अनाथ विधवा गरजू महिलांसाठी तत्पर - सुनीता तूपसौंदर्य
मुंबई / रमेश औताडे
दुष्काळी भागात महिलांना चार पाच किलोमीटर वरून पिण्याचे पाणी आणावे लागत होते. त्या माण खटाव लातूर आदी भागात बोअरवेल ची सोय करून त्यांचा पाण्याचा प्रश्न मार्गी लावला. अनाथ विधवा गरजू महिलांना पेन्शन सुरू करत त्यांच्या आरोग्याचा प्रश्न त्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी लागणारी तरतूद करण्यासाठी ऑल इंडिया महिला महिला इम्पॉरमेंट पार्टीने केली आहे. अशी माहिती पार्टीच्या महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सुनीता तूपसौंदर्य यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, सध्याचे तोडफोडीचे राजकारण पाहता मतदार गोंधळून गेला आहे. मतदारांनी सावध भूमिका घेत जे उमेदवार जनतेच्या मूलभूत प्रश्नावर काम करत आहेत त्यांनाच मतदान करावे. ज्या भागात आमच्या पार्टीने गोरगरीब जनतेची सेवा केली आहे त्याच भागात आम्ही तळागाळातील उमेदवार उभे करणार आहे.
महाराष्ट्र मधून आगामी विधान सभेसाठी खटाव ,लातूर,अंधेरी,विक्रोळी,घाटकोपर, मीरारोड, या भागात कोअर कमिटी निर्णय अंती उमेदवार उभे करणार आहे. जे समाजकार्य करत आहेत त्यांनी ९९३०२६२७७७ या क्रमांकावर संपर्क साधला तर त्यांचे कार्य पाहून त्यांना उमेदवारी दिली जाईल असे सुनीता तूपसौंदर्य यांनी यावेळी सांगितले.
Comments
Post a Comment