महापालिकेच्या सेवानिवृत्तांचा सांस्कृतिक सोहोळा
मुंबई / रमेश औताडे
बृहन्मुंबई महानगरपालिका पेन्शनर्स असोसिएशनच्या गोरेगाव विभागातर्फे नुकतेच प्रबोधन क्रीडा भवनातील सभागृहात सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले हाेते. या वेळी प्रमुख अतिथी म्हणून माजी मंत्री सुभाष देसाई आणि बृहन्मुंबई महानगरपालिका पेन्शनर्स असोसिएशनचे अध्यक्ष कमलाकर क्षीरसागर उपस्थित होते.
जुनी पेन्शन आणि नवीन पेन्शनमधील फरक समजावून सांगून महापालिका कर्मचाऱ्यांसाठी जुनी पेन्शन योजनेसाठी प्रयत्नशील असल्याचे देसाई यांनी सभासदांना सांगितले. या वेळी संघटनेच्या नीता मांजरेकर, राजश्री श्रोत्रिय, ललिता भट, संजय भातखंडे, गौरी वंदना, राजन नाईक, अजित कदम यांनी सुमधुर गाणी म्हणत श्रोत्यांचे मनोरंजन केले. आनंद पुरंदरे यांनी कवितांचे वाचन करीत सर्वांना आनंद दिला.
या कार्यक्रमासाठी संजय मोरे, बळीराम कदम, ज्ञानदेव कदम, आनंद पुरंदरे, भुवड , बंगेरा, जगदाळे, सुनील माने, पडवळ, स्वरदा दाते, निलिमा जवंजाळ, प्रबोधन क्रीडा भवनाचे प्रमुख कार्यवाह गोविंद उर्फ विजू गावडे यांचे सहकार्य लाभले.
Comments
Post a Comment