वीर लहुजी वस्ताद साळवे जयंतीनिमित्त बाईक रॅली
वीर लहुजी वस्ताद साळवे जयंतीनिमित्त बाईक रॅली
मुंबई / रमेश औताडे
राष्ट्रीय स्वाभिमानी मातंग संघटनेच्या वतीने वीर लहुजी वस्ताद साळवे यांच्या जयंतीनिमित्त ठाण्यामध्ये भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. या आयोजनाला समाज बांधवांकडून प्रचंड उत्साहाचा प्रतिसाद मिळाला. रॅलीची सुरुवात ठाणे रेल्वे स्टेशन येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून झाली. येथून संपूर्ण ठाणे शहरातील मातंग वस्त्यांमध्ये रॅलीचे मार्गक्रमण झाले.
नाक्या-नाक्यांवर वीर लहुजी वस्ताद साळवे, डॉ. आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने जयजयकार करण्यात आला. यावेळी अनेक समाज बांधवांनी फटाके व पुष्पवृष्टी करत रॅलीचे उत्साहाने स्वागत केले.
या रॅलीला राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा पदाधिकारी मनोज प्रधान, भाजप नगरसेविका कांबळे , नगरसेवक यादव यांच्यासह विविध राजकीय पक्षांतील पदाधिकाऱ्यांनी भेट दिली. तसेच, लोकमान्य नगर येथे आरपीआय नेते इदिसे परिवारातील सदस्यांनीही स्वागत केले. पुढील वर्षापासून रॅलीचे आयोजन अधिक भव्य स्वरूपात करावे, अशी मागणी समाज बांधवांनी केली.
रमेश औताडे
7021777291
Comments
Post a Comment