बाल लैंगिक शोषण संपविण्यासाठी " अर्पण " सरसावली

        बाल लैंगिक शोषण संपविण्यासाठी " अर्पण " सरसावली

अर्पण ही जागतिक स्तरावर नावाजलेली, एक स्वयंसेवी संस्था असून, बाल लैंगिक शोषणाची समस्या समूळ नष्ट करण्यासाठी समर्पित आहे.  या संस्थेने, ठाणे महानगरपालिकाआणि ठाणे महानगरपालिका परिवहन उपक्रम यांच्या संयुक्त विद्यमाने, बाल सुरक्षा सप्ताह या आपल्या जनजागृतीपर अभियानाचा उद्घाटन सोहळा आयोजित केला होता. 

यंदा या अभियानाचे हे सातवे वर्ष असून, ठाणे महानगरपालिका परिवहन विभागाने आमच्या उपक्रमाला पाठिंबा दर्शवताना, ठाणे महानगरपालिका परिवहन विभागाच्या ३८५ बसेसमध्ये या अभियानातील बाल सुरक्षा संदेश प्रदर्शित केले आहेत. या बस जनजागृती उपक्रमाच्या माध्यमातून, हे अभियान हजारो नागरिकांचे लक्ष वेधून घेण्यात यशस्वी ठरले आहे.

या उद्घाटन सोहळ्यासाठी खासदार नरेश म्हस्के, श्री. सौरभ राव, आयएएस अधिकारी व ठाणे महानगरपालिका आयुक्त, पूजा तापडिया, अर्पण संस्थेच्या संस्थापिका व  मुख्य कार्यकारी अधिकारी, नेहल पारेख सीओओ, प्रोग्राम्स, अर्पण आणि अर्पण संस्था तसेच ठाणे प्रशासनातील अनेक मान्यवर उपस्थित होते. 

या कार्यक्रमादरम्यान, यंदाच्या बाल सुरक्षा सप्ताहावर आधारित असलेली आणि विद्या बालन यांची विशेष भूमिका असलेली अर्पणची जनजागृती फिल्म, श्री सौरभ राव यांच्या हस्ते प्रदर्शित करण्यात आली. या फिल्मच्या माध्यमातून अर्पणने लहान मुलांचे लैंगिक शोषण करणार्या व्यक्तींविरुद्ध कठोर भूमिका घेतली असून, “जर तुम्ही एखाद्या मुलाचे लैंगिक शोषण कराल, तर पॉक्सो कायदा तुम्हाला शिक्षा करेल ” असा थेट आणि स्पष्ट इशारा त्यांना दिला आहे. 

फिल्मच्या प्रदर्शनानंतर, श्री. सौरभ राव, पूजा तापडिया आणि नेहल पारेख यांनी कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या अनेक शाळकरी मुलांसोबत बाल सुरक्षा संदेश प्रदर्शित करणार्या एका विशेष बसचे अनावरण करून, या अभियानाचे औपचारिक उद्घाटन केले.

यावेळी खासदार नरेश म्हस्के, आयएएस अधिकारी व ठाणे महानगरपालिका आयुक्त मा. श्री. सौरभ राव आणि अर्पणच्या संस्थापिका आणि मुख्य कार्यकारी अधिकारी पूजा तापडिया आदी मान्यवर उपस्थित होते. या अभियानाअंतर्गत ठाणे महानगरपालिका परिवहन विभागाच्या ३८५ बसेसमध्ये या अभियानातील बाल सुरक्षा संदेश प्रदर्शित केले आहेत. हे अभियान पॉक्सो कायद्याचे अस्तित्व अधोरेखित करून या कायद्याच्या उल्लंघनाचे परिणाम किती भयावह असू शकतात याची जाणीव करून देणार आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन