सम्यक कोकण कला संस्था रौप्य महोत्सव, वर्धापन दिन कला भूषण जीवनगौरव पुरस्कार वितरणाचा भव्य कार्यक्रम
मुंबई / रमेश औताडे
सम्यक कोकण कला संस्था (रजि.) महाराष्ट्रतर्फे आयोजित रौप्य महोत्सव, वर्धापन दिन, स्मरणिका व दिनदर्शिका प्रकाशन तसेच सम्यक कला भूषण जीवनगौरव पुरस्कार वितरणाचा भव्य कार्यक्रम सोहळा शनिवार, २९ नोव्हेंबर रोजी दादर (पूर्व) येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन येथे संपन्न होणार आहे. यावेळी संस्थेच्या पंचवीस वर्षांच्या सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक व क्रीडा क्षेत्रातील योगदानाचा आढावा घेतला जाणार आहे. रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त राज्यभरातील दीडशे ते दोनशे ज्येष्ठ कलावंतांचा सन्मान होणार आहे. अशी माहिती संस्थेचे अध्यक्ष मंदार कवाडे व उपाध्यक्ष विनोद धोत्रे यांनी मुंबई मराठी पत्रकार संघात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. संस्थेचे अध्यक्ष मंदार कवाडे, उपाध्यक्ष कवी, गीतकार व संगीतकार विनोद धोत्रे, यांच्यासह सुभाष सावंत, नरेश शिंदे मुकूंद तांबे, चिंतामणी जाधव आदी पदाधिकारी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे उद्घाटन रिपब्लिकन सेनेचे सरसेनापती आनंदराज आंबेडकर यांच्या शुभहस्ते होणार असून कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट भूषवणार आहेत. मुख्य पाहुण्यांमध्ये मा. आमदार यामिनी जाधव, उद्योजक अमोल रोकडे, अशोक कवाडे, प्रदीप खेत्रे, समाजसेवक योगेश गावडे यांच्यासह विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहे. या कार्यक्रमात कला जीवनगौरव पुरस्कार, राज्यस्तरीय सन्मान, फुलगुच्छ आणि मानचिन्ह असे विविध पुरस्कार देण्यात येणार आहेत. कार्यक्रमासाठी सर्व मान्यवर, नागरिक, बंधू-भगिनी यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहून सोहळ्याची शोभा वाढवण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त राज्यभरातील दीडशे ते दोनशे ज्येष्ठ कलावंतांचा सन्मान सम्यक कोकण कला संस्कृती मंचतर्फे करण्यात येणार आहे. तसेच संस्थेच्या वार्षिक परंपरेनुसार दिनदर्शिका व स्मरणिकेचे प्रकाशनही या सोहळ्यात होणार आहे. सायंकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत आकर्षक सम्यक लोककला महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. तसेच रात्री ८.३० ते ९.३० या वेळेत धम्मदान भोजनाचे आयोजन उद्योजक अमोल रोकडे यांच्या सौजन्याने करण्यात येणार आहे. असे कवाडे यांनी सांगितले.
पी आर न्यूज मिडिया नेटवर्क
रमेश औताडे 7021777291
Comments
Post a Comment