मिशन मुंबई महानगरपालिका – राष्ट्रवादी युवकांचे बळकट पाऊल

मिशन मुंबई महानगरपालिका – राष्ट्रवादी युवकांचे बळकट पाऊल

मुंबई / रमेश औताडे 


राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मिशन मुंबई महानगरपालिका उपक्रमाला गती देण्यासाठी राष्ट्रवादी युवक जिल्हाध्यक्ष सचिन आदिनाथ लोंढे यांनी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांची सदिच्छा भेट घेतली. या भेटीत पवार साहेबांकडून लोंढे यांना आशीर्वाद व मार्गदर्शन लाभले.

या भेटीला शक्य करून देणाऱ्या मुंबई अध्यक्षा श्रीमती राखीताई जाधव, माननीय अजितदादा रावराणे साहेब व मुंबई युवक अध्यक्ष श्री अमोलजी मातेले साहेब यांचे सचिन लोंढे यांनी मनःपूर्वक आभार मानले.

“आपल्यासारखे मार्गदर्शक आणि जीवाभावाचे नेते आमच्यासोबत असल्यामुळे आम्हाला लढण्यासाठी नवी उर्जा आणि आत्मविश्वास मिळतो. आपण वेळोवेळी मार्गदर्शन आणि सहकार्य करत आहात, त्याबद्दल मनापासून धन्यवाद,” असे लोंढे यांनी या भेटीनंतर सांगितले.

या भेटीनंतर राष्ट्रवादी युवकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून, मुंबई महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन