महिलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन
महिलांमधील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी विविध कार्यक्रमाचे आयोजन
मुंबई / रमेश औताडे
मुंबईत कांदिवली पश्चिम चारकोप येथील माथाडी कामगारांसाठी वसलेल्या सह्याद्री नगर येथे सांस्कृतिक वैभवात भर घालण्यासाठी महिलांमधील सुप्त गुणांना वाव देण्याच्या उद्देशाने दरवर्षी दि सह्याद्रि सहकारी बँक लि. मुंबई आणि कापड बाजार कामगार सहकारी सेवा सोसायटी लिमिटेड मुंबई यांच्या वतीने महिलांसाठी भव्य हळदी कुंकू समारंभ व सौभाग्याचे लेणे ,महिलांसाठी होम मिनिस्टर खेळ पैठणी चा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते
त्यामुळे घरकामात राबणारे महिलांचे हात आज ‘होम मिनिस्टर’ खेळण्यात रंगले होते. विविध स्पर्धा, डान्स आदींच्या माध्यमातून रंगलेल्या या सोहळ्यात अर्चना भोईटे यांनी बाजी मारत महाविजेत्या ठरल्या.
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत महिलांना कार्यक्रमाचा आनंद लुटता यावा यासाठी शनिवारी २२ मार्च २०२५ रोजी सायंकाळी ६ ते १० या वेळेत गणेश मंदिर सह्याद्री नगर चारकोप येथे ‘होम मिनिस्टर’ खेळ खेळुया पैठणीचा हा कार्यक्रम आयोजित केला होता.
यावेळी संस्थेतर्फे महिला जनजागृती शिबिर घेण्यात आले.
कार्यक्रमाला महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद मिळाला. कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉ दीपाली गिजरे व डॉ दीपा बंडकर यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी विजया लक्ष्मी शेट्टी , रत्नप्रभा चव्हाण,शशिकला भिलारे,अर्चना भोईटे, आनंदीबाई चव्हाण उपस्थित होते.
स्पर्धा, डान्स, मनोरंजन आदि विविध उपक्रमास महिला वर्गाची अलोट गर्दी कार्यक्रमाचा केंद्रबिंदू ठरला. उखाणा घेणे, गाणी, चेंडू फेकणे, फुगे फोडणे आदि विविध खेळांमध्ये शेवटपर्यंत टिकून राहण्यासाठी प्रत्येक स्पर्धकांची उडालेली धांदल अन् उत्साह स्पर्धेमध्ये रंगत वाढविणारा ठरला. वीस वर्षांपासून ते जवळपास साठी ओलांडलेल्या महिला स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. या खेळाचे सूत्रसंचालन किशोर सावंत यांनी केले.
तीन विजेत्यांना पैठण्या देण्यात आल्या. व प्रश्नमंजुषा सुद्धा घेण्यात आल्या , संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्र संचालन मोनिका चव्हाण यांनी केले कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ,आरती पिसाळ,संदीप पिसाळ ,संदीप चव्हाण ,निखिल चव्हाण , घनश्याम देटके यांनी विशेष परिश्रम घेतले.
Comments
Post a Comment