समाजसेविका लीना अहिर यांची बहुजन क्रांती सेनेच्या प्रदेशाध्यक्ष (महिला आघाडी) पदावर नियुक्ती मुळे अभिनंदनाचा वर्षाव...
समाजसेविका लीना अहिर यांची बहुजन क्रांती सेनेच्या प्रदेशाध्यक्ष (महिला आघाडी) पदावर नियुक्ती मुळे अभिनंदनाचा वर्षाव...
मुंबई / मंत्रालय प्रतिनिधी
गोवंडी (मुंबई) येथील लोकप्रिय आणि कार्यरत समाजसेविका श्रीमती लीना अहिर यांची बहुजन क्रांती सेनेच्या महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्षपदी, महाराष्ट्र राज्यासाठी, नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे. लीनाताई अहिर यांच्या अथक सामाजिक कार्याची दखल घेत पक्षाने त्यांना ही महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे.
लोकांमध्ये लोकप्रिय आणि तळमळीच्या कार्यकर्त्या ....
लीनाताई अहिर या एक लोकप्रिय आणि तळमळीच्या सामाजिक कार्यकर्त्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांचा जनसंपर्क दांडगा असून, त्या अनेक वर्षांपासून समाजासाठी कार्यरत आहेत. विशेषतः गोवंडी आणि परिसरातील सामान्य नागरिक, श्रमिक आणि तळागाळातील महिलांच्या प्रश्नांवर त्या सातत्याने आवाज उठवतात.
निसर्गप्रेमी आणि समस्या निवारणात तत्पर .....
लीनाताई अहिर या निसर्गप्रेमी आहेत. त्यांच्या सामाजिक कार्यात निसर्ग आणि पर्यावरणाचे रक्षण करण्यावरही त्यांचा भर असतो. समाजातील अडचणी आणि समस्या सोडवण्यासाठी त्या सदैव तत्पर असतात. वंचित आणि उपेक्षित बांधवांच्या सामाजिक, आर्थिक तसेच इतर लहान-मोठ्या समस्या सोडवण्यासाठी त्या पुढाकार घेतात.
सर्वत्र कौतुक....
बहुजन क्रांती सेनेच्या प्रदेशाध्यक्ष, महिला आघाडी (महाराष्ट्र) या महत्त्वपूर्ण पदावर लीनाताई अहिर यांची निवड झाल्यामुळे त्यांच्या कार्याला नवी दिशा मिळणार आहे. त्यांच्या या निवडीबद्दल त्यांचे समर्थक, सामाजिक क्षेत्रातील मान्यवर आणि सर्वत्र कौतुक व्यक्त होत आहे.
रमेश औताडे
संपादक
पी आर न्यूज मिडिया नेटवर्क
7021777291
.
Comments
Post a Comment