विकास होत असताना शेतकऱ्यांचा विचार व्हावा - चंद्रकांत मोकल

विकास होत असताना शेतकऱ्यांचा विचार व्हावा - चंद्रकांत मोकल
मुंबई / रमेश औताडे 

पालघर जिव्ळ्यात बुलेट ट्रेन, वाढवण बंदर, विमानतळ व इतर प्रकल्प येते आहेत,  प्रकल्पांची कामे सुरु आहेत. विकासात्मक प्रकल्पांची कामे करताना इथला शेतकरी विस्थापीत व्हायला नको त्यांच्या शेतीचा व कामाचाही विचार करावा असे स्पष्ट मत महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघाचे अध्यक्ष चंद्रकांत मोकल यांनी केले.

महाराष्ट्र राज्य आंबा उत्पादक संघ व  बांदेकर महाविद्यालय पालकर यांच्या वतीने विद्यालयात फलोत्पादन, सिंचन प्रक्रिया- पर्यटन, दुग्धविकास परिषदेचे प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी  ते उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते.

पावसाने मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान झाले आहे. राज्य व केंद्र सरकारने त्यांना योग्य ती मदत दिली पाहीजे ही आमची मागणी आहे. असे मोकल यांनी यावेळी सांगितले.

उद्‌घाटन इंडियन ऑइक कॉर्पोरेशन ऑफ इंडियाचे उपमहाव्यवस्थापक बी. बी प्रसाद यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
 टाटा स्टील मार्केटिंग हेड  सचिव अनिल पाटील , किरण साने रीटेल बिझनेस प्रशांत कुमार मिश्रा वाडकर , आयडीबीआय बैंकेच्या वरिष्ठ अधिकारी व शेतकरी बहुसंख्येने उपस्थित होते. यावेळी प्रगतिशील शेतकरी शेतकरी यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मान‌चिन्ह शाक पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

राज्यातील सुरक्षा रक्षक मंडळे सक्षम करावीत - - कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांचे निर्देश

महाराष्ट्रील सुरक्षा रक्षकांच्या संदर्भात सकारात्मक निर्णय ..... कामगार मंत्री