मोहन पी. आर. देवेंद्र यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव
मोहन पी. आर. देवेंद्र यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव
मुंबई / रमेश औताडे
दलित, ओबीसी, मायनॉरिटी, आदिवासी संघटनांच्या अखिल भारतीय परिषदेतर्फे चालवल्या जाणाऱ्या (डोमा परिसंघ) मुंबईच्या अध्यक्षपदी कामगार नेते मा. मोहन पी. आर. देवेंद्र यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली आहे.
त्यांच्या या महत्वपूर्ण नियुक्तीबद्दल मुंबईच्या विविध पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी त्यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष (माजी खासदार) डॉ. उदित राज, राष्ट्रीय सचिव डॉ. संजय कांबळे बापेरकर तसेच इतर अनेक कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांनी मोहन पी. आर. देवेंद्र यांच्या पुढील यशस्वी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
(SC/ST/OBC/VJNT ORGANIZATIONS DOMA PARISANGH) ही संघटना दलित, ओबीसी, मायनॉरिटी, आदिवासी समाजाच्या हक्कांसाठी आणि कल्याणासाठी कार्यरत आहे. मुंबई अध्यक्षपदावर कामगार नेते मोहन पी. आर. देवेंद्र यांच्या नियुक्तीमुळे संघटनेच्या कार्याला नवी दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Comments
Post a Comment