Posts

Showing posts from November, 2025

बालविवाह मुक्त भारत मोहिमेच्या वर्धापनदिनी १०० दिवसीय जनजागृती उपक्रमाला सुरूवात

Image
बालविवाह मुक्त भारत मोहिमेच्या वर्धापनदिनी १०० दिवसीय जनजागृती उपक्रमाला सुरूवात मुंबई / रमेश औताडे  बालविवाहमुक्त भारत उपक्रमाच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त, CCDT, जस्ट राईट्स इंडिया आणि महिला व बालविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह निर्मूलनासाठीची सामूहिक वचनबद्धता पुन्हा अधोरेखित करण्यात आली. २०३० पर्यंत देश बालविवाहमुक्त करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व घटकांच्या सहभागाचे महत्त्व यावेळी विशेषत्वाने नमूद करण्यात आले. या प्रसंगी जिल्हा प्रशासन, कायदा अंमलबजावणी यंत्रणा, शैक्षणिक संस्था, धर्मगुरू, पंचायत राज संस्था, विविध समुदाय संघटना तसेच लोकप्रतिनिधी यांच्यासोबत समन्वय साधून येणाऱ्या वर्षात जिल्हा बालविवाहमुक्त करण्याची सामूहिक प्रतिज्ञा करण्यात आली. या महत्त्वपूर्ण टप्प्याचे स्मरण आणि पुढील कामगिरीला गती देण्यासाठी, महिला व बालविकास मंत्रालय, भारत सरकार यांच्यातर्फे राबविण्यात येणाऱ्या १०० दिवसीय जनजागृती मोहिमेला राज्यात आजपासून उत्साहपूर्ण सुरुवात करण्यात आली.

प्रत्येक घराघरात आरोग्य आणि आनंद यांचा संगम

Image
मुंबई / रमेश औताडे  भारतातील प्रत्येक घराघरात आरोग्य आणि आनंद यांचा संगम सदैव राहण्यासाठी व सामान्य माणसाला आरोग्य सेवा परवडेल यासाठी नवीन, प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करत शहरी व ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सेवा देण्याचा आमचा मानस आहे. असे मत अपोलो हॉस्पिटल ग्रुप चे अध्यक्ष डॉ प्रताप सी रेड्डी पत्रकार परिषदेत सांगितले. अपोलो हॉस्पिटल्सने पुण्यातील स्वारगेट येथे आपले नवे हॉस्पिटल सुरु केले असून ४०० बेड्सची क्षमता असलेले हे रुग्णालय अतिउच्च दर्जाचे आहे असे हॉस्पिटल्सच्या कार्यकारी उपाध्यक्ष डॉ प्रीता रेड्डी यांनी सांगितले. चार दशकांहून अधिक काळापासून चालत आलेला वारसा पुढे नेत आहोत. रुग्णांनी गेल्या अनेक पिढ्यांपासून आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाचा आम्ही सन्मान करत आहोत.  व्यवस्थापकीय संचालिका सुनीता रेड्डी यांनी सांगितले,"आमचे पुणे हॉस्पिटल अपोलोच्या वाढत्या राष्ट्रीय विस्तारामध्ये उचलण्यात आलेले एक धोरणात्मक पाऊल आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष डॉ मधू ससिधर यांनी सांगितले,"आमचे पुणे हॉस्पिटल सुरक्षा विज्ञान, पुराव्यांवर आधारित प्रॅक्टिस आणि एका अशा संस्कृतीच...

सरकारने त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा तीव्र आंदोलन करणार --

Image
           माझगावमधील प्रिन्स अली खान रुग्णालय प्रकरणी       नवीन रुग्णालयासह कामगारांच्या हक्कांसाठी आमरण उपोषण मुंबई / रमेश औताडे माझगाव परिसरातील प्रिन्स अली खान रुग्णालय 2022 मध्ये धोकादायक इमारत घोषित (स्ट्रक्चरल ऑडिट C–1) झाल्यानंतर बंद करण्यात आले. मात्र अद्यापही नवीन रुग्णालय उभारण्याची कोणतीही प्रक्रिया सुरू करण्यात आलेली नाही. रुग्णालय बंद झाल्यापासून शेकडो कामगार रोजगारापासून वंचित झाले असून याबाबत न्याय मागण्यासाठी आज मुंबईतील आझाद मैदानात आमरण उपोषणास सुरुवात करण्यात आली. उपोषणाचे नेतृत्व शिव सहकार सेनेच्या उपाध्यक्षा आशा विचारे मामीडो करत असून त्यांनी सांगितले की— तात्काळ नवीन रुग्णालय बांधावे नवीन रुग्णालय झाल्यावर कामगारांना पूर्वीप्रमाणेच रूजू करून घ्यावे आणि तोपर्यंत सर्व कामगारांना मासिक वेतन, बोनस, लीव्ह पगार व मेडिकल सुविधा देण्यात याव्यात तसेच सेवा निवृत्तीनंतरची सर्व देणी, हक्क, वारसांना कायमस्वरूपी नोकरी या मागण्या मान्य कराव्यात न्यायालयीन आदेशांनाही न जुमानण्याचा आरोप कामगारांच्या म्हणण्य...

भारताच्या मुख्य न्यायाधीशांना अन्यायग्रस्त जनतेची सलामी

Image
मुंबई / रमेश औताडे  भारताचे ५३ वे मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी जो अन्यायग्रस्त जनतेला न्याय दिला त्याबद्दल सर्व अन्यायग्रत जनतेकडून त्यांचे मी अभिनंदन करतो. त्यांचे अभिनंदन म्हणजे अन्यायग्रस्त जनतेला एक सत्याची सलामी आहे. असे मत पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील कनेरसर गावचे कवी लेखक पत्रकार समाजसेवक अशोकराव टाव्हरे यांनी आजच्या शपथविधी सोहळ्या दरम्यान व्यक्त केले. एका याचिके संदर्भात न्यायमूर्ती सुर्यकांत यांचे कामकाज अनुभवण्याची मला संधी लाभली होती. एप्रिल २०२२ मध्ये फक्त १५ लाखांची उलाढाल असलेल्या  यमाई पतसंस्था प्रकरणी पंधरा वर्षानंतर सामाजिक कार्यकर्ते अशोकराव टाव्हरे यांच्या खेड पोलीसांनी गुन्हा दाखल केला होता. तपासात १४ लाख ४२ हजारांची ठेवी यादी, कर्ज दिल्याचे निष्पन्न व कर्ज थकबाकीमुळे पतसंस्था बंद पडल्याचे निष्पन्न झाले होते.  राजकीय हेतुने तपास खेड ऐवजी मंचर पोलीस स्टेशनला दिला होता. करोडोंच्या ठेवीचा खोटा आरोप व तपासात दबाव हे मुद्दे मांडल्याने सत्र व उच्च न्यायालयात टाव्हरे यांना अटकपूर्व जामीन मिळाला नाही. टाव्हरे यांनी ॲड सौम्य दत्त...

सम्यक कोकण कला संस्था रौप्य महोत्सव, वर्धापन दिन कला भूषण जीवनगौरव पुरस्कार वितरणाचा भव्य कार्यक्रम

Image
मुंबई / रमेश औताडे  सम्यक कोकण कला संस्था (रजि.) महाराष्ट्रतर्फे आयोजित रौप्य महोत्सव, वर्धापन दिन, स्मरणिका व दिनदर्शिका प्रकाशन तसेच सम्यक कला भूषण जीवनगौरव पुरस्कार वितरणाचा भव्य कार्यक्रम सोहळा शनिवार, २९ नोव्हेंबर रोजी दादर (पूर्व) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे संपन्न होणार आहे. यावेळी संस्थेच्या पंचवीस वर्षांच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील योगदानाचा आढावा घेतला जाणार आहे. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त राज्यभरातील दीडशे ते दोनशे ज्येष्ठ कलावंतांचा सन्मान होणार आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष मंदार कवाडे व उपाध्यक्ष विनोद धोत्रे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. संस्थेचे अध्यक्ष मंदार कवाडे, उपाध्यक्ष कवी, गीतकार व संगीतकार विनोद धोत्रे, यांच्यासह सुभाष सावंत, नरेश शिंदे मुकूंद तांबे, चिंतामणी जाधव आदी पदाधिकारी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट भूषवणार आहेत. ...

देशातील सर्वात मोठ्या बाल कर्करोग निवासस्थान चे उद्घाटन

Image
मुंबई / रमेश औताडे सेंट जूड इंडिया चाइल्डकेअर सेंटर्स आणि टाटा मेमोरियल सेंटरच्या सहकार्याने खारघर येथे देशातील सर्वात मोठे बालकर्करोग निवासस्थान चे उद्घाटन टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांच्या हस्ते झाले. या अत्याधुनिक इमारती मध्ये दरवर्षी ७०० हून अधिक कर्करोगग्रस्त मुलांच्या कुटुंबांना मोफत, स्वच्छ व सुरक्षित निवास मिळणार आहे.   परवडणाऱ्या निवासाच्या अभावी उपचार अर्धवट सोडणाऱ्या कुटुंबांची संख्या आता कमी झाली आहे. इमारतीत लायब्ररी, क्लासरूम, स्किलिंग सेंटर आणि ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ची व्यवस्था असून, देशभरात अशी केंद्रे उभारण्यासाठी इतर संस्थांना प्रशिक्षण दिले जाईल. सेंट जूडच्या अध्यक्षा मनीषा पार्थसारथी म्हणाल्या, “हे केंद्र फक्त निवासस्थान नसून, कोणत्याही मुलाने जागेअभावी उपचार गमावू नयेत याचे आमचे वचन आहे. ” डॉ. सुदीप गुप्ता म्हणाले, “सुरक्षित निवास हा उपचारासारखाच महत्त्वाचा घटक आहे. ACTREC मध्ये उभारत असलेल्या ३५० बेड्सच्या भारतातील सर्वात मोठ्या बाल कर्करोग हॉस्पिटलला हे निवासस्थान नैसर्गिक पूरक ठरेल.” ACTRECचे संचालक डॉ. पंकज चतुर्वेदी म्हणाल...

बिबट्याच्या भीतीपोटी सरपंचांची थेट वनमंत्र्यांकडे धाव

Image
बिबट्याच्या  सततच्या हल्ल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले असताना, डमाळवाडी गावाचे सरपंच आंबादास डमाळे यांनी थेट राज्याचे वनमंत्री गणेशजी नाईक यांच्याकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी करणारे पत्र दिले. सरपंचांनी गावातील प्रत्येक नागरिकाला ‘परिवाराचा सदस्य’ मानून त्यांच्या सुरक्षिततेसाठी केलेली ही धावपळ राज्यस्तरावर पोहोचली. सरपंच डमाळे यांच्या निवेदनाची गंभीर दखल घेत वनमंत्री गणेश नाईक यांनी मंत्रिमंडळ बैठकीत संबंधित मुद्दा मांडत त्वरित कारवाईचे आदेश जारी केले. गावकऱ्यांचे भीतीचे सावट दूर करण्यासाठी स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांना आता राज्यस्तरीय अधिकाऱ्यांचे पाठबळ मिळाले असून, वन विभागाकडून पुढील काही दिवसांत आवश्यक पावले उचलली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. गावाच्या सुरक्षेसाठी दाखवलेली तत्परता आणि जबाबदारी लक्षात घेता सरपंच आंबादास डमाळे यांचे प्रयत्न तसेच प्रकरणात सकारात्मक दखल घेत वनमंत्री गणेशजी नाईक यांनी दाखवलेली संवेदनशीलता दोघांचेही हे कार्य गावकऱ्यांकडून कौतुकास्पद मानले जात आहे.अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख ज्ञानेश्वर शिरसाट ( माऊ...

स्वच्छता दूत फाऊंडेशन ने साजरा केला वर्ल्ड टॉयलेट डे

Image
मुंबई / रमेश औताडे मंत्रालय प्रतिनिधी  जागतिक टॉयलेट दिनानिमित्त १९ नोव्हेंबर २०२५ रोजी स्वच्छता दूत फाउंडेशन तर्फे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर मानखुर्द मुंबई येथे स्वच्छता जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात शौचालय या विषयावर चित्रकला स्पर्धा, तसेच स्वच्छते वरील गाणी आणि हात धुण्याच्या योग्य पद्धतींचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी सादर करत टॉयलेट स्वच्छता जनजागृती केली. आराधना समाधान घुले या ७ वी च्या विद्यार्थी ने  स्वच्छते वरील गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात केली. अशीता आंद्रेश गायकवाड हिने जागतिक टॉयलेट दिवस या विषयावर छायाचित्रे काढून त्याचे महत्व मांडले आणि हात धुण्याची पद्धत समजावून सांगितली. कार्यक्रमात मनपा स्वच्छता अधिकारी आनंद जगताप, जीवन ज्योत कॉन्व्हेंट स्कूलचे प्रमुख सचिन सर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरचे अध्यक्ष गुलाब अण्णाभाऊ साठे, ज्योतिका सिस्टर, समाज प्रबोधन कार्यकर्ते सतीश भोसले, स्वच्छता संवर्धन संस्था महासंघाचे अध्यक्ष व सचिव सुरेश साळवे , पत्रकार विनोद कांबळे,  डॉ. जमीला बेगम, शबाना अहमद, पुष्पेंद्र नाम...

मुंबई मराठी पत्रकार संघासह सहा संस्थांची समाजसेवा

Image
        सोलापूर, दि. १३ नोव्हेंबर २०२५ पत्रकारितेचा अर्थ फक्त बातम्या सांगणे नाही; तर समाजातील वेदना ऐकून त्या कमी करण्यासाठी उभे राहणे आहे. याचे जिवंत उदाहरण ठरला दक्षिण सोलापूर तालुक्यातील वांगी गावातील जिल्हा परिषद शाळेतील ‘पाण्याचा झरा’. मुंबई मराठी पत्रकार संघ आणि विहंग प्रतिष्ठान यांच्या पुढाकाराने शाळेच्या आवारात बोअरवेल मारण्यात आली. १३० फुटांवर लागलेल्या दोन इंच पाण्यामुळे शाळेला अखेर जीवनदायी आधार मिळाला आहे. या कार्यात बालमोहन विद्यार्थी उत्कर्ष पालक समिती, जीएसबी टेंपल ट्रस्ट, संत गाडगेबाबा धर्मशाळा आणि पल्लवी फाऊंडेशन यांचाही मोलाचा सहभाग होता. निधी संकलन, प्रत्यक्ष भेट, परिसराची पाहणी आणि शेवटी पाण्याची सोय; हा उपक्रम संवेदनशील पत्रकारितेचा आणि सामाजिक बांधिलकीचा सर्वोत्तम संगम ठरला आहे. कार्यक्रमास मुंबई मराठी पत्रकार संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र हुंजे, विहंग प्रतिष्ठानचे प्रसाद मोकाशी, बालमोहन विद्यार्थी उत्कर्ष पालक समितीचे अध्यक्ष राजेंद्र साळसकर आणि काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी उपस्थित होते. शाळेत बोअरवेलला लागलेले पाणी पा...

दलित–आदिवासी–अल्पसंख्याक–ओबीसी अधिवेशन उत्साहात संपन्न

Image
दलित–आदिवासी–अल्पसंख्याक–ओबीसी अधिवेशन उत्साहात संपन्न बहुजन समाजाच्या प्रश्नांवर निर्णायक लढ्याची गर्जना मुंबई / रमेश औताडे दलित, ओबीसी, अल्पसंख्याक आणि आदिवासी संघटनांचा समावेश असलेल्या डोमा परिसंघतर्फे आयोजित सर्वसमावेशक मुंबई अधिवेशन उत्साहात आणि ऐतिहासिक वातावरणात पार पडले. सामाजिक न्याय, समान संधी, आरक्षण, रोजगार, शिक्षण, कामगार हक्क आणि अल्पसंख्याकांच्या सुरक्षेसारख्या मूलभूत प्रश्नांवर या अधिवेशनात सर्व वक्त्यांनी ठोस भूमिका मांडल्या. राष्ट्रीय पातळीवरील नेतृत्वाची उपस्थिती अधिवेशनात डोमा परिसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. उदित राज (माजी खासदार, IRS) यांनी विशेष उपस्थिती दर्शवून बहुजन समाजाच्या प्रश्नांवर व्यापक मांडणी केली. त्यांनी केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांवर टीका करताना संविधानिक हक्कांना धक्का लागणाऱ्या प्रवृत्तींबाबत तीव्र चिंता व्यक्त केली. तसेच राष्ट्रीय सचिव डॉ. संजय कांबळे-बापेकर, शिवसेना खासदार अरविंद सावंत, तसेच विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. समाजाच्या विविध प्रवाहांना जोडणारा हा कार्यक्रम डोमा परिसंघाच्या संघटनात्मक...

वीर लहुजी वस्ताद साळवे जयंतीनिमित्त बाईक रॅली

Image
         वीर लहुजी वस्ताद साळवे जयंतीनिमित्त बाईक रॅली मुंबई / रमेश औताडे  राष्ट्रीय स्वाभिमानी मातंग संघटनेच्या वतीने वीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यामध्ये भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या आयोजनाला समाज बांधवांकडून प्रचंड उत्साहाचा प्रतिसाद मिळाला. रॅलीची सुरुवात ठाणे रेल्वे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून झाली. येथून संपूर्ण ठाणे शहरातील मातंग वस्त्यांमध्ये रॅलीचे मार्गक्रमण झाले. नाक्या-नाक्यांवर वीर लहुजी वस्ताद साळवे, डॉ. आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने जयजयकार करण्यात आला. यावेळी अनेक समाज बांधवांनी फटाके व पुष्पवृष्टी करत रॅलीचे उत्साहाने स्वागत केले.  या रॅलीला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी मनोज प्रधान, भाजप नगरसेविका कांबळे , नगरसेवक यादव यांच्यासह विविध राजकीय पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. तसेच, लोकमान्य नगर येथे आरपीआय नेते इदिसे परिवारातील सदस्यांनीही स्वागत केले. पुढील वर्षापासून रॅलीचे आयोजन ...

बाल लैंगिक शोषण संपविण्यासाठी " अर्पण " सरसावली

Image
        बाल लैंगिक शोषण संपविण्यासाठी " अर्पण " सरसावली अर्पण ही जागतिक स्तरावर नावाजलेली, एक स्वयंसेवी संस्था असून, बाल लैंगिक शोषणाची समस्या समूळ नष्ट करण्यासाठी समर्पित आहे.  या संस्थेने, ठाणे महानगरपालिकाआणि ठाणे महानगरपालिका परिवहन उपक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने, बाल सुरक्षा सप्ताह या आपल्या जनजागृतीपर अभियानाचा उद्घाटन सोहळा आयोजित केला होता.  यंदा या अभियानाचे हे सातवे वर्ष असून, ठाणे महानगरपालिका परिवहन विभागाने आमच्या उपक्रमाला पाठिंबा दर्शवताना, ठाणे महानगरपालिका परिवहन विभागाच्या ३८५ बसेसमध्ये या अभियानातील बाल सुरक्षा संदेश प्रदर्शित केले आहेत. या बस जनजागृती उपक्रमाच्या माध्यमातून, हे अभियान हजारो नागरिकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरले आहे. या उद्घाटन सोहळ्यासाठी खासदार नरेश म्हस्के, श्री. सौरभ राव, आयएएस अधिकारी व ठाणे महानगरपालिका आयुक्त, पूजा तापडिया, अर्पण संस्थेच्या संस्थापिका व  मुख्य कार्यकारी अधिकारी, नेहल पारेख सीओओ, प्रोग्राम्स, अर्पण आणि अर्पण संस्था तसेच ठाणे प्रशासनातील अनेक मान्यवर उपस्थित होते....

शक्तीमान पुन्हा प्रेक्षकांच्या भेटील

Image
शक्तीमान पुन्हा प्रेक्षकांच्या भेटील       भारताचा मूळ सुपरहिरो अखेर पॉकेट एफएमवर परतला पॉकेट एफएम मुकेश खन्ना यांच्यासोबत ४० भागांच्या ऑडिओ मालिकेत शक्तीमान परत आणत आहे, आता सर्व वापरकर्त्यांसाठी विनामूल्य स्ट्रीमिंग आहे आणि ९० च्या दशकातील बॉलीवूडचे खलनायक नवीन जाहिरात चित्रपटात आधीच थरारत आहेत. *भारत, १० नोव्हेंबर २०२५*: ऑडिओ सिरीज प्लॅटफॉर्म पॉकेट एफएमने देशातील सर्वात प्रिय सुपरहिरोला पुन्हा जिवंत केले आहे. ४० भागांच्या नवीन ऑडिओ मालिकेसह या आख्यायिकेला पुनरुज्जीवित करत, शक्तीमान रिटर्न्स ही एक जुनाट पण समकालीन पर्यावरणीय थ्रिलर आहे, ज्याला शक्तीमानचे मूळ निर्माते आणि चेहरा मुकेश खन्ना यांनी पाठिंबा दिला आहे. पॉकेट एफएमवर सर्व वापरकर्त्यांसाठी आता केवळ आणि विनामूल्य स्ट्रीमिंग होणारी ही मालिका, नवीन पिढीसाठी भारतातील सर्वात प्रिय सुपरहिरोला पुन्हा परिभाषित करते, जुनाट आठवणी, उद्देश आणि सिनेमॅटिक ध्वनी डिझाइन यांचे मिश्रण करून एक तल्लीन कथाकथन अनुभव तयार करते जे पूर्वीच्या कोणत्याही गोष्टींपेक्षा वेगळे आहे. *एक नवीन युग. एक नवीन लढाई.  एक ...

Dr. Govinda Reddy participates in the International Conference on ‘Integrative Oncology’ at Harvard Medical College, Boston

Image
Dr. Govinda Reddy participates in the International Conference on ‘Integrative Oncology’ at Harvard Medical College, Boston Boston (USA)  It is a matter of pride for Dr. Govinda Reddy to represent India at the world-renowned 22nd International Conference on “Integrative Oncology” (SIO 2025) at Harvard Medical College, Boston, USA. Medical experts, researchers and renowned figures in the health sector from all over the world participated in this conference. There was an in-depth discussion on how to achieve synergy between modern medicine and complementary therapies (Integrative Oncology). This was an excellent opportunity to exchange new research and experiences in the health sector. It was said at the time that I will try to utilize the knowledge and experience gained from this participation for the progress of the health sector in India and for patient care.  Journalist RAMESH Autade  ...

सुनिता तुपसौंदर्य आणि डॉ. नीलम गोऱ्हे यांची विशेष भेट —

Image
सुनिता तुपसौंदर्य आणि डॉ. नीलम गोऱ्हे यांची विशेष भेट — आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चेला उधाण मुंबई / रमेश औताडे  महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या सुनिता तुपसौंदर्य यांनी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची सौजन्य भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघींमध्ये महिलांच्या सामाजिक सहभाग, समाजकारणातील महिलांची वाढती भूमिका आणि आगामी निवडणुकीतील महिलांच्या सहभागावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. या भेटीत सुनिता तुपसौंदर्य यांनी डॉ. गोऱ्हे यांना ‘दाही दिशा’ या पुस्तकाची प्रतीकात्मक भेट दिली. महिलांच्या आत्मविकास, विचारमंथन आणि सामाजिक योगदानावर आधारित या पुस्तकाची डॉ. गोऱ्हे यांनी प्रशंसा केली. भेटीदरम्यान महिलांसाठी स्वयंपूर्णतेचे प्रबोधन, उद्योजकतेसाठी संधी आणि स्थानिक पातळीवर महिला नेत्यांना राजकारणात प्रोत्साहन मिळावे, यावर देखील दोघींनी मतांची देवाणघेवाण केली. राजकीय वर्तुळात या भेटीबाबत मोठ्या चर्चा सुरू आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुनिता तुपसौंदर्य यांच्या सक्रियतेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यां...

तंत्रज्ञानाच्या नव्या युगात – एआय’चा वाढता प्रभाव

Image
तंत्रज्ञानाच्या नव्या युगात – एआय’चा वाढता प्रभाव     रमेश औताडे ( प्रतिनिधी )      मुंबई, दि. ११ नोव्हेंबर २०२५ :  ‘ एआय ’ म्हणजे केवळ संगणकाचा वापर नव्हे, तर मानवी मेंदूच्या विचारसरणीचे तंत्रज्ञानरूप आहे. ‘एआय’ चा वापर कौशल्यपूर्ण केला तर अधिक सुलभपणे काम करता येऊ शकते, असे मत कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशोर जस्मानी यांनी व्यक्त केले. मंत्रालय येथे रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मंत्रालयात वृत्तपत्र, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल प्रसार माध्यमांसाठी चार दिवसीय कृत्रिम बुद्धिमत्ता कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यशाळेत  'डिजिटल कन्टेंट क्रिएशन इन द एज जनरेटिव्ह एआय' या विषयावर कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशोर जस्मानी बोलत होते. यावेळी रतन टाटा महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, मंत्रालय व विधिमंडळ वार्ताहर संघाचे अध्यक्ष दिलीप सपाटे, सरचिटणीस दिपक भातुसे यासह पत्रकार मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. कृत्रिम बुद्धिमत्ता तज्ज्ञ किशोर जस्मानी...

" शासनाचे अधिकारी जनतेच्या दारी " अनोखा उपक्रम

Image
        " शासनाचे अधिकारी जनतेच्या दारी " अनोखा उपक्रम मुंबई / रमेश औताडे आशियातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध झोपडपट्टी धारावी अनेक पायाभूत सुविधांच्या समस्यांनी त्रस्त आहे. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि सरकारी योजना थेट जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी “शासनाचे अधिकारी जनतेच्या दारी” ही संकल्पना राबविण्यात आली.  निमित्त होते दौलत फाउंडेशनच्या सल्लागार समाजसेविका आयेशा खान यांच्या पुढाकाराने रेशन कार्ड केवायसी शिबिराचे आयोजन.  धारावीतील अनेक नागरिकांचे रेशनकार्ड केवायसी न झाल्यामुळे त्यांचा “आनंदाचा शिधा” (रेशन) बंद झाला होता. या पार्श्वभूमीवर गोपीनाथ कॉलनी क्रमांक २, वॉर्ड १८६ येथे आयोजित या शिबिरात तब्बल ५८० रेशन कार्डधारकांनी सहभाग घेतला. सर्वांनी रेशनकार्ड माहिती " शासनाचे अधिकारी जनतेच्या दारी” उपक्रमातून अद्ययावत करून पुन्हा रेशन घेण्यास पात्रता मिळवली. या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी दौलत फाउंडेशनचे पदाधिकारी असलम खान, शंकरलाल गुप्ता, नादिर खान तसेच शिधावाटप निरीक्षक अरुण काळे, निलेश वाघ आणि लिपिक संदीप चौधरी यांनी विशेष सहकार्य केले. अनेक क...

क्रीडा क्षेत्राचा राजकारणामुळे होणारा खेळखंडोबा हाणून पाडणार; रणजित सावरकर यांचा निर्धार

Image
क्रीडा क्षेत्राचा राजकारणामुळे होणारा खेळखंडोबा हाणून पाडणार; रणजित सावरकर यांचा निर्धार मुंबई / रमेश औताडे  भारतातील आणि महाराष्ट्रातील क्रीडा क्षेत्राचा राजकारणामुळे होणारा खेळखंडोबा हाणून पाडणार, असा निर्धार व्यक्त करत महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष रणजित सावरकर यांनी महाराष्ट्र बॉक्सिंग असोसिएशनच्या निवडणुकीत झालेल्या राजकीय हस्तक्षेपाचा पर्दाफाश पत्रकार परिषदमध्ये केला.  १४ ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयाने निकाल दिला होता की, १२ ऑक्टोबर २०२५ ला जी घटना दुरुस्ती झाली, त्या घटना दुरुस्तीनुसार आणि त्या दिवशी झालेल्या सर्वसाधारण सभेत निवडणुकीसंदर्भात घेण्यात आलेल्या निर्णयांनुसारच निवडणुका घेण्यात याव्यात. तरीही न्यायालयाचा हा आदेश धाब्यावर बसवून धर्मादाय उपायुक्तांनी १ नोव्हेंबरला काढलेल्या आदेशात २०२२ मध्ये झालेल्या घटनादुरुस्तीनुसारच निवडणूक घेण्याचे परिपत्रक काढले. याविरोधात आम्ही उच्च न्यायालयात दाद मागितल्यानंतर ७ तारखेला झालेल्या सुनावणीत न्यायालयाने यावर संताप व्यक्त केला आणि धर्मादाय उपायुक्तांना त्यांचा आदेश मागे घेण्यास सांगितले.  त्यानु...

दिव्यांग प्रवाशांना मेट्रो प्रवासात संपूर्ण सवलतीची मागणी —

Image
दिव्यांग प्रवाशांना मेट्रो प्रवासात संपूर्ण सवलतीची मागणी —    पत्रकार दीपक कैतके यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्रींकडे विनंती मुंबई / रमेश औताडे  राज्यातील एसटी महामंडळात महिला प्रवाशांना प्रवास भाड्यात ५० टक्के सवलत देण्यात आली असून उर्वरित ५० टक्के रक्कम शासनाकडून एसटी महामंडळाला परतावा स्वरूपात दिली जाते. या धर्तीवरच दिव्यांग प्रवाशांसाठीही मेट्रो प्रवासात संपूर्ण सवलत देण्यात यावी, अशी ठाम मागणी ज्येष्ठ पत्रकार आणि ‘पत्रकार रुग्णमित्र’ म्हणून ओळखले जाणारे दीपक कैतके यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच मुंबई मेट्रो प्रशासन यांच्याकडे केली आहे. कैतके यांनी आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, मुंबई मेट्रोच्या स्थानकांमध्ये आणि गाड्यांमध्ये अद्याप दिव्यांग अनुकूल सुविधा पूर्णपणे उपलब्ध नाहीत. अनेक दिव्यांग प्रवाशांना प्रवास करताना सहकारी व्यक्तीची मदत घ्यावी लागते. त्यामुळे त्यांच्या प्रवासाचा खर्च दुपटीने वाढतो. या अडचणींचा विचार करून, शासनाने दिव्यांग बांधवांसाठी मेट्रो प्रवास पूर्णपणे मोफत करावा, अशी त्य...

डॉक्टर साठी काँग्रेस आक्रमक

Image

سینئر صحافی مہیش اُپدیو کا قلم جمع کرنے کا شوق

Image
✍️ سینئر صحافی مہیش اُپدیو کا قلم جمع کرنے کا شوق ناگپور کے سینئر صحافی مہیش اُپدیو نے گزشتہ 39 برسوں سے قلم (رائٹنگ پین) جمع کرنے کا ایک انوکھا شوق اپنایا ہے۔ انہوں نے اب تک 9,000 سے زیادہ قلم جمع کیے ہیں۔ شوق کا آغاز اور تحریک  * بچپن میں ان کی خواہش تھی کہ ان کے پاس اچھا قلم ہو، لیکن مالی حالات کی وجہ سے یہ ممکن نہ ہو سکا۔ ان کے والد نے انہیں سیاہی والے قلم کی نب کی ڈبی دی تھی۔  * انہوں نے 1982 سے نئے قلم جمع کرنے کا پختہ ارادہ کیا۔  * بطور کھلاڑی اور باسکٹ بال امپائر مختلف ریاستوں میں سفر کے دوران، وہ منفرد قلم کی تلاش میں رہتے تھے۔  * زندگی کے ایک موڑ پر وہ صحافی بن گئے، اور چونکہ صحافی کا اصل ہتھیار 'قلم' ہوتا ہے، اس لیے ان کا شوق مزید مضبوط ہوتا گیا۔ قلم کا ذخیرہ اور ان کی 'دولت'  * آج اگرچہ کمپیوٹر کا دور ہے، لیکن قلم کی اہمیت آج بھی برقرار ہے۔  * ان کے مجموعے میں بورُو (سرکنڈا)، ٹاک سے لے کر جدید ترین قلم شامل ہیں۔  * قلم کی قیمت پانچ روپے سے لے کر دس ہزار روپے تک ہے۔ انہوں نے اس مجموعے پر 9 سے 10 لاکھ روپے خرچ کیے ہیں۔  * ان ...

पर्यावरणाबरोबरच पशु पक्षी यांचे संरक्षण व्हावे - विजय शेट्टी

Image
     पर्यावरणाबरोबरच पशु पक्षी यांचे संरक्षण व्हावे - विजय शेट्टी         केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आवाहनाला प्रतिसाद मुंबई / रमेश औताडे  ( मंत्रालय प्रतिनिधी ) पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  आकाशात वापरल्या जाणाऱ्या अतितीव्र प्रकाश फेकणाऱ्या यंत्रणा (बीमर लाईट) विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रामदास आठवले) गटाचे मुंबई पर्यावरण विभाग अध्यक्ष विजय शेट्टी यांनी नागरिकांना सुरक्षित आणि शांत वातावरणात जगण्याचा हक्क मिळावा व पर्यावरणाबरोबरच पशु पक्षी यांचे संरक्षण व्हावे अशी मागणी केली आहे. सामाजिक न्याय केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नुकतेच पर्यावरण परिषदेत शेट्टी यांना याबाबत सूचित केले होते की या बिमर लाईट बाबत योग्य ती कारवाई मुंबई विभाग अध्यक्ष विजय शेट्टी यांनी करावी. त्या पार्श्वभूमीवर शेट्टी यांनी संबंधित सर्व विभागाला तक्रार करत पत्रव्यवहार केला आहे. “पर्यावरण वाचवा, जगण्याचा हक्क जपा, भीतीमुक्त जगा” अशा घोषणांद्वारे या प्रकाशांच्या त्रासाविरोधात आवाज उठवण्यात आला आहे. हे अतितीव्र प्रकाश म्हणजे निसर्गावर क...

Rotary International District 3141

Image
Rotary International District 3141 मुंबई / पी आर न्यूज मिडिया नेटवर्क  Rotary District 3141 हा भारतातील महाराष्ट्र राज्यातील मुंबई क्षेत्रातील क्लब्सचा एक महत्त्वाचा विभाग आहे.  हा डिस्ट्रिक्ट Rotary International च्या झोन-4 अंतर्गत येतो.  क्षेत्रफळ : मुंबई शहर आणि त्याच्या आसपासचे छोटे-मोठे भाग — “Churchgate to Dahanu & CST to Mulund”.  क्लब्सची संख्या : 2024 च्या अंदाजानुसार सुमारे 115 क्लब्स आणि 6,300+ सदस्य.  2025-26 साठी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर : Manish Ramesh Motwani.  इतिहासाचा थोडक्यात आढावा पूर्वी या भागातील क्लब्स मोठ्या डिस्ट्रिक्ट्समध्ये होत्या. डिस्ट्रिक्ट 314 आणि नंतर 3140 अशा रूपांनी अस्तित्वात होत्या.  1 जुलै 2016 पासून डिस्ट्रिक्ट 3141 व 3142 अशी विभाजित झाली.  त्यानंतर 3141 ने स्वतंत्रपणे मुंबईच्‍या क्लब्ससाठी काम सुरु केले.  प्रमुख उपक्रम व सेवा क्षेत्रे शिक्षण, आरोग्य, स्वच्छता, सामाजिक समावेश अशा अनेक सेवा उपक्रमात हा डिस्ट्रिक्ट सक्रिय आहे. उदाहरणार्थ: कॉलेज-स्तरीय क्लब्स, रोटरॅक्ट (युवा शाखा), विविध सामाजिक...

गरजवंतासाठी हॉस्पिटलची निर्मिती अन् महिलांना मोफत रिक्षा वाटप

Image
गरजवंतासाठी हॉस्पिटलची निर्मिती अन् महिलांना मोफत रिक्षा वाटप मुंबई / रमेश औताडे  रोटरी क्लबच्या वतीने नुकताच एक महत्त्वपूर्ण आणि बहुउपयोगी असा दुहेरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात एका आधुनिक हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले, तसेच महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकत गरजू महिलांना 'पिंक ऑटोरिक्षां'चे वाटप करण्यात आले असल्याची माहिती रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर (३१४१) डॉ. मनीष मोटवानी यांनी दिली. रोटरी क्लबने समाजाच्या आरोग्य गरजा लक्षात घेऊन एका अत्याधुनिक हॉस्पिटलची निर्मिती केली आहे. समाजातील सर्व स्तरातील लोकांना, विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना, माफक दरात उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा उपलब्ध करणे.  यात आधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि सुविधांचा समावेश आहे. अनुभवी डॉक्टर आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांची टीम कार्यरत असेल. या हॉस्पिटलमुळे परिसरातील अनेक लोकांना आरोग्य तपासणी आणि उपचारासाठी मोठा आधार मिळणार आहे. असे  रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर (३१४१) डॉ. मनीष मोटवानी यांनी सांगितले.  महिलांना स्वत:चा व्यवसाय सुरू करता येई...

महिला सक्षमीकरणाकडे 'पिंक रिक्षां'ची वाटचाल

Image
  महिला सक्षमीकरणाकडे 'पिंक रिक्षां'ची वाटचाल मुंबई / रमेश औताडे  महिलांना स्वयंरोजगाराचे आणि आर्थिक स्वातंत्र्याचे बळ मिळावे या उद्देशाने, रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पियर आणि रोटरी डिस्ट्रिक्ट ३१४१ च्या अध्यक्षा रोटेरियन नुपूर देसाई यांनी गरजू आणि पात्र महिलांना 'पिंक रिक्षा' चे वाटप केले. हा उपक्रम महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल ठरला आहे.  या 'पिंक रिक्षा' उपक्रमाचा मुख्य उद्देश गरजू महिलांना सन्मानाने उपजीविका कमावण्याचे साधन उपलब्ध करून देणे हा आहे, ज्यामुळे त्या आर्थिकदृष्ट्या आत्मनिर्भर होऊ शकतील. रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण पूर्ण केलेल्या आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याची इच्छा असलेल्या निवडक महिलांना या रिक्षा प्रदान करण्यात आल्या. या रिक्षा केवळ प्रवासाचे साधन नसून, महिलांसाठी आत्मसन्मान आणि सुरक्षित भविष्याची गुरुकिल्ली आहेत. नुपूर देसाई यांच्या दूरदृष्टी आणि नेतृत्वाखाली हा प्रकल्प यशस्वी झाला. रोटरी क्लब ऑफ बॉम्बे पियर नेहमीच समाजातील वंचित घटकांना मदत करण्यासाठी अग्रेसर राहिला आहे, आणि 'सेवा परमो धर्म' या रोटरीच्या तत्...

मुस्कान और उजियारा — विशेष रूप से सक्षम बच्चों के लिए एक विशेष सुबह

मुस्कान और उजियारा — विशेष रूप से सक्षम बच्चों के लिए एक विशेष सुबह मुंबई / रमेश औताडे  “मुस्कान और उजियारा – विशेष रूप से सक्षम बच्चों के लिए एक विशेष सुबह” शीर्षक से एक प्रेरणादायक और हृदयस्पर्शी कार्यक्रम नेहरू विज्ञान केंद्र, मुंबई में शुक्रवार, 8 नवम्बर 2025 को रोटरी सेवा सप्ताह के अंतर्गत आयोजित किया गया। रोटरी क्लब्स ऑफ डिस्ट्रिक्ट 3141 द्वारा आयोजित इस कार्यक्रम में विभिन्न विशेष विद्यालयों के बच्चों ने संगीत और नृत्य के माध्यम से अपनी प्रतिभा और आत्मविश्वास का शानदार प्रदर्शन किया। ये बच्चे — दृष्टिबाधित, शारीरिक रूप से या मानसिक रूप से चुनौतियों का सामना करने वाले — अपनी रचनात्मकता और उत्साह से मंच को रोशन कर गए, यह सिद्ध करते हुए कि क्षमता हमेशा सीमाओं से परे होती है। प्रदर्शन करने वाले विद्यालय: 1. कमला मेहता स्कूल फॉर द ब्लाइंड 2. सोसाइटी फॉर द एजुकेशन ऑफ द चैलेंज्ड (SEC) 3. सोसाइटी फॉर द वोकेशनल रिहैबिलिटेशन ऑफ द रिटार्डेड (SVRR) 4. एडैप्ट (Able Disabled All People Together) 5. रोटरी संस्कारधाम स्कूल कार्यक्रम का एक विशेष आकर्षण था श्री बंदेनवाज़, एक प्रतिभाशाली ...

समाजसेविका लीना अहिर यांची बहुजन क्रांती सेनेच्या प्रदेशाध्यक्ष (महिला आघाडी) पदावर नियुक्ती मुळे अभिनंदनाचा वर्षाव...

Image
समाजसेविका लीना अहिर यांची बहुजन क्रांती सेनेच्या प्रदेशाध्यक्ष (महिला आघाडी) पदावर नियुक्ती मुळे अभिनंदनाचा वर्षाव... मुंबई / मंत्रालय प्रतिनिधी गोवंडी (मुंबई) येथील लोकप्रिय आणि कार्यरत समाजसेविका श्रीमती लीना अहिर यांची बहुजन क्रांती सेनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी, महाराष्ट्र राज्यासाठी, नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. लीनाताई अहिर यांच्या अथक सामाजिक कार्याची दखल घेत पक्षाने त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. लोकांमध्ये लोकप्रिय आणि तळमळीच्या कार्यकर्त्या .... लीनाताई अहिर या एक लोकप्रिय आणि तळमळीच्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा जनसंपर्क दांडगा असून, त्या अनेक वर्षांपासून समाजासाठी कार्यरत आहेत. विशेषतः गोवंडी आणि परिसरातील सामान्य नागरिक, श्रमिक आणि तळागाळातील महिलांच्या प्रश्नांवर त्या सातत्याने आवाज उठवतात. निसर्गप्रेमी आणि समस्या निवारणात तत्पर ..... लीनाताई अहिर या निसर्गप्रेमी आहेत. त्यांच्या सामाजिक कार्यात निसर्ग आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यावरही त्यांचा भर असतो. समाजातील अडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी त्या सदैव तत्...

आंतरराज्य दिव्यांग एलआयसी क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन

Image
आंतरराज्य दिव्यांग एलआयसी क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन ​मुंबई / रमेश औताडे  आपल्या सर्वांमध्ये समान प्रतिभा नसते, परंतु आपल्या सर्वांना आपली प्रतिभा विकसित करण्याची समान संधी असते असे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार दिव्यांग खेळाडूंनी अमलात आणले याचे कौतुक वाटत आहे. असे मत एल आय सी चे व्यवस्थापकीय संचालक रत्नाकर पटनायक यांनी दिव्यांग आंतरराज्य दिव्यांग एल आय सी ट्रॉफी २०२५ च्या उद्घाटन प्रसंगी मुंबई पोलिस जिमखाना येथे व्यक्त केले. ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर द फिजिकली चॅलेंज्ड आणि व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. अध्यक्ष कर्सन घावरी, उपाध्यक्ष अनिल जोगळेकर, खजिनदार राजेश पाटील, सचिव  विनायक धोत्रे, वरिष्ठ सदस्य मीनल पोतनीस, एल आय सी चे सेल्स मॅनेजर नरेंद्र सुर्वे, पी आर ओ संदेश बुटाला, मार्केटिंग मॅनेजर बी एन केकरजावळेकर, एफ पी एच चे जनरल मॅनेजर विजय वाभळे, वरिष्ठ अधिकारी शीतल धनक, दिव्यांग मुंबई क्रिकेट अशोशियशन चे अध्यक्ष विठ्ठल जाधव, माजी आमदार कृष्णा हेगडे, न्यू इंडिया इन्शुरन्स चे सतीश खैराडकर, डॉ गणेश भिसे उपस्थित होते. स्पर्...

विद्यार्थी व महिलांना गरजेच्या वस्तू वाटप

Image
विद्यार्थी व महिलांना गरजेच्या वस्तू वाटप मुंबई / रमेश औताडे  राष्ट्रीय स्वाभिमानी मातंग संघटनेतर्फे आमदार अमित गोरखे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे व मुंबई येथे विद्यार्थ्यांना मोफत संगणक प्रशिक्षण कार्यक्रम व मोफत साखर वाटप करण्यात आले. अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष राजीव मानकर यांनी दिली. कार्यक्रम वेळी रमेश दोडके, गजानन वानखेडे, समाधान सावळे, दिलीप यादव, अरुण कांबळे, हरिश दांडगे, सीताबाई चांदणे, सुनील भालेराव, सुनील सुरडकर, वीजया वानखेडे, रुपाली पचाल, संतोष सुरडकर उपस्थित होते. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सर्व मुंबईकरांना समान हक्क द्या

Image
मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सर्व मुंबईकरांना समान हक्क द्या  मुंबई / रमेश औताडे  माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर तसेच पुर्ण मुंबई स्लम मध्ये रहिवाशांना 500  स्क्वेअर फुटतात घर मिळले पाहिजे  धारावी प्रकल्प या ठिकाणी आदाणी व्यापारी साठी लवकर धारावीच्या नागरिकांनी जागा खाली करावी या साठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी धारावीच्या नागरिकांसाठी 500 चौरस फुटाचे घराची घोषणा केली  महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणीस साहेब यांनी सर्व स्लममधल्या राहणाऱ्या मुंबईकरांना 500 स्क्वेअर फुटचे घर देऊन सर्वांना समान हक्क द्यावा अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे राज्य संघटक श्री विलासभाऊ रूपवते यांनी केली  काही दिवसांपूर्वी घाटकोपर माता रमाबाई आंबेडकर नगर कामराज नगर प्रकल्पाचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी नारळ फोडून भूमिपूजन केले  माता रमाबाई आंबेडकर नगर कामराज नगर या ठिकाणी कष्टकरी कामगार व जास्त मागासवर्गीय समाज राहातो या ...

पर्ससीन आणि एलईडी मासेमारी विरोधात पारंपरिक मच्छिमारांचा एल्गार

Image
पर्ससीन आणि एलईडी मासेमारी विरोधात पारंपरिक मच्छिमारांचा एल्गार ​मुंबई / रमेश औताडे  ​पारंपरिक मच्छिमार संरक्षण समितीचे अध्यक्ष मिलिंद सौदिया यांच्या नेतृत्वाखालील समितीने पर्ससीन आणि एलईडी (दिव्यांच्या प्रकाशात) मासेमारीवर कायमची बंदी घालण्याची जोरदार मागणी विद्यमान (सत्ताबदल झालेल्या) सरकारकडे केली आहे. समितीने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात, या मासेमारीमुळे पारंपरिक मच्छिमारांचे मोठे नुकसान होत असल्याचा आणि मासेमारी व्यवसायात विषमता व अस्थिरता निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. ​समितीनुसार, पर्ससीन मासेमारीला १२ नॉटिकल मैलापर्यंत बंदी असून, एलईडी मासेमारीला संपूर्ण राज्यात बंदी असतानाही अनेक ठिकाणी या नियमांचे सर्रास उल्लंघन सुरू आहे. मत्स्यव्यवसाय विभागातील काही अधिकारी बेकायदा मासेमारीला प्रोत्साहन देत असल्याचा आणि त्यांच्या भ्रष्टाचाराला ही परिस्थिती जबाबदार असल्याचा गंभीर आरोपही मच्छिमार नेत्यांनी केला आहे. वाढत्या बेकायदा मासेमारीमुळे पारंपरिक मच्छिमारांसाठी मासेमारीचे क्षेत्र लहान झाले आहे. तसेच, मासमारयुग नावाच्या संघटनेने मत्स्य आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यां...