" एक सत्य " कविता विद्यापीठात अभ्यासली जावी
" एक सत्य " कविता विद्यापीठात अभ्यासली जावी
मुंबई / रमेश औताडे
साहित्याच्या प्रस्थापित भिंतीवर बसून साहित्याचे मोजमाप करणाऱ्या व्यवस्थेला कवी अनंत धनसरे यांच्या " एक सत्य " या दीर्घ कविता विद्यापीठात अभ्यासली जावी अशी आहे.
ही कविता वरवरचं बोलत नाही. तर जमिनीखालचा तळ ढवळून अनुभवातून उभी रहाते. आणि म्हणूनच ही कविता विद्यापीठात बसून अभ्यासली जावी इतकी महत्त्वाची आहे. असे प्रतिपादन ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. शामल गरुड यांनी केले.
घाटकोपर येथे माता रमाबाई आंबेडकर नगर येथील शहीद स्मारक सभागृहात कवी अनंत धनसरे यांच्या "एक सत्य" दीर्घ कवितेच्या प्रकाशन सोहळ्यात त्या प्रमुख वक्त्या म्हणून बोलत होत्या.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष शिवा इंगोले, प्रमुख वक्ते डॉ. सुनील पवार रविकिरण पराडकर आदी मान्यवर उपस्थित होते. त्यापुढे म्हणाल्या की, अनंत ची कविता ही समस्त आंबेडकरी स्त्रियांसाठी खूप बंधूभावाची आणि वेदनेची कविता आहे. या कवितेवर महत्त्वाची चर्चा होणे गरजेचे आहे.
समकालीन, राजकीय, सामाजिक सगळ्या जगण्यावर अनंत बोलत असताना अनंत एका महत्त्वाच्या टप्प्यावर येतो आणि सुरुवातीपासून येणारी कविता प्रेयसी, पत्नी, आई, बहीण या समस्त आंबेडकरी स्त्री दुःख, वेदनेवर बोलता बोलता शेवटी तथागत बुद्धा जवळ येऊन थांबते. कारण, तथागताचा मार्ग हा मुक्तीचा मार्ग आहे. ही संपूर्ण कविता एका दिवसामध्ये सलग अशी वाचताना अन् ती वाचून असे वाटले की, नामदेव ढसाळ यांच्यानंतर दीर्घ कवितेची जी काही परंपरा आहे. त्या परंपरेला पुढे घेऊन जाणारी कविता अनंतने लिहिली आहे.हि कविता खरे तर विद्यापीठात बसून अभ्यासली जावी इतकी महत्त्वाची आहे,
अनंतची कविता सुरुवाती पासूनच रस्त्यावरचे जगणं मांडताना त्याला भेटणारी माणसं ही अनंतच्या जगण्याचे अविभाज्य भाग असणारी ही सगळी माणसं ही बुके कंगाल रस्त्यावरून उभी केलेली व्यवस्थेची माणसं ही प्रत्येक पानोपानी भेटतात, असे डॉ. शामाला गरुड यांनी म्हटले.
Comments
Post a Comment