रा. प्रदिप जानकर, प्रा. नितेश राठोड आणि प्रा. दाते हे होते. सर्व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना उपप्राचार्य प्रा. वैशाली जावळेकर यांनी शुभेच्छा दिल्या. अशाच प्रकारचे अन्य काही अभ्यासक्रम नियोजित आहेत आणि ते पुढील वर्षी सुरू केले जातील त्याचा लाभही विद्यार्थ्यांनी घ्यावा असे त्यांनी प्रतिपादन केले.
Comments
Post a Comment