आंतरराज्य दिव्यांग एलआयसी क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन
आंतरराज्य दिव्यांग एलआयसी क्रिकेट स्पर्धेचे शानदार उद्घाटन
मुंबई / रमेश औताडे
आपल्या सर्वांमध्ये समान प्रतिभा नसते, परंतु आपल्या सर्वांना आपली प्रतिभा विकसित करण्याची समान संधी असते असे डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे प्रेरणादायी विचार दिव्यांग खेळाडूंनी अमलात आणले याचे कौतुक वाटत आहे. असे मत एल आय सी चे व्यवस्थापकीय संचालक रत्नाकर पटनायक यांनी दिव्यांग आंतरराज्य दिव्यांग एल आय सी ट्रॉफी २०२५ च्या उद्घाटन प्रसंगी मुंबई पोलिस जिमखाना येथे व्यक्त केले.
ऑल इंडिया क्रिकेट असोसिएशन फॉर द फिजिकली चॅलेंज्ड आणि व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. अध्यक्ष कर्सन घावरी, उपाध्यक्ष अनिल जोगळेकर, खजिनदार राजेश पाटील, सचिव विनायक धोत्रे, वरिष्ठ सदस्य मीनल पोतनीस, एल आय सी चे सेल्स मॅनेजर नरेंद्र सुर्वे, पी आर ओ संदेश बुटाला, मार्केटिंग मॅनेजर बी एन केकरजावळेकर, एफ पी एच चे जनरल मॅनेजर विजय वाभळे, वरिष्ठ अधिकारी शीतल धनक, दिव्यांग मुंबई क्रिकेट अशोशियशन चे अध्यक्ष विठ्ठल जाधव, माजी आमदार कृष्णा हेगडे, न्यू इंडिया इन्शुरन्स चे सतीश खैराडकर, डॉ गणेश भिसे उपस्थित होते.
स्पर्धा ५ ते ७ नोव्हेंबर अशी तीन दिवस असून एकूण १६ संघ सहभागी होत आहेत. जम्मू-कश्मीर, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश, राजस्थान, सौराष्ट्र, बडोदा, महाराष्ट्र, मुंबई, कर्नाटक, केरळ, पुद्दुचेरी, तामिळनाडू, विदर्भ, झारखंड आणि पश्चिम बंगाल या राज्यांचा त्यात समावेश आहे. एलआयसी हे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक असून, तर सीएस इन्फोकॉम, न्यू इंडिया अॅश्युरन्स, महाजेनको, एफपीएच, आय सी आय सी आय हे सह-प्रायोजक आहेत.
टी-२० स्वरूपातील स्पर्धा असून ४० टक्के शारीरिक दिव्यांग खेळाडूंसाठी सामने आयोजित करण्यात आले आहेत. स्पर्धेला महाराष्ट्र राज्याचे क्रीडा उपसंचालक तसेच जी.टी. हॉस्पिटल, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र राज्य यांचे सहकार्य लाभले आहे.
Comments
Post a Comment