बिबट्याच्या भीतीपोटी सरपंचांची थेट वनमंत्र्यांकडे धाव



बिबट्याच्या  सततच्या हल्ल्यामुळे गावकऱ्यांमध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले असताना, डमाळवाडी गावाचे सरपंच आंबादास डमाळे यांनी थेट राज्याचे वनमंत्री गणेशजी नाईक यांच्याकडे तातडीच्या उपाययोजनांची मागणी करणारे पत्र दिले.

सरपंचांनी गावातील प्रत्येक नागरिकाला ‘परिवाराचा सदस्य’ मानून त्यांच्या सुरक्षिततेसाठी केलेली ही धावपळ राज्यस्तरावर पोहोचली. सरपंच डमाळे यांच्या निवेदनाची गंभीर दखल घेत वनमंत्री गणेश नाईक यांनी मंत्रिमंडळ बैठकीत संबंधित मुद्दा मांडत त्वरित कारवाईचे आदेश जारी केले.

गावकऱ्यांचे भीतीचे सावट दूर करण्यासाठी स्थानिक पातळीवर सुरू असलेल्या प्रयत्नांना आता राज्यस्तरीय अधिकाऱ्यांचे पाठबळ मिळाले असून, वन विभागाकडून पुढील काही दिवसांत आवश्यक पावले उचलली जाणार असल्याची माहिती समोर आली आहे.

गावाच्या सुरक्षेसाठी दाखवलेली तत्परता आणि जबाबदारी लक्षात घेता सरपंच आंबादास डमाळे यांचे प्रयत्न तसेच प्रकरणात सकारात्मक दखल घेत वनमंत्री गणेशजी नाईक यांनी दाखवलेली संवेदनशीलता दोघांचेही हे कार्य गावकऱ्यांकडून कौतुकास्पद मानले जात आहे.अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख ज्ञानेश्वर शिरसाट ( माऊली ) यांनी माध्यमांना दिली.

पी आर न्यूज मिडिया नेटवर्क 
संपादक रमेश औताडे 
7021777291

Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन