लेखण्या जमविण्याचा पत्रकार महेश उपदेव यांचा छंद
लेखण्या जमविण्याचा पत्रकार महेश उपदेव यांचा छंद ३९ वर्षात जमविल्या ९ हजार लेखण्या जेष्ठ पत्रकार : योगेश वसंत त्रिवेदी पत्रकार आणि लेखणी यांचा संबंध जीवाभावाचा. पूर्वी अनेक जण शाईचे पेन वापरीत असत. अताही काही जण शाईचे पेन वापरतात. परंतु ही लेखणी जमविण्याचा छंद जोपासणारे विरळाच. नागपूर येथील ज्येष्ठ पत्रकार महेश उपदेव यांनी हा छंद जोपासला असून गेल्या ३९ वर्षांत त्यांनी तब्बल ९ हजार लेखण्या जमविल्या आहेत. आपण त्यांच्याच शब्दांत वाचू या. ते म्हणतात, "माणसाचा मेंदू आकाराने लहान असला तरी कर्तृत्वाने तो नेहमी श्रेष्ठ ठरत असतो, माणूस सदासर्वदा काहीतरी क्लुप्त्या शोधत असतो. काही माणसं त्याहीपलीकडे असतात अशा माणसांना मस्त कलंदर हे विशेषण शोभून दिसते. छंद जोपासणारी अनेक व्यक्ती आहेत. कुणी वेगवेगळ्या टाच...