गरजवंतासाठी हॉस्पिटलची निर्मिती अन् महिलांना मोफत रिक्षा वाटप
गरजवंतासाठी हॉस्पिटलची निर्मिती अन् महिलांना मोफत रिक्षा वाटप
मुंबई / रमेश औताडे
रोटरी क्लबच्या वतीने नुकताच एक महत्त्वपूर्ण आणि बहुउपयोगी असा दुहेरी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात एका आधुनिक हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले, तसेच महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकत गरजू महिलांना 'पिंक ऑटोरिक्षां'चे वाटप करण्यात आले असल्याची माहिती रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर (३१४१) डॉ. मनीष मोटवानी यांनी दिली.
रोटरी क्लबने समाजाच्या आरोग्य गरजा लक्षात घेऊन एका अत्याधुनिक हॉस्पिटलची निर्मिती केली आहे. समाजातील सर्व स्तरातील लोकांना, विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांना, माफक दरात उच्च दर्जाची वैद्यकीय सेवा उपलब्ध करणे. यात आधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि सुविधांचा समावेश आहे. अनुभवी डॉक्टर आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचाऱ्यांची टीम कार्यरत असेल. या हॉस्पिटलमुळे परिसरातील अनेक लोकांना आरोग्य तपासणी आणि उपचारासाठी मोठा आधार मिळणार आहे. असे रोटरी डिस्ट्रिक्ट गव्हर्नर (३१४१) डॉ. मनीष मोटवानी यांनी सांगितले.
महिलांना स्वत:चा व्यवसाय सुरू करता येईल आणि त्या आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र बनू शकतील. या 'पिंक ऑटोरिक्षां'मुळे प्रवाशांना, विशेषतः महिलांना, सुरक्षित प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल. वाहतुकीच्या क्षेत्रात महिलांचा सहभाग वाढण्यास मदत होईल. ज्या महिलांना रिक्षांचे वाटप झाले, त्यांनी रोटरी क्लबचे आभार मानले आणि या संधीमुळे आपले जीवनमान सुधारण्यास मदत होईल अशी भावना व्यक्त केली.
Comments
Post a Comment