देशातील सर्वात मोठ्या बाल कर्करोग निवासस्थान चे उद्घाटन
मुंबई / रमेश औताडे
सेंट जूड इंडिया चाइल्डकेअर सेंटर्स आणि टाटा मेमोरियल सेंटरच्या सहकार्याने खारघर येथे देशातील सर्वात मोठे बालकर्करोग निवासस्थान चे उद्घाटन टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांच्या हस्ते झाले. या अत्याधुनिक इमारती मध्ये दरवर्षी ७०० हून अधिक कर्करोगग्रस्त मुलांच्या कुटुंबांना मोफत, स्वच्छ व सुरक्षित निवास मिळणार आहे.
परवडणाऱ्या निवासाच्या अभावी उपचार अर्धवट सोडणाऱ्या कुटुंबांची संख्या आता कमी झाली आहे. इमारतीत लायब्ररी, क्लासरूम, स्किलिंग सेंटर आणि ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ची व्यवस्था असून, देशभरात अशी केंद्रे उभारण्यासाठी इतर संस्थांना प्रशिक्षण दिले जाईल. सेंट जूडच्या अध्यक्षा मनीषा पार्थसारथी म्हणाल्या, “हे केंद्र फक्त निवासस्थान नसून, कोणत्याही मुलाने जागेअभावी उपचार गमावू नयेत याचे आमचे वचन आहे.
” डॉ. सुदीप गुप्ता म्हणाले, “सुरक्षित निवास हा उपचारासारखाच महत्त्वाचा घटक आहे. ACTREC मध्ये उभारत असलेल्या ३५० बेड्सच्या भारतातील सर्वात मोठ्या बाल कर्करोग हॉस्पिटलला हे निवासस्थान नैसर्गिक पूरक ठरेल.” ACTRECचे संचालक डॉ. पंकज चतुर्वेदी म्हणाले, “कॅम्पसमधील ही सुविधा मुलांना तात्काळ वैद्यकीय मदत उपलब्ध करून देईल. त्यामुळे उपचारांची सातत्यता आणि निकाल दोन्ही सुधारतील.”
पी आर न्यूज मिडिया नेटवर्क
संपादक रमेश औताडे
7021777291
Comments
Post a Comment