तरीही दिव्यांग खेळाडू क्रिकेट खेळतात

तरीही दिव्यांग खेळाडू क्रिकेट खेळतात

मुंबई / रमेश औताडे 

मुंबई व्हीलचेअर क्रिकेट संघाला कोणत्याही सरकारी संस्थेचा तसेच मुंबई क्रिकेट असोसिएशन एमसीए चाही 
पाठिंबा मिळत नाही ही मोठी शोकांतिका आहे. स्वयंसेवी संस्था व देणगीदारांकडून मिळालेल्या निधीवर आम्ही दिव्यांग खेळाडू क्रिकेट खेळतो. दिव्यांग खेळाडू बाबत सरकारला ही लाजिरवाणी बाब आहे. अशी खंत व्हीलचेअर मुंबई क्रिकेट टीम चे कर्णधार राहुल रामूगडे यांनी व्यक्त केली.

व्हीलचेअर क्रिकेट इंडिया आणि डिफरंटली एबल्ड क्रिकेट कौन्सिल ऑफ इंडियाच्या मार्गदर्शनाखाली रोटरी क्लब ऑफ मुंबई मलबार हिल यांच्या सहकार्याने घाटकोपर मध्ये २६ ऑक्टोबर रोजी टी १० व्हीलचेअर क्रिकेट मॅच चे आयोजन करण्यात आले. यात हिंदुस्तान कोलास प्रायव्हेट लिमिटेड कंपनीने खेळाडूंना नवीन व्हीलचेअर भेट दिली.

मुंबई विरुद्ध महाराष्ट्र असा हा सामना होता. या  सामन्यात मुंबईच्या टीम ने उत्कृष्ट खेळ खेळत बाजी मारली. क्रिकेट हा खेळ जगभरात प्रसिद्ध असून व्हील चेअर क्रिकेट टीम ला हवा तसा प्रतिसाद मिळत नाही. आमच्या मुंबई संघातील काही खेळाडू भारतीय व्हीलचेअर क्रिकेट संघाकडूनही खेळले आहेत. 

यावेळी रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१ चे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर चेतन देसाई, झोनल गव्हर्नर ए. व्ही. सुरेश आर्या, अखिलेश विश्वकर्मा, अभय प्रताप सिंह, कला श्रीधर, आदर्श गणवीर आदी मान्यवर उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आता सहनशीलता संपली...राज्यभर १ ऑक्टोबरला रास्ता रोको करणार....अंगणवाडी महिलांचा सरकारला इशारा

आचारसंहिते पूर्वीची " उमेद"

आचारसंहिते पूर्वीची " उमेद"