महामुंबई उमेदवार अहवाल लवकरच देणार - युवराज सूर्यवंशी
महामुंबई उमेदवार अहवाल लवकरच देणार - युवराज सूर्यवंशी
मुंबई / रमेश औताडे
सध्याचे राजकीय वातावरण पाहता कोण कुठल्या पक्षाचा उमेदवार आहे हे मतदारांना कळेना झाले आहे.
संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी या
विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात जाहीर घोषणा करून मतदारांना आवाहन केले आहे. मनोज दादा जरांगे पाटील या निवडणुकीत निर्णायक भूमिका घेणार असल्यामुळे महा मुंबईतील संभाव्य उमेदवारांचा अहवाल लवकरच देणार असल्याची माहिती सकल मराठा समाज दक्षिण मध्य मुंबईचे अध्यक्ष व मराठा क्रांती मोर्चा समन्वयक युवराज सूर्यवंशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
सकल मराठा समाज मुंबई व मराठा क्रांती मोर्चा मुंबई यांच्या वतीने मुंबई विभागातील मुंबई उपनगर, मुंबई शहर ठाणे, रायगड, पालघर , या जिल्ह्यातील विधानसभा क्षेत्रामध्ये मराठा उमेदवार देण्याची घोषणा मराठा क्रांती मोर्चा महामुंबईच्या वतीने देण्यात आली आहे .
लवकरच जागोजागी विभागवार आढावा बैठक घेऊन बैठकीचा अहवाल तयार करून संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांच्याकडे तो सादर करणार आहे. अशी माहिती सकल मराठा समाज दक्षिण मध्य मुंबईचे अध्यक्ष व मराठा क्रांती मोर्चा समन्वयक युवराज सूर्यवंशी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
Comments
Post a Comment