प्रत्येक घराघरात आरोग्य आणि आनंद यांचा संगम
मुंबई / रमेश औताडे
भारतातील प्रत्येक घराघरात आरोग्य आणि आनंद यांचा संगम सदैव राहण्यासाठी व सामान्य माणसाला आरोग्य सेवा परवडेल यासाठी नवीन, प्रगत तंत्रज्ञानाचा उपयोग करत शहरी व ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सेवा देण्याचा आमचा मानस आहे. असे मत अपोलो हॉस्पिटल ग्रुप चे अध्यक्ष डॉ प्रताप सी रेड्डी पत्रकार परिषदेत सांगितले.
अपोलो हॉस्पिटल्सने पुण्यातील स्वारगेट येथे आपले नवे हॉस्पिटल सुरु केले असून ४०० बेड्सची क्षमता असलेले हे रुग्णालय अतिउच्च दर्जाचे आहे असे हॉस्पिटल्सच्या कार्यकारी उपाध्यक्ष डॉ प्रीता रेड्डी यांनी सांगितले. चार दशकांहून अधिक काळापासून चालत आलेला वारसा पुढे नेत आहोत. रुग्णांनी गेल्या अनेक पिढ्यांपासून आमच्यावर ठेवलेल्या विश्वासाचा आम्ही सन्मान करत आहोत.
व्यवस्थापकीय संचालिका सुनीता रेड्डी यांनी सांगितले,"आमचे पुणे हॉस्पिटल अपोलोच्या वाढत्या राष्ट्रीय विस्तारामध्ये उचलण्यात आलेले एक धोरणात्मक पाऊल आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी आणि अध्यक्ष डॉ मधू ससिधर यांनी सांगितले,"आमचे पुणे हॉस्पिटल सुरक्षा विज्ञान, पुराव्यांवर आधारित प्रॅक्टिस आणि एका अशा संस्कृतीच्या पायावर उभारण्यात आले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मनीषा कर्माकर यांनी सांगितले,"पुणे शहरामध्ये आमचे नवे हॉस्पिटल क्लिनिकल उत्कृष्टतेप्रती अपोलोची बांधिलकी दर्शवते.
Comments
Post a Comment