पर्ससीन आणि एलईडी मासेमारी विरोधात पारंपरिक मच्छिमारांचा एल्गार

पर्ससीन आणि एलईडी मासेमारी विरोधात पारंपरिक मच्छिमारांचा एल्गार

​मुंबई / रमेश औताडे 

​पारंपरिक मच्छिमार संरक्षण समितीचे अध्यक्ष मिलिंद सौदिया यांच्या नेतृत्वाखालील समितीने पर्ससीन आणि एलईडी (दिव्यांच्या प्रकाशात) मासेमारीवर कायमची बंदी घालण्याची जोरदार मागणी विद्यमान (सत्ताबदल झालेल्या) सरकारकडे केली आहे. समितीने जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात, या मासेमारीमुळे पारंपरिक मच्छिमारांचे मोठे नुकसान होत असल्याचा आणि मासेमारी व्यवसायात विषमता व अस्थिरता निर्माण झाल्याचा आरोप करण्यात आला आहे.

​समितीनुसार, पर्ससीन मासेमारीला १२ नॉटिकल मैलापर्यंत बंदी असून, एलईडी मासेमारीला संपूर्ण राज्यात बंदी असतानाही अनेक ठिकाणी या नियमांचे सर्रास उल्लंघन सुरू आहे. मत्स्यव्यवसाय विभागातील काही अधिकारी बेकायदा मासेमारीला प्रोत्साहन देत असल्याचा आणि त्यांच्या भ्रष्टाचाराला ही परिस्थिती जबाबदार असल्याचा गंभीर आरोपही मच्छिमार नेत्यांनी केला आहे. वाढत्या बेकायदा मासेमारीमुळे पारंपरिक मच्छिमारांसाठी मासेमारीचे क्षेत्र लहान झाले आहे. तसेच, मासमारयुग नावाच्या संघटनेने मत्स्य आयुक्तालयाच्या अधिकाऱ्यांनी पकडलेली बेकायदेशीर पर्ससीन बोट सोडवून घेतली आणि पकडणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची धमकी दिली, असा धक्कादायक उल्लेखही पत्रकात करण्यात आला आहे.

​या सर्व गंभीर प्रश्नांकडे पूर्वीच्या सत्ताधाऱ्यांनीही दुर्लक्ष केले, त्यामुळे सरकारने आश्वासने न पाळता ठोस कारवाई करावी, अशी मागणी मच्छिमारांनी केली आहे. ​अवेळी अँटनी माजगावकर (महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती), विशाल पाटील (कोळी युवाशक्ती संघटना), जयेंद्र कोळी (ठाणे जिल्हा मध्यवर्ती मच्छिमार संघ), राम तांडेल (अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समिती) आणि थेल्स माटक (रोजा फाऊंडेशन) पदाधिकारी उपस्थित होते.

 

Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन