बंधुभाव आणि विचारांच्या एकत्रीकरणाचा संदेश
बंधुभाव आणि विचारांच्या एकत्रीकरणाचा संदेश
मुंबई / रमेश औताडे
आर.पी.आय. मुंबई प्रदेशचे सरचिटणीस विवेक गोविंदराव पवार यांनी आज गुरुवारी समाजातील बंधुभाव आणि विचारांचे एकत्रीकरण याचा संदेश देत दोन महत्त्वपूर्ण स्थळांना भेट दिली.
सर्वप्रथम त्यांनी दादर येथील भगवान गौतम बुद्ध विहारात जाऊन तथागत गौतम बुद्ध आणि भारतीय घटनाद्रष्टे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांना पुष्पांजली अर्पण केली. या वेळी त्यांनी बौद्ध आणि आंबेडकरी विचारसरणीने देशात समानता, बंधुता आणि करुणेचा मार्गच खरा असल्याचा संदेश दिला.
यानंतर महात्मा गांधी जयंतीनिमित्त त्यांनी जुहू चौपाटी येथे जाऊन राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मारकास अभिवादन केले. गांधी, बुद्ध आणि आंबेडकर या तीन महामानवांच्या विचारांतूनच भारताचे खरे राष्ट्रनिर्माण होऊ शकते, असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले.
या कार्यक्रमांदरम्यान त्यांच्या सोबत स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. सामाजिक सलोखा आणि मानवतावादी विचारांचे पूनर्मूल्यांकन करण्याचा हा उपक्रम स्थानिक नागरिकांनीही कौतुकाने पाहिला.
Comments
Post a Comment