दिव्यांग क्रिकेटपटूची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
दिव्यांग क्रिकेटपटूची आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड
दिव्यांग क्रिकेटपटू मोहम्मद शाहिल अब्दुल अर्मान हशमी
मुंबई / रमेश औताडे
दिव्यांग क्रिकेटपटू मोहम्मद शाहिल अब्दुल अर्मान हशमी यांची पॅरा क्रिकेट क्लब ऑफ इंडिया संघात निवड झाली असून, कोलंबो (श्रीलंका) येथे नोव्हेंबर २०२५ मध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्लब क्रिकेट स्पर्धेत ते भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. त्यासाठी देणगीदारांनी मदतीचा हात पुढे करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
मोहम्मद शाहिल हे जन्मतः दिव्यांग नव्हते. मुंबईत २६ जुलै २००५ रोजी झालेल्या प्रलयंकारी पावसात झालेल्या एका दुर्दैवी अपघातात त्यांना अपंगत्व आले. मात्र या संकटानंतरही त्यांनी हार न मानता आपल्या चिकाटीच्या जोरावर क्रिकेटमध्ये आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे.
कोलंबो येथे होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी प्रवास, निवास व किटसाठी त्यांना ५० हजाराची आर्थिक मदतीची गरज आहे. त्यामुळे सामाजिक संस्था, क्रीडाप्रेमी आणि उदार देणगीदारांनी या तरुण खेळाडूसाठी आर्थिक सहाय्य 97684 86133 क्रमांकांवर संपर्क साधून करावे असे आवाहन करण्यात आले आहे. मोहम्मद शाहिल यांच्यासारख्या दिव्यांग खेळाडूंच्या प्रयत्नांना बळ दिल्यास, भारतातील पॅरा क्रीडा क्षेत्र अधिक सक्षम होईल.
Comments
Post a Comment