नाहीतर आम्हाला 'नोटा' चा पर्याय उपलब्ध
नाहीतर आम्हाला 'नोटा' चा पर्याय उपलब्ध
मुंबई / रमेश औताडे
वीरशैव लिंगायत समाजाच्या उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत विश्वासात न घेता उमेदवारी न मिळाल्यास वीरशैव लिंगायत बहूल मतदार संघात आम्हाला 'नोटा' चा पर्याय उपलब्ध असेल. असा इशारा वीरशैव लिंगायत समाजाचे नेते डॉ. विजय जंगम (स्वामी) यांनी सर्वच राजकीय पक्षांना शनिवारी मुंबई मराठी पत्रकार संघ येथे आयोजित जाहीर पत्रकार परिषदेत दिला.
यावेळी वीरशैव लिंगायत समाजाचे पदाधिकारी रोहिणी जंगम, श्रवण जंगम,सदाशिव बैचे, मिलन जंगम, वैजनाथ स्वामी, श्यामाकांत लिंगायत, दुष्यंत गुरव तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.
वीरशैव लिंगायत समाजाचे प्रतिनिधी म्हणून देशाचे उपराष्ट्रपती, केंद्रीय मंत्री, लोकसभा व राज्यसभा खासदार तसेच महाराष्ट्रात मुख्यमंत्री, कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री, विधानसभा आमदार व विधानपरिषद आमदार होऊन गेले आहेत. त्यामुळे या समाजाची ताकद किती आहे हे सर्वांना माहीत आहे.
राज्यातील वीरशैव लिंगायत बहुल एकूण ३६ ते ४० मतदारसंघापैकी विविध राजकीय पक्षांनी दिलेली उमेदवारी जागा वगळता इतर मतदार संघात अखिल वीरशैव लिंगायत महासंघ महाराष्ट्रातील तमाम वीरशैव लिंगायत समाजाला कोणत्याही उमेदवाराला आपले अमूल्य मत न देता 'नोटा' पर्याय निवडण्याठी आवाहन करणार आहे. असे डॉ. विजय जंगम (स्वामी) यांनी सांगितले.
Comments
Post a Comment