बालविवाह मुक्त भारत मोहिमेच्या वर्धापनदिनी १०० दिवसीय जनजागृती उपक्रमाला सुरूवात

बालविवाह मुक्त भारत मोहिमेच्या वर्धापनदिनी १०० दिवसीय जनजागृती उपक्रमाला सुरूवात
मुंबई / रमेश औताडे 

बालविवाहमुक्त भारत उपक्रमाच्या पहिल्या वर्धापनदिनानिमित्त, CCDT, जस्ट राईट्स इंडिया आणि महिला व बालविकास विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने बालविवाह निर्मूलनासाठीची सामूहिक वचनबद्धता पुन्हा अधोरेखित करण्यात आली. २०३० पर्यंत देश बालविवाहमुक्त करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी सर्व घटकांच्या सहभागाचे महत्त्व यावेळी विशेषत्वाने नमूद करण्यात आले.
या प्रसंगी जिल्हा प्रशासन, कायदा अंमलबजावणी यंत्रणा, शैक्षणिक संस्था, धर्मगुरू, पंचायत राज संस्था, विविध समुदाय संघटना तसेच लोकप्रतिनिधी यांच्यासोबत समन्वय साधून येणाऱ्या वर्षात जिल्हा बालविवाहमुक्त करण्याची सामूहिक प्रतिज्ञा करण्यात आली.
या महत्त्वपूर्ण टप्प्याचे स्मरण आणि पुढील कामगिरीला गती देण्यासाठी, महिला व बालविकास मंत्रालय, भारत सरकार यांच्यातर्फे राबविण्यात येणाऱ्या १०० दिवसीय जनजागृती मोहिमेला राज्यात आजपासून उत्साहपूर्ण सुरुवात करण्यात आली.

Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन