भाषण करताना कोणताही धर्म दुखावला जाऊ नये
भाषण करताना कोणताही धर्म दुखावला जाऊ नये
मुंबई / रमेश औताडे
राज्यातील मुस्लिम समाजाला टार्गेट करत आमदार नितेश राणे जी वक्तव्य करत आहेत ती गंभीर आहेत. श्री रामगिरी महाराज आणि श्री सरस्वती महाराज यांनी प्रत्युत्तर देताना राग आणि निषेध व्यक्त करून मुस्लिम समाजातील महान व्यक्ती बद्दल वाईट बोलून त्यांचा अपमान केला आहे. या विधानांमुळे केवळ मुस्लिम समाजच नाही तर जगभरातील लोक दुखावले गेले आहेत. या पार्श्वभुमीवर आमदार नितेश राणे यांच्या विरोधात हायकोर्टामध्ये याचिका दाखल करणार असा इशारा मो. रेहान आय मेमन यांनी मुंबई प्रेस क्लब येथे दिला.
भाजप सत्तेत आल्यापासून धार्मिक अल्पसंख्यांक मध्ये भेदभाव केला जात आहे. त्यामुळे नितेश राणे यांनी तात्काळ माफी मागावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. अल्पसंख्याकांच्या हक्कांचे संरक्षण केले पाहिजे तसेच त्यांना आदराने वागवले पाहिजे. नितीश राणेंच्या वक्तव्यामुळे मुस्लिम अल्पसंख्याक दु:खी झाले आहेत.
आमदार नितेश राणे हे महाराष्ट्र राज्यातील मुस्लिम समाजाला जेव्हा जेव्हा टार्गेट करणार तेव्हा तेव्हा त्यांना आम्ही विरोध करणार तसेच आंदोलन देखील करणार. उपमुख्यमंत्री, गृहमंत्री तसेच देशाचे गृहमंत्री प्रधानमंत्री यांना नितेश राणे यांच्या विरोधात कारवाई व्हावी म्हणून निवेदन देण्यात आले आहे. तसेच नितेश राणे यांच्या विरोधात येणाऱ्या दोन ते चार दिवसांमध्ये हायकोर्टामध्ये याचिका दाखल करणार आहे असे मो. रेहान मेमन यांनी यावेळी सांगितले.
Comments
Post a Comment