रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वर्धापन दिन
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा वर्धापन दिन
मुंबई / रमेश औताडे
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाचा ६८ वा वर्धापन दिन सोहळा रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वाखाली महाड येथील चवदार तळ्याच्या सत्याग्रह क्रांतीभूमीत ३ नोव्हेंबर २०२१५ रोजी आयोजीत केला असल्याची माहिती पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस गौतम सोनवणे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका जाहीर होणार आहेत. या निवडणूकांच्या संदर्भात रामदास आठवले हे रिपब्लिकन पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. पत्रकार परिषदेस अज्ञान रिसर्च व एज्युकेशन ट्रस्ट चे राष्ट्रीय अध्यक्ष व रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आ) चे मुंबई प्रदेश उपाध्यक्ष व विजय शं . शेट्टी पर्यावरण विभागाचे मुंबई प्रदेश अध्यक्ष तसेच आर पी आय चे मुंबई पदाधिकारी संजय पवार, प्रकाश जाधव, शिरीष चिखलकर, विशाल गायकवाड, विजय शेट्टी उपस्थित होते. रिपब्लिकन पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांनी प्रचंड संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन गौतम सोनवणे यांनी केले.
Comments
Post a Comment