स्वच्छता दूत फाऊंडेशन ने साजरा केला वर्ल्ड टॉयलेट डे
मुंबई / रमेश औताडे
मंत्रालय प्रतिनिधी
जागतिक टॉयलेट दिनानिमित्त १९ नोव्हेंबर २०२५ रोजी स्वच्छता दूत फाउंडेशन तर्फे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगर मानखुर्द मुंबई येथे स्वच्छता जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आला. कार्यक्रमात शौचालय या विषयावर चित्रकला स्पर्धा, तसेच स्वच्छते वरील गाणी आणि हात धुण्याच्या योग्य पद्धतींचे प्रात्यक्षिक विद्यार्थ्यांनी सादर करत टॉयलेट स्वच्छता जनजागृती केली.
आराधना समाधान घुले या ७ वी च्या विद्यार्थी ने स्वच्छते वरील गाण्याने कार्यक्रमाची सुरुवात केली. अशीता आंद्रेश गायकवाड हिने जागतिक टॉयलेट दिवस या विषयावर छायाचित्रे काढून त्याचे महत्व मांडले आणि हात धुण्याची पद्धत समजावून सांगितली.
कार्यक्रमात मनपा स्वच्छता अधिकारी आनंद जगताप, जीवन ज्योत कॉन्व्हेंट स्कूलचे प्रमुख सचिन सर, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे नगरचे अध्यक्ष गुलाब अण्णाभाऊ साठे, ज्योतिका सिस्टर, समाज प्रबोधन कार्यकर्ते सतीश भोसले, स्वच्छता संवर्धन संस्था महासंघाचे अध्यक्ष व सचिव सुरेश साळवे , पत्रकार विनोद कांबळे, डॉ. जमीला बेगम, शबाना अहमद, पुष्पेंद्र नामदेव ट्रेनर, जितेंद्र साळी समन्वयक एस डी एफ तसेच महाराष्ट्र शासन पुरस्कारप्राप्त उत्तम रणपिसे यांचे मार्गदर्शन लाभले.
कार्यक्रमाचे आयोजन स्वच्छता दूत फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष समाजसेवक मुकेश पाखरे यांनी केले व जगभरात सुरू असलेले टॉयलेट दिनाचे महत्व सांगताना स्वच्छता मनाची, स्वच्छता घराची, स्वच्छता परिसराची, स्वच्छता देशाची व जगाची राखली तर आरोग्य व्यवस्था चांगली राहील असे सांगितले.
Comments
Post a Comment