सर्व स्तरातील शिक्षक शिक्षकेत्तर बांधवांच्या जिल्हा पातळीवर वेगवेगळ्या विंग्स निर्माण होणार - डाॅ. संजयराव तायडे पाटील

सर्व स्तरातील शिक्षक शिक्षकेत्तर बांधवांच्या जिल्हा पातळीवर वेगवेगळ्या विंग्स निर्माण होणार - डाॅ. संजयराव तायडे पाटील 
          शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बाळासाहेब भवन मुंबई 

मुंबई / रमेश औताडे ( मंत्रालय प्रतिनिधी)

सर्व स्तरातील शिक्षक शिक्षकेत्तर बांधवांना सोबत घेऊन काम करण्याच्या दृष्टीने जिल्हा पातळीवर वेगवेगळ्या विंग्स निर्माण करण्यात येणार असल्याचे ठरले तसेच पुढील बैठकी पुर्वी पक्षाने ठरवुन दिलेल्या धोरणानुसार व संघटनेच्या घटनेप्रमाणे 
विभागीय कार्यकारिणी व जिल्हा कार्यकारिणी ठरवून घोषीत करण्यात येईल त्याअनुषंगाने सर्वांनी काम करावे असे निर्देश देण्यात आले.

शिवसेना मध्यवर्ती कार्यालय बाळासाहेब भवन मुंबई येथे महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर सेनेची बैठक पार पडली. यावेळी संघटनेचे राज्याध्यक्ष मा. आमदार किशोरजी दराडे शिवसेना पक्ष सरचिटणीस मा. संजयजी मोरे , पक्ष कार्यालय प्रमुख प्रशांतजी पालांडे साहेब यांनी मार्गदर्शन केले यावेळी काही महत्वाच्या विषयांवर चर्चा झाली. 

राज्यात होऊ घातलेल्या विधानपरिषद निवडणुकीत शिवसेना ताकदीने उतरेल व लवकरच शिवसेना पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री मा. ना. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सोबत एक बैठक घेऊन पुढील रणनिती आखली जाईल. यप्रसंगी महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री मा.ना. उदय सामंत यांची भेट झाली. 

 आजच्या बैठकीत अमरावती विभागीय शिक्षक मतदार संघासाठी मतदार नोंदणी समन्वयक म्हणून श्री. उपेंद्र पाटील यांची नियुक्ती करण्यात आली. बैठकीला अनेक महत्त्वाचे पदाधिकारी हजर होते. मराठवाडा विभाग पदवीधर मतदार नोंदणी प्रमुख तथा राज्यउपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक व शिक्षकेत्तर सेना डाॅ. संजयराव तायडेपाटील.  नासिक विभागातून राज्य उपाध्यक्ष प्रो. संजय चव्हाण, राज्यउपाध्यक्ष संभाजी सिरसाठ राज्यसरचिटणीस शिवाजी शेंडगे, कोषाध्यक्ष चिंतामण वेखंडे मेस्टा राज्यउपाधक्ष अभिजीत देशमुख. नवनिर्वाचीत मराठवाडा कार्याध्यक्ष प्रा. रविंद्र निळ संभाजीनगर शहराध्यक्ष प्रा. रविंद्र खोडाळ व इतर अनेक शिक्षकनेते उपस्थित होते. 

बैठकीनंतर राज्याचे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री मा. ना. श्री. प्रकाशजी अबीटकर साहेब व राज्याचे शिक्षणमंत्री मा.ना. दादा भुसे यांच्या भेटी घेतल्या व अनेक विषयांवर चर्चा केली.

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश

महाराष्ट्रील सुरक्षा रक्षकांच्या संदर्भात सकारात्मक निर्णय ..... कामगार मंत्री