बहुजन समाजासाठी रिपाईचे आमरण उपोषण

बहुजन समाजासाठी रिपाईचे आमरण उपोषण
मुंबई / रमेश औताडे 

सांडपाण्याची समस्या, पाणी गळती, स्वच्छतेचा अभाव या सर्व सोयी सुविधाच्या अभावी दुर्गंधी पसरून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असल्याने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटातर्फे सुरू आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे

पंचशील एस आर ए अमर महल चेंबूर प्रकल्पातील जनता त्रस्त असून आमरण उपोषणाचा पाचवा दिवस आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे, राजेश भाऊ कटार नवरे, बाळासाहेब पवार, दिलीप कदम यांनी याप्रकरणी रहिवाशांना मूलभूत सुविधा मिळाल्याशिवाय उपोषण मागे घेण्यात येणार नाही असा इशारा दिला आहे.

इमारतीमधील अग्निशामक परवाना चौकशी व्हावी. ११ पैकी फक्त ३ लिफ्ट चालू आहेत. लिफ्टची अकार्यक्षमता असल्याने सुरक्षेच्या दृष्टीने अपघाताची शक्यता आहे. २०१६ पासून सांडपाणी, गळती, अस्वच्छता आदी प्रकरणी विकासक चैतन्य मेनता आणि ललित मेनता अरिहत रिलेट यांच्या मनमानी कारभारामुळे दुर्गंधी पसरली असून आजार निर्माण होत आहेत. गरीब समाजाला त्रास देत असल्याप्रकरणी  त्यांच्यावर ॲट्रॉसिटी ॲक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी ॲड महेंद्र भिंगारदिवे  यांनी केली आहे. मात्र पोलिस अद्याप तपास करत आहेत. 









Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन