" शासनाचे अधिकारी जनतेच्या दारी " अनोखा उपक्रम

        " शासनाचे अधिकारी जनतेच्या दारी " अनोखा उपक्रम
मुंबई / रमेश औताडे

आशियातील सर्वात मोठी आणि प्रसिद्ध झोपडपट्टी धारावी अनेक पायाभूत सुविधांच्या समस्यांनी त्रस्त आहे. या समस्यांचे निराकरण करण्यासाठी आणि सरकारी योजना थेट जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी “शासनाचे अधिकारी जनतेच्या दारी” ही संकल्पना राबविण्यात आली. 

निमित्त होते दौलत फाउंडेशनच्या सल्लागार समाजसेविका आयेशा खान यांच्या पुढाकाराने रेशन कार्ड केवायसी शिबिराचे आयोजन. 
धारावीतील अनेक नागरिकांचे रेशनकार्ड केवायसी न झाल्यामुळे त्यांचा “आनंदाचा शिधा” (रेशन) बंद झाला होता. या पार्श्वभूमीवर गोपीनाथ कॉलनी क्रमांक २, वॉर्ड १८६ येथे आयोजित या शिबिरात तब्बल ५८० रेशन कार्डधारकांनी सहभाग घेतला. सर्वांनी रेशनकार्ड माहिती " शासनाचे अधिकारी जनतेच्या दारी” उपक्रमातून अद्ययावत करून पुन्हा रेशन घेण्यास पात्रता मिळवली.

या शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी दौलत फाउंडेशनचे पदाधिकारी असलम खान, शंकरलाल गुप्ता, नादिर खान तसेच शिधावाटप निरीक्षक अरुण काळे, निलेश वाघ आणि लिपिक संदीप चौधरी यांनी विशेष सहकार्य केले. अनेक कुटुंबांना पुन्हा रेशनचा लाभ मिळू लागल्याने आनंद आणि समाधानाचे यावेळी वातावरण निर्माण झाले .

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश

महाराष्ट्रील सुरक्षा रक्षकांच्या संदर्भात सकारात्मक निर्णय ..... कामगार मंत्री