देशाचा विकास काँग्रेसने जगाला दाखवला आहे
देशाचा विकास काँग्रेसने जगाला दाखवला आहे
मुंबई / रमेश औताडे
विकास म्हणजे काय असतो हे काँग्रेस ने पहिल्यापासून जगाला दाखवले आहे. विकासाची बीजे काँग्रेसने पेरली होती. त्याचा आता वटवृक्ष झाला आहे. आता हवसे नवसे गवसे सांगत आहेत की आम्हीच विकास केला. पण सत्य समोर आले आहे. त्यामुळे विकासाबरोबरच रोजगार व स्वयंरोजगार काय असतो हे सुध्दा काँग्रेसनेच दाखवले आहे व आजही दाखवत आहे.असे मत काँग्रेस प्रवक्ते व स्लम सेल विभाग मुंबई अध्यक्ष सुरेशचंद्र राजहंस यांनी व्यक्त केले.
मुंबई काँग्रेस रोजगार व स्वयंरोजगार विभागाच्या वतीने नवनियुक्त पदाधिकारी यांना राजीव गांधी भवन येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नियुक्ती पत्र देण्यात आले. यावेळी रोजगार व स्वयंरोजगार विभाग मुंबई अध्यक्ष जयवंतराव लोखंडे, काँग्रेस प्रवक्ते आणि स्लम सेल विभाग मुंबई अध्यक्ष सुरेशचंद्र राजहंस, प्रा. उज्ज्वला जाधव आणि इतर मान्यवर यावेळी उपस्थित होते.
Comments
Post a Comment