सुनिता तुपसौंदर्य आणि डॉ. नीलम गोऱ्हे यांची विशेष भेट —

सुनिता तुपसौंदर्य आणि डॉ. नीलम गोऱ्हे यांची विशेष भेट —

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चेला उधाण
मुंबई / रमेश औताडे 

महिलांच्या सक्षमीकरणासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या सुनिता तुपसौंदर्य यांनी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची सौजन्य भेट घेतली. या भेटीदरम्यान दोघींमध्ये महिलांच्या सामाजिक सहभाग, समाजकारणातील महिलांची वाढती भूमिका आणि आगामी निवडणुकीतील महिलांच्या सहभागावर सविस्तर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे.

या भेटीत सुनिता तुपसौंदर्य यांनी डॉ. गोऱ्हे यांना ‘दाही दिशा’ या पुस्तकाची प्रतीकात्मक भेट दिली. महिलांच्या आत्मविकास, विचारमंथन आणि सामाजिक योगदानावर आधारित या पुस्तकाची डॉ. गोऱ्हे यांनी प्रशंसा केली.

भेटीदरम्यान महिलांसाठी स्वयंपूर्णतेचे प्रबोधन, उद्योजकतेसाठी संधी आणि स्थानिक पातळीवर महिला नेत्यांना राजकारणात प्रोत्साहन मिळावे, यावर देखील दोघींनी मतांची देवाणघेवाण केली.

राजकीय वर्तुळात या भेटीबाबत मोठ्या चर्चा सुरू आहेत. आगामी महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सुनिता तुपसौंदर्य यांच्या सक्रियतेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्यांचे नाव नगरसेवकपदासाठी चर्चेत असून, त्यांच्या नेतृत्वगुणांमुळे स्थानिक पातळीवर त्यांना मोठा पाठिंबा मिळत असल्याचे बोलले जात आहे.

महिला सक्षमीकरणासाठी दीर्घकाळ काम करणाऱ्या सुनिता तुपसौंदर्य यांनी समाजसेवेच्या माध्यमातून आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यांचा साधेपणा, लोकांशी थेट संवाद आणि समस्यांवर प्रत्यक्ष कृती करण्याची पद्धत यामुळे त्या महिलांमध्ये लोकप्रिय आहेत.

या भेटीमुळे महिलांच्या नेतृत्वाचा नवा अध्याय सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, आगामी काळात सुनिता तुपसौंदर्य यांच्या राजकीय वाटचालीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रमेश औताडे, मुंबई
प्रसिद्धी साठी 
7021777291

Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन