मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सर्व मुंबईकरांना समान हक्क द्या

मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी सर्व मुंबईकरांना समान हक्क द्या 

मुंबई / रमेश औताडे 


माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर तसेच पुर्ण मुंबई स्लम मध्ये रहिवाशांना 500  स्क्वेअर फुटतात घर मिळले पाहिजे 
धारावी प्रकल्प या ठिकाणी आदाणी व्यापारी साठी लवकर धारावीच्या नागरिकांनी जागा खाली करावी या साठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी धारावीच्या नागरिकांसाठी 500 चौरस फुटाचे घराची घोषणा केली 

महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणीस साहेब यांनी सर्व स्लममधल्या राहणाऱ्या मुंबईकरांना 500 स्क्वेअर फुटचे घर देऊन सर्वांना समान हक्क द्यावा अशी मागणी शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे राज्य संघटक श्री विलासभाऊ रूपवते यांनी केली 
काही दिवसांपूर्वी घाटकोपर माता रमाबाई आंबेडकर नगर कामराज नगर प्रकल्पाचे मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी नारळ फोडून भूमिपूजन केले 

माता रमाबाई आंबेडकर नगर कामराज नगर या ठिकाणी कष्टकरी कामगार व जास्त मागासवर्गीय समाज राहातो या साठी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांनी आपल्या भाषणात डॉ बाबासाहेब आंबेडकर व माता रमाबाई तसेच कष्टकरी कामगार यांच्या वर आपल्या भाषणातून जय जय कार केला जसे तर मागासवर्गीय व कष्टकरी कामगारावर खुप आमचे प्रेम आहे असे दाखवून माता रमाबाई आंबेडकर नगर,कामराज नगर रहिवाशांवर शब्दातून फुले उडवले 
मुख्यमंत्री ,उपमुख्यमंत्री यांचे एवढे माता रमाबाई आंबेडकर नगर कामराज नगर जनतेवर प्रेम असेल तर त्यांनी धारावीच्या नागरिकांसाठी 500 स्क्वेअर फुट घराची घोषणा केली तसची घोषणा माता रमाबाई आंबेडकर नगर, कामराज नगर नागरिकांन साठी 500 स्क्वेअर फुटाची घराची घोषणा करावी 

महायुती सरकार फक्त आदाणीला फायदा होईल त्या साठी काम करत असेल तर हा सर्व मुंबई करांवर दुजा पणा व अन्याय आहे महायुती सरकारच्या मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी मुंबईतल्या राहणाऱ्या नागरिकांना समान हक्क दिला पाहिजे अशी मागणी श्री विलासभाऊ रूपवते यांनी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब, व दोन उपमुख्यमंत्री यांच्या कडे केली आहे 
आता बघूया माता रमाबाई आंबेडकर नगर व कामराज नगर तसेच सर्व मुंबई स्लम मधल्या राहणाऱ्या नागरिकांवर किती प्रेम आहे का फक्त आदाणी व्यापारीवर प्रेम आहे ते कळेल 

जर सरकारने सर्व मुंबई करांना समान हक्क दिला नाही तर येणारी मुंबई महानगरपालिका निवडणुकत  माता रमाबाई आंबेडकर, कामराज नगर तसेच मुंबईकर महायुती सरकारला जागा दाखवल्या शिवाय राहानार नाही

Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन