७० लाखापेक्षा जास्त मनुष्यबळ असलेला ४० हजार कोटीचा व्यवसाय कुणाच्या भल्यासाठी !
७० लाखापेक्षा जास्त मनुष्यबळ असलेला ४० हजार कोटीचा व्यवसाय कुणाच्या भल्यासाठी ! मुंबई / रमेश औताडे सरकारने अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर " खाजगी सुरक्षा रक्षक एजन्सी कार्यप्रणाली व निकष २०२५ " हा नवा कायदा आणला आहे तो खाजगी ठेकेदारांसाठीच केला आहे का ? असा आरोप सुरक्षा विभागाचे ज्येष्ठ अभ्यासक करत आहेत. या कायदात ज्या अटी शर्ती घातल्या आहेत त्या ठेकेदारांच्या बाजूनेच दिसत आहेत. त्यामुळे ७० लाखापेक्षा जास्त मनुष्यबळ असलेल्या ४० हजार कोटीच्या व्यवसायाची अवस्था " आंधळ दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय " अशी झाली आहे. तरुणीवर बलात्काराचा प्रयत्न करून तिला ठार करणारा सुरक्षा रक्षक जेरबंद... चोरी, दरोडा प्रकरणी सुरक्षा रक्षक अटकेत.... अशा प्रकारच्या बातम्या आपण नेहमी पाहत व ऐकत असतो. मात्र घटना घडून गेली की ए रे माझ्या मागल्या अशी परिस्थिती असते. सरकारने या समस्येकडे गांभीर्याने कधी पाहिले नाही. त्यामुळे आपली सर्वांची सुरक्षा धोक्यात आली आहे. फक्त " जागते रहो " असे रात्रभर ओरडत बसले की खाजगी सुरक्षा एजन्सी मध्ये सुरक्षा रक्षक म्हणून भरती...