प्रकल्पग्रस्तांचे आमरण उपोषण १४ व्या दिवशीही सुरू

प्रकल्पग्रस्तांचे आमरण उपोषण १४ व्या दिवशीही सुरू

​मुंबई / रमेश औताडे 

सर्व प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारकांना रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड च्या नागोठणे प्रकल्पातील कंपनीमध्ये कायमस्वरूपी नोकरी मिळावी, या प्रमुख मागणीसाठी आझाद मैदान मुंबई येथे सुरू असलेले बेमुदत आमरण उपोषण १४ व्या दिवशीही सुरू आहे. सरकारने याबाबत गांभीर्याने विचार केला नाही तर आंदोलन तीव्र करू असा इशारा भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्थांचे अध्यक्ष गंगाराम मिनमिने यांनी दिला.

​'भूमिपुत्र प्रकल्पग्रस्त सामाजिक संस्था-नागोठणे' आणि 'वंचित बहुजन माथाडी कामगार युनियन' यांच्या नेतृत्वाखाली हे उपोषण म ७ ऑक्टोबर २०२५ पासून सुरू झाले आहे. कंपनीने ३२४ प्रकल्पग्रस्तांना कायमस्वरूपी नोकरी द्यावी, अन्यथा त्यांच्या जमिनी परत कराव्या, अशी आक्रमक मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे.
​सर्व प्रकल्पग्रस्त प्राधान्य प्रमाणपत्र धारकांना रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड, नागोठणे कंपनीत कायमस्वरूपी नोकरी मिळावी.
​नोकरी मिळेपर्यंत किंवा 'कॉल लेटर' (नोकरीची नेमणूक पत्र) मिळेपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचा निर्धार केला आहे.

Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन