पर्यावरणाबरोबरच पशु पक्षी यांचे संरक्षण व्हावे - विजय शेट्टी

     पर्यावरणाबरोबरच पशु पक्षी यांचे संरक्षण व्हावे - विजय शेट्टी 

       केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या आवाहनाला प्रतिसाद

मुंबई / रमेश औताडे  ( मंत्रालय प्रतिनिधी )
पी आर न्यूज मिडिया नेटवर्क 

आकाशात वापरल्या जाणाऱ्या अतितीव्र प्रकाश फेकणाऱ्या यंत्रणा (बीमर लाईट) विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (रामदास आठवले) गटाचे मुंबई पर्यावरण विभाग अध्यक्ष विजय शेट्टी यांनी नागरिकांना सुरक्षित आणि शांत वातावरणात जगण्याचा हक्क मिळावा व पर्यावरणाबरोबरच पशु पक्षी यांचे संरक्षण व्हावे अशी मागणी केली आहे.

सामाजिक न्याय केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी नुकतेच पर्यावरण परिषदेत शेट्टी यांना याबाबत सूचित केले होते की या बिमर लाईट बाबत योग्य ती कारवाई मुंबई विभाग अध्यक्ष विजय शेट्टी यांनी करावी. त्या पार्श्वभूमीवर शेट्टी यांनी संबंधित सर्व विभागाला तक्रार करत पत्रव्यवहार केला आहे.

“पर्यावरण वाचवा, जगण्याचा हक्क जपा, भीतीमुक्त जगा” अशा घोषणांद्वारे या प्रकाशांच्या त्रासाविरोधात आवाज उठवण्यात आला आहे. हे अतितीव्र प्रकाश म्हणजे निसर्गावर केलेली हिंसा आहे. शासनाच्या विमान प्राधिकरण विभागाने अशा तीव्र प्रकाशांना परवानगी कोणत्या नियमांनुसार दिली, असा सवाल यात करण्यात आला आहे. या प्रकाशांमुळे पर्यावरण आणि जीवसृष्टी दोन्ही त्रस्त होत असल्याचे नमूद केले आहे.

या प्रकाशांची झगमग, रंगांचा सतत बदल आणि आकाशात नागमोडी हालचाल यामुळे पक्षी आणि रात्री फिरणारे प्राणी गोंधळतात. तसेच उघड्यावर राहणारे गरीब लोक आणि सामान्य नागरिक या प्रकाशामुळे घाबरतात. या कृत्रिम प्रकाशांमुळे लोकांची एकाग्रता आणि मानसिक शांतता बिघडते. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुंबई विभाग ची पर्यावरण परिषद आयोजित केली होती. त्यावेळी पर्यावरण जनजागृती करत शेट्टी यांनी या समस्येवर आवाज उठवत तक्रार केली आहे. ही तक्रार केवळ आवाज किंवा धूर प्रदूषणाबाबत नसून, प्रकाश प्रदूषणाविरुद्ध दिलेला लोकांचा आवाज आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन