आता कबुतरामुळे महायुतीचे सरकार पडणार

कांद्यामुळे काँग्रेसचे तर कोंबडीमुळे शिवसेनेचे सरकार पडले

आता कबुतरामुळे महायुतीचे सरकार पडणार 

मुंबई / रमेश औताडे 


मुंबईत दादर येथील कबुतरखान्याच्या वादातून झालेल्या काही कबुतरांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आत्मशांतीसाठी शनिवारी मुंबईमध्ये जैन धर्मियांकडून धर्मसभा आयोजित करण्यात आली होती. या धर्मसभेत जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी मोठी घोषणा करत जन कल्याण पार्टी नावाचा राजकीय पक्ष स्थापन करणार असल्याचे सांगितले. कांद्यामुळे काँग्रेसचे तर कोंबडीमुळे शिवसेनेचे सरकार पडले होते आता कबुतरामुळे महायुतीचे सरकार पडणार आहे.

यावेळी जैन इंटरनॅशनल सेवा ऑर्गनायझेशन चे संस्थापक अध्यक्ष सुरेश पुनमिया व वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते. जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी यावेळी बोलताना सांगितले की, आम्ही सर्व महापालिकेत आमचे उमेदवार उभे करू. शिवसेनेकडे वाघ चिन्ह होते, आम्हाला कबुतरांची पार्टी हवी आहे. ही फक्त जैनांची पार्टी नाही, यात गुजराती, मारवाडी यांनाही घेण्यात येईल. आमच्या जन कल्याण पार्टीत फादर सोडून सर्वांना एन्ट्री असेल.

रावणापुढे जटायू पक्षी आला होता. एका पक्षासाठी श्रीराम यांनी पुण्य कर्म केले. त्यामुळे राम भूमीत कबुतरावर अन्याय नको. काही डॉक्टर मूर्ख आहेत. सामान्य माणूस रोज मरतो, सरकार विचार करते का? कबुतरखान्यावरून राजकारण सुरू असून मंत्री मंगलप्रभात लोढा आजच्या धर्मसभेला आले नाहीत, याचा अर्थ त्यांना कबुतर प्रेम नाही असे त्यांनी सांगितले.

शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकारी मनीषा कायंदे यांनी दिलेल्या इशाऱ्यावर निलेश मुनी म्हणाले, कायंदे यांना मी ओळखत नाही. मी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना सांगतो, कायंदे वेड्या आहेत, त्यांना वेळीच शांत करा. 

Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन