मातंग संघटनेचे पहिले अधिवेशन पुण्यात

मातंग संघटनेचे पहिले अधिवेशन पुण्यात
मुंबई / रमेश औताडे 

महाराष्ट्रातील शेकडो मातंग समाजाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय स्वाभिमानी मातंग संघटनेचे पहिले अधिवेशन शनिवारी ४ ऑक्टोबर रोजी शिवाजी नगर, पुणे येथे यशस्वीरित्या पार पडले. वक्ता प्रशिक्षण आणि मातंग समाजाच्या सामाजिक अडचणी व आव्हानांवर चर्चाही झाली. शासनाच्या कर्ज प्रकरणे, हमिदार निर्णय व आरक्षण वर्गीकरणावर आमदार अमित गोरखे यांनी मार्गदर्शन केले.

विधानपरिषद आमदार अमित गोरखे, क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष अशोक लोखंडे, सदस्य भास्कर नेटके, नगरसेविका नेटके ताई, जेष्ठ नेते रमेश समुखराव, संघटना नेते रमेश दोडके, उपाध्यक्ष गजानन वानखेडे, उपाध्यक्ष दिलीप यादव आणि महिला पदाधिकारी सिताबाई चांदने उपस्थित होते.

या वेळी शशिकला काचेकर व शोभाताई वैराळ यांना समाजकार्या बाबत जीवन गौरव पुरस्कार देण्यात आला. अधिवेशनाचे सूत्रसंचालन अध्यक्ष राजीव मानकर यांनी केले तर आभार प्रदर्शन गजानन वानखेडे यांनी केले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अनिल सुरडकर, विजया वानखेडे, सुनील भालेराव, सागर तायडे, सुनील सूरडकर, हरिश दांडगे, सूरज यादव, विद्या खरात, साक्ष्मी सुरळकर, अंजनाताई बोरले, बबीता खरात, पुनमताई व रूपाली पचाल, कुसुमबाई आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.



Comments

Popular posts from this blog

स्वराज पक्षाच्या रडारवर आता शिधावाटप दुकाने

विधेयक मागे न घेतल्यास देशव्यापी संपाचा इशारा!

शिक्षणमंत्रांच्या खोट्या आश्वासना विरोधात शिक्षकांचे आझाद मैदानात आंदोलन